देशातील राहण्यायोग्य शहरांच्या यादीत महाराष्ट्राची बाजी पहिल्या दहा क्रमांकामध्ये राज्यातील सर्वाधिक 4 शहरांचा समावेश पुणे अव्वल स्थानी तर नवी मुंबई, बृहन्मुंबई व ठाणे शहरांचा समावेश


दिल्लीदि. 13 : देशात राहण्यायोग्य आणि जगण्यायोग्य शहरांच्या यादीमध्ये (ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) महाराष्ट्राने बाजी मारली असून पहिल्या दहा क्रमांकामध्ये अव्वल स्थानासह राज्यातील सर्वाधिक चार शहरांचा समावेश आहे. या यादीमध्ये पुण्याने अव्वल क्रमांक तर नवी मुंबई आणि मुंबईने अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक पटकाविला आहे. देशाच्या या यादीत पहिल्या तिन्ही क्रमांकावर महाराष्ट्राने मोहोर उमटवली आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी कार्य मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी नवी दिल्ली येथे देशातील जीवन सुलभ निर्देशांकामध्ये असणाऱ्या शहरांची यादी जाहीर केली. त्यात देशातील पहिल्या दहामध्ये महाराष्ट्रातील तब्बल चार शहरांचा समावेश झाला आहे. पुणेनवी मुंबई आणि मुंबईनंतर या यादीत ठाणे शहराने सहावा क्रमांक मिळवला आहे. यासहअन्य शहरांमध्ये तिरूपतीचंदीगडरायपूरइंदोरविजयवाडा आणि भोपाळ आहेत.
सुलभ जीवन निर्देशाकांचे (ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स) मूल्यांकन हे राष्ट्रीय तसेच जागतिक  स्तरावरील राहण्यायोग्य शहरांच्या आणि शाश्वत विकासाच्या मानांकनाच्या आधारावर करण्यात आलेले आहे.  जून 2017 मध्ये सुलभ जीवन निर्देशांक ठरविण्यात आले होते. 19 जानेवारी 2018 पर्यंत 111 शहरांचे मूल्यांकन करण्यात आले. यामध्ये संस्थात्मकसामाजिकआर्थिकभौतिक हे  चार मुख्य निकष लावण्यात आले असून यामध्ये 15 श्रेणींची वर्गवारी आणि 78  संकेताक दिलेले आहेत. या आधारे सुलभ जीवन शहर निर्देशांक ठरविण्यात आले.
देशातील 111 शहरांमध्ये महाराष्ट्र राज्यातील 12 शहरांनी सहभाग घेतला होता. त्यातील पहिल्या दहामध्ये सर्वाधिक चार शहरांचा समावेश असणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य आहे. त्यानंतर आंध्रप्रदेश व मध्यप्रदेश राज्यांचा क्रमांक लागतो. तर पहिल्या 20 शहरांमध्येही राज्यातील सर्वाधिक 6 शहरांनी क्रमांक पटकाविला असून आंध्रप्रदेश व मध्य प्रदेशातील प्रत्येकी तीन शहरांचा समावेश पहिल्या 20 क्रमांकामध्ये आहे. यामुळे राज्यातील सहभाग घेतलेल्या 12 शहरांपैकी पहिल्या वीस मध्ये 50 टक्के म्हणजे 6 शहरांनी बाजी मारली आहे. यामध्ये पुणे (1)नवी मुंबई (2)मुंबई (3)ठाणे (6)अमरावती (16) व वसई विरार (20) यांचा समावेश आहे.
ऊर्वरित नाशिक (21)सोलापूर (22)नागपूर (31)कल्याण डोंबिवली (50)पिंपरी चिंचवड (69) तर औरंगाबाद (97) या शहरांनी पहिल्या शंभर क्रमांकामध्ये स्थान मिळविले आहे.
संस्थात्मक आणि सामाजिक या आधारासाठी प्रत्येकी 25 गुण दिलेले आहे. 5 गुण हे आर्थिक आधारासाठी  तर 45 गुण भौगोलिक आधारासाठी देण्यात आलेले आहेत. निवडलेल्या चार आधारावरील अमलबजावणीसाठी कार्यशाळा देशभरातील राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशात घेण्यात आलेल्या होत्या.
 *संस्थात्मक आधारावरील 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातील 2 शहरे*
संस्थात्मक आधारावर सुलभ जीवन निर्देशाकांमध्ये निवड झालेल्या शहरांमध्ये नवी मुंबई व पुणे ही दोन शहरे महाराष्ट्र आहेत. यासह तिरूपतीकरीम नगरहैद्राबादबिलासपूरकोचीअहमदाबादविजयवाडाविशाखापट्टनमही आहेत. संस्थात्मक निकषासाठी 25 गुणाकंन निर्धारित केलेले होते.
  *सामाजिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील 4 शहरे*
सामाजिक आधारावर निवड झालेल्या निर्देशाकांमध्ये राज्यातील नवी मुंबईपुणेबृहन्मुंबईवसई-विरार या 4 शहरांचा समावेश आहे. यासह तिरूपतीतिरूचिरापल्लीचंदीगडअमरावतीविजयवाडाइंदोरया शहरांचा समावेश आहे. सामाजिक आधारावरील निकषासाठी 25 गुणाकंन देण्यात आले होते.
 *आर्थिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये 2 शहरे राज्यातील*
आर्थिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील पुणे आणि ठाणे या  2 शहरांचा सामवेश झालेला आहे. यामध्ये चंदीगडअजमेरकोटाइंदोरत्रिरूपूरइटानगरलुधियानाविजयवाडाया अन्य शहरांची निवड करण्यात आलेली आहे. आर्थिक आधारासाठी 5 गुणाकंन देण्यात आलेले होते.
 *भौतिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील सर्वाधिक 4 शहरे*
       भौतिक आधारावर निवडलेल्या शहरांमध्ये राज्यातील बृहन्मुंबईपुणेठाणेनवी मुंबई या चार शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे. यासह चंदिगडरायपूरतिरूपतीभोपालबिलासपूरविशाखापट्टनम या शहरांचा समावेश आहे. भौतिक आधारावर  निवडण्यासाठी 45 गुणाकंन देण्यात आलेले होते.
याशिवाय 40 लाख लोकसंख्येपेक्षा अधिक असलेल्या शहरांमध्ये उत्कृष्ट  व्यवस्थापनामध्ये  बृहन्मुंबईचेन्नईसूरत या शहरांचा समावेश आहे. 40 लाख लोकसंख्येपर्यतच्या शहरांमध्ये पुणेनवी मुंबईठाणे या शहरांचा सामावेश आहे.
अन्य मानाकंनांमध्ये महाराष्ट्रातील सोलापूरऔरंगाबादकल्याण-डोंबीवलीनागपूरअमरावतीनाशिक, पिंपरी-चिंचवड या शहरांचा समावेश आहे.  वेगवेगळया मानाकंनासाठी निवडण्यात आलेल्या देशभरातील राज्यांमधील अन्य शहरांची माहिती डॅशबोर्डवर देण्यात आलेली आहे. डॅशबोर्डसाठी hattps://smartnet.niua.org हे संकेतस्थळ देण्यात आलेले आहे.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती