चांदूरबाजार येथे एमआयडीसी होणार - प्रविण पोटे-पाटील

मुंबईदि. 29 : अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी कमीत कमी पंचवीस हेक्टर जमिनीचे भूसंपादन करण्याचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश उद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटील यांनी आज संबंधितांना दिले.
मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत चांदूरबाजार येथे एमआयडीसी स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी एमआयडीसी (मुंबई)चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विकास पानसरेतेजुसिंग पवार,  एमआयडीसी अमरावतीचे प्रादेशिक अधिकारी श्री.फुके आदी उपस्थित होते.
याशिवाय अचलपूर तालुक्यातील एमआयडीसीचा भूगावपर्यंत विस्तार करण्याबातचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही श्री.पोटे-पाटील यांनी दिले. स्थानिकांना रोजगारउद्योगांना पोषक वातावरण मिळण्यासाठी सर्व सुविधायुक्त एमआयडीसीची आवश्यकता आहे. चांदूरबाजार येथे एमआयडीसी झाल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार असल्याचेही  श्री.पोटे-पाटील यांनी यावेळी सांगितले.
००००

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती