मंत्री दिवाकर रावते आणि कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडे धनादेश सुपुर्द एसटी कर्मचारी आणि महामंडळाकडून केरळ पुरग्रस्तांना 10 कोटी रुपयांची मदत


मुंबईदि. 23 : केरळ येथील पुरग्रस्तांना मदतीसाठी एसटीचे कर्मचारी तसेच महामंडळ पुढे सरसावले आहे. पुरग्रस्तांना मदतीसाठी परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांच्या उपस्थितीत एसटी कर्मचारी तसेच महामंडळाच्यावतीने 10 कोटी रुपयांच्या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपुर्द केला.
मंत्री श्री. रावते यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात एसटीच्या मान्यताप्राप्त तसेच इतर कामगार संघटनांसमवेत बैठक झाली. त्यात केरळ येथील पुरग्रस्तांना कामगारांमार्फत मदत करण्याबाबत चर्चा झाली. सर्व कामगार संघटनांनी कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन पुरग्रस्तांना मदतीसाठी देण्याची तयारी दर्शविली. पण कर्मचाऱ्यांच्या वेतनातून फक्त अर्ध्या दिवसाचे वेतन देण्यात यावे आणि त्यात तेवढीच रक्कम एसटी प्रशासनामार्फत देण्यात यावीअशी सूचना मंत्री श्री. रावते यांनी केली. त्यानुसार मदतीचा 10 कोटी रुपयांचा धनादेश आज मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आला. यावेळी मंत्री श्री. रावते यांच्यासह महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओलएसटी कर्मचारी सर्वश्री रामदास पवारयोगेश मुसळेनितीन गदमळेआप्पा वरपेकमलाकर साळवेसंदीप कातकर यांच्यासह विविध कामगार संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. 
मंत्री श्री. रावते म्हणालेएसटी कर्मचाऱ्यांनी तसेच एसटी महामंडळाने आपत्तीग्रस्तांना मदत करण्याची नेहमीच भूमिका घेतली आहे. यापूर्वीही महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी एसटी कर्मचारी आणि महामंडळ पुढे सरसावले होते. आता केरळ राज्यावर मोठे संकट कोसळले असून तेथील नागरिकांना मदतीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:हून तयारी दर्शविली. कर्मचाऱ्यांची ही भूमिका मानवतेची तसेच इतर सर्वांसाठी आदर्शवत अशी आहे. कर्मचाऱ्यांच्या मदतीत एसटी महामंडळामार्फतही तेवढेच योगदान देऊन हा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपुर्द करण्यात आलाअसे त्यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती