Friday, August 10, 2018

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा
बकरी ईद सण शांततेत साजरा करण्यासाठी
प्रशासनास सहकार्य करावे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबईदि. 10 : राज्यात बकरी ईदचा सण शांततेत साजरा व्हावायासाठी प्रशासनाने योग्य दक्षता घेतली आहे. याकाळात वाहतूक व्यवस्था सुरळीत रहावीयासाठी पोलिसांनी नियोजन करावे. हा सण शांततेने चांगल्या प्रकारे साजरा व्हावा यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावेअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.
बकरी ईद सणानिमित्त राज्यातील कायदा व सुव्यवस्था संदर्भात तसेच मुंबईतील व्यवस्थेबाबतची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात झाली. यावेळी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरगृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकरआमदार आशिष शेलारमाजी मंत्री नसीम खानआमदार वारीस पठाणअमीन पटेलअस्लम शेख,  गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुनील पोरवालबृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त अजोय मेहतानगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीरपरिवहन विभागाचे प्रधान सचिव आशिष कुमार सिंहपोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकरपोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांच्यासह अधिकारी व शांतता समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणालेगेल्या चार वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे बकरी ईदचा सण साजरा करण्यात आला आहे. यंदाही शांततेत व चांगल्याप्रकारे हा सण साजरा करावा. सणाच्या काळात कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेतयासाठी पोलीसांनी योग्य ती सावधगिरी बाळगावी.
बकरी ईदसाठी मुंबईतील देवनार पशुवधगृह येथे महापालिकेने चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत. तेथे पाणी साचून बकऱ्यांना त्रास होऊ नयेयासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात तसेच स्वच्छतापशुवैद्यकीय चिकित्सा यासाठी पुरेसे अतिरिक्त मनुष्यबळ पुरविण्यात यावेत. पशुवधगृहात येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नयेयासाठी वाहतूक विभागाने दक्षता घ्यावी. तसेच तेथे सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस चौकी उभारावी. पूर्व मुक्त महामार्गावर गाड्या अडविल्यामुळे वाहतूक थांबणार नाहीयाची काळजी घ्यावी.
सणाच्या काळात मदतीसाठी गेल्यावर्षीप्रमाणेच मुंबई व राज्यासाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्यात यावे. राज्याच्या सीमा तपासणी नाक्यांवर जनावरे घेऊन येणाऱ्या वाहनांना जास्तकाळ थांबवून ठेवू नयेअशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधींनी गेल्या चार वर्षात राज्य शासनाने बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर केलेल्या सुयोग्य सोयीसुविधांबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले व यंदाही बकरी ईदचा सण शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करण्यात येणार असल्याचे सांगितले.
देवनार पशुवधगृहातील सुविधा
- 10 लाख लिटर पाण्याच्या  पुरवठ्याची क्षमता,
- 60 ठिकाणी पाणपोईच्या सोयी,
- 8 तात्पुरती शौचालयमहिलांसाठी स्नानगृहे,
- 88 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे,
14 ठिकाणी फूड झोन,
- 64 एकरात 55 व़ॉकीटाकीच्या सहाय्याने लक्ष ठेवणार
- पशुंची माहिती व्हावीयासाठी परिसरात डिजिटल इंडिकेटर,
- 15 पोलीस सहायता कक्ष,
- जनावरांसाठी पशु वैद्यकीय दवाखाने
- पशुखरेदी विक्रीसाठी येणाऱ्यांच्या माहितीसाठी पत्रकांचे वाटप

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...