Thursday, August 16, 2018

'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे


  मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्रया कार्यक्रमात 'गुणवत्तापूर्ण शिक्षणया विषयावर शालेय शिक्षणक्रीडा व युवक कल्याणउच्च व तंत्रशिक्षण मंत्री  विनोद तावडे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. १७ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.३० ते ८.०० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक शैलेश पेठे यांनी ही मुलाखत  घेतली आहे.
शालेय शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणारे 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियान', जिल्हा परिषद शाळेकडे विद्यार्थ्यांचा ओढा निर्माण होण्यासाठी शासन स्तरावर घेण्यात आलेले धोरणात्मक निर्णयविद्यार्थ्यांसाठी आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण त्यांचा कल कोणत्या शाखेकडे आहे यासाठी कलमापन चाचणीव्यवसायाभिमुख शिक्षण आणि ओजस आंतरराष्ट्रीय शाळा याविषयाची माहिती श्री. तावडे यांनी 'जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...