वजीरा येथील स्वयंभू श्री गणेश देवस्थानतर्फे केरळ पुरग्रस्तांसाठी २१ लाखांचा धनादेश


मुंबईदि. 29 : केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी बोरिवलीवजीरानाका येथील स्वयंभू श्री गणेश देवस्थानतर्फे २१ लाख रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आला.
यावेळी शिक्षण मंत्री विनोद तावडेदेवस्थान समितीचे पदाधिकारी माजी नगरसेवक विजय दारूवालेनगरसेवक गणेश खणकरनितीन पाटीलनरेश भोईरविश्वास रावतेविजय रावते,दिलीप पाटीलविशाल केणीशशिकांत वैती उपस्थित होते.
पुरग्रस्तांच्या मदतीसाठी राज्य शासनाने विविध पातळ्यांवर मदतीचा ओघ सुरू ठेवला आहे. राज्यातील जनताही आपल्या परीने मदत करत असून, आता राज्यातील मंदिर समितीट्रस्ट,सामाजिक संस्थाज्येष्ठ नागरिक संघराज्य परिवहन महामंडळाचे कर्मचारी आदींकडून मदत होत आहे. याशिवाय राज्य सरकारी अधिकारी व कर्मचारीही एक दिवसाचा पगार देणार आहेत.
सेफगार्ड सेक्युरिटी सर्व्हिसेसतर्फेही दोन लाखांची मदत
केरळ पुरग्रस्तांच्या मदतीसाठी सेफगार्ड सेक्युरिटी सर्विसेसतर्फे दोन लाखांची मदत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे आज सुपुर्द करण्यात आली. यावेळी सेफगार्डचे प्रमुख डॉ. बी.आर. कुमार (अग्रवाल)विकास अग्रवालअजय भट्टाचार्य आणि मनुभाव त्रिपाठी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती