Wednesday, August 15, 2018

युवा माहिती दूत उपक्रमाचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ




                               
·         राज्यात एक लाख युवा माहिती दूत करणार योजनांचा प्रसार
अमरावती, दि. 15 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे ‘युवा माहिती दूत’ या उपक्रमाचा शुभारंभ पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळ्यानंतर  विभागीय आयुक्त कार्यालयातील सभागृहात झाला. या उपक्रमातून राज्यात एक लाख युवा माहिती दूत निवडण्यात येणार असून, त्यांची योजनांच्या पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे.    
विभागीय आयुक्त आमदार बच्चू कडू, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे,  जिल्हाधिकारी अभिजित बांगर, पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, पोलीस अधीक्षक दिलीप झळके, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार आदी यावेळी उपस्थित होते.  
माहिती दूत या उपक्रमाचा युवकांच्या समाजमाध्यमातील प्रभावी वापराचा शासकीय योजनांचा प्रसार करण्यासाठी लाभ होईल. हा उपक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी दिले.   उपक्रमाच्या लोगोचे आणि माहितीपत्रकाचे अनावरण यावेळी पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. योजनेची माहिती देणारी चित्रफीतही यावेळी दाखविण्यात आली.
 युनिसेफच्या सहयोगाने  उच्च शिक्षण विभाग आणि तंत्र शिक्षण विभाग यांच्या  प्रत्यक्ष सहभागाने  महासंचालनालयाच्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. विविध शाखांमध्ये पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयातील युवकांमार्फत शासकीय योजनांची माहिती प्रस्तावित लाभार्थ्यांपर्यंत थेटपणे पोहचविण्यात येणार आहे, अशी माहिती श्री. पवार यांनी प्रास्ताविकातून दिली.
या उपक्रमातून किमान एक लाख युवक राज्य शासनाच्या किमान 50 योजनांच्या माहितीशी जोडले जातील. या एक लाख युवकांमार्फत किमान 50 लाख प्रस्तावित लाभार्थ्याशी म्हणजेच किमान दोन ते अडीच कोटी व्यक्तींशी शासन जोडले जाईल, असेही श्री. पवार यांनी सांगितले. सहायक संचालक गजानन कोटुरवार यांनी आभार मानले. माहिती सहायक पल्लवी राऊत यांनी सूत्रसंचालन केले. माहिती सहायक विजय राऊत, मनीष झिमटे, सागर राणे यांनी संयोजन केले.  
                                                000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...