देशातील पहिल्या पीपीपी तत्वावरील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्यावी



पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबईदि. 20 : महत्वाकांक्षी नागरी परिवहन प्रकल्प म्हणून घोषित केलेल्या आणि देशातील पहिला सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविण्यात येणाऱ्या पुणे येथील हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पास गती द्यावीअसे निर्देश देतानाच हा प्रकल्प मंजुरीसाठी कार्यकारी समितीकडे पाठविण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे झालेल्या बैठकीत घेतला.
मंत्रालयात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची बैठक झाली. यावेळी गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेतापुण्याचे  पालकमंत्री तथा अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट उपस्थित होते.
पुणे मेट्रो लाईन -3 प्रकल्प हा सार्वजनिक वाहतुकीचा व हिंजवडी येथील माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राला चालना देणारा प्रकल्प असून तो  सार्वजनिक खासगी भागीदारी पद्धतीने राबविला जाणार आहे. यावेळी प्रकल्पाच्या निविदा अटी व शर्तीं वर चर्चा करण्यात आली.  प्रकल्प मंजुरीसाठी कार्याकारी सामितीकडे पाठवण्याचा निर्णय यावेळी मुख्यमंत्र्यांनी घेतला.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून वाघोली बस डेपो निर्माण करण्यासाठी प्राधिकरणाच्या अखत्यारीतील मौजे वाघोली 1458 व अन्य ठिकाणची 7686 चौ.मी. भूखंड दीर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याने पुणे महानगर परिवहन महामंडळासाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने यावेळी मंजुरी दिली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकर व पुणे महानगर परिवहन मंडळ यांनी चर्चा करून अटी व शर्तीबाबत निर्णय घ्यावी असे निर्देश  मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाअंतर्गत विविध प्रकल्पाअंतर्गत बाधित होणाऱ्या कुटुंबाना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पीपीपी अंतर्गत उपलब्ध होणाऱ्या सदनिका प्राधान्यक्रमाने वितरीत करण्यास मान्यता मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास विकासकांनी सकारात्मक सहभाग नोंदविला असून 14  विकासकांकडून 22 हजार घरांची निर्मिती होणार आहे.
            प्राधिकरणाच्या हद्दीतील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बळकटीकरणासाठी हवेलीखेडमुळशीमावळपुरंदरशिरूरभोरवेल्हे या आठ तालुक्यातील 91 गावांमधीलसुमारे 99 तलावातून गाळ काढण्यात येणार आहे त्या कामास यावेळी मंजुरी देण्यात आली.
पुणे महानगर प्रदेशासाठी तयार करण्यात आलेल्या सर्वसमावेशक परिवहन आराखड्यास यावेळी मान्यता देण्यात आली. प्राधिकरण क्षेत्रामध्ये पाणी पुरवठा प्रकल्पासाठी विकासकांकडून निधी वसूल करणेपुणे रिंगरोड प्रकल्प याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्ष ममता गायकवाडमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशीवित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यु. पी. एस. मदानगृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव संजय कुमारनगरविकास विभाग प्रधान सचिव डॉ. नितीन करीरग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्तापुणे महापालिका आयुक्त सौरभ राव,  पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकरपुणे जिल्हाधिकारी नवलकिशोर रामजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी सूरज मांढरे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती