Posts

Showing posts from October, 2020

पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांची पाहणीमुलभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
पालकमंत्र्यांकडून विविध विकासकामांची पाहणी मुलभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत                     - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर          गावांचा सुनियोजित विकास करण्यासाठी प्रत्येक गावांत मुलभूत सुविधांची निर्मिती होणे आवश्यक असते. रस्ते, शाळा, दवाखाने, पिण्याचे पाणी, विज आदी सुविधांची निर्मिती करण्यासाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करुन दिला जातो. या निधीतून निर्माण होणाऱ्या मुलभूत सुविधांची कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार व्हावीत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी संबंधित शासकीय यंत्रणांना आज दिले.       मोर्शी तालुक्यातील विविध गावांतील विकासकामांची पाहणी पालकमंत्र्यांनी प्रत्यक्षपणे केली तसेच विविध दुर्घटनेत मरण पावलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना सांत्वना भेट दिली. त्यावेळी त्या बोलत होत्या.  उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तालुका कृषी अधिकारी श्रीमती राठोड यांच्यासह महसूल व कृषी विभागाचे अधिकारी दौराप्रसंगी उपस्थित होते.        श्रीमती ठाकूर म्हण

माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांना पालकमंत्र्यांकडून अभिवादन

Image
दादासाहेब गवई जयंती कार्यक्रम माजी राज्यपाल स्व. रा. सू. गवई यांना पालकमंत्र्यांकडून  अभिवादन       दिवंगत नेते,  माजी राज्यपाल रा. सू. उर्फ दादासाहेब गवई यांच्या जयंतीनिमित्त आज राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी दारापूर येथे स्व. गवई यांच्या स्मृतीस्थळी पुष्प वाहून अभिवादन केले.         न्यायमूर्ती भूषण गवई, आ बळवंतराव वानखडे, ऍड. दिलीप एडतकर, डॉ. राजेंद्र गवई, माजी जि. प. सभापती जयंतराव देशमुख, हरिभाऊ मोहोड,ऍड. उमेश इंगळे, हिम्मत ढोले, प्रा. राव, सरपंच अजित पटेल यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनीही स्वर्गीय रा. सु. गवई यांच्या स्मृतीवर गुलाबपुष्प वाहून आदरांजली वाहिली. ००००

शिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपयेनागरिकांचे हित जोपासण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
शिवभोजन थाळीचा दर मार्च अखेरपर्यंत पाच रुपये नागरिकांचे हित जोपासण्यासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध     - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर       शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत पाच रुपये एवढा करण्याचा निर्णय करण्याचा निर्णय मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. नागरिकांच्या हिताची जोपासना व विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिली आहे.        कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित नागरिकांसाठी निवारा केंद्रांची सुविधा देण्यासह गरजू नागरिकांसाठी शिवभोजन थाळीचे दरही कमी करण्यात आले. जानेवारी 2020 पासून 10 रुपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती.  कोरोना साथीमुळे मार्चपासून या थाळीची किंमत 5 रुपये एवढी करण्यात आली. गरजू व गरीब नागरिकांसाठी शिवभोजन थाळी ही आधार ठरली आहे. सुरुवातीला जिल्हा मुख्यालयी सुरू झालेल्या या योजनेचा नंतर विस्तार करण्यात आला. आता ती तालुकास्तरापर्यंत राबविण्यात येत आहे.        अमरावती जिल्ह्यात शिवभोजन योजनेअंतर्गत 22 केंद्रे का

नेत्रदान, अवयवदान उपक्रमासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य करू - महापौर चेतन गावंडे

Image
         हरिना नेत्रदान समितीतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम     नेत्रदान, अवयवदान उपक्रमासाठी महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य करू -           महापौर चेतन गावंडे अमरावती, दि. 28 :   नेत्रदान, अवयवदान व देहदानाबाबत जागृती व प्रोत्साहनासाठी अमरावती महापालिकेकडून संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे शहराचे महापौर चेतन गावंडे यांनी आज येथे सांगितले. समाधाननगरातील हरीना नेत्रदान समितीच्या स्व. मंगलजीभाई पोपट नेत्रालयातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम महापौर श्री. गावंडे यांच्या हस्ते झाला, त्यानिमित्त संस्थेच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, समितीचे अध्यक्ष मनोज राठी, उपाध्यक्ष चंद्रकांतभाई पोपट, सचिव अमित चांडक, सुरेंद्र पोफळी, शरद कासट, सुरेश जैन, शरणपालसिंग अरोरा, मनीष सावला, अशोक राठी, नरेश सोनी, मोनिका उमक, पप्पू गगलानी, धीरज गांधी, राजेंद्र वर्मा, सीमेश श्रॉफ, घनश्याम वर्मा, दिनेश वर्नदाणी, डॉ. विधळे, अविनाश राजगुरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महापौर श्री. गावंडे म्हणाले की, नेत्रदान,

अपंग व्यक्ती व महिला बचत गटांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’जिल्ह्यात 240 केंद्रांचे होणार वितरण - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
अपंग व्यक्ती व महिला बचत गटांना ‘आपले सरकार सेवा केंद्र’ जिल्ह्यात 240 केंद्रांचे होणार वितरण       -  जिल्हाधिकारी शैलेश नवाल        जिल्ह्यात 240 गावांत ‘आपले सरकार सेवा केंद्र’ स्थापन करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत असून, ही केंद्रे प्राधान्याने अपंग व्यक्ती व शासनमान्य महिला बचत गटांना देण्यात येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिली.         याबाबतचे अर्ज, सूचना, आदी माहिती www.amravati.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. इच्छूकांनी आपले अर्ज सेतू समिती (सेतू कक्ष), जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अमरावती येथे स्वत: उपस्थित राहून पाच नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाचपूर्वी सादर करण्याचे आवाहनही जिल्हाधिका-यांनी केले आहे.       एका गावासाठी अपंग व्यक्ती किंवा महिला बचत गट यापैकी कोणाचाही अर्ज प्राप्त न झाल्यास सर्वसाधारण उमेदवारांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येईल आणि त्यात सीएससी सेंटर कार्यरत असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.        अपंग व्यक्ती किंवा बचत गटाचे सदस्य हे त्या गावातील, प्रभागातील रहिवासी असावे. सर्वसाधारण अर्जदार

कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्समहिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी मायग्रंट सपोर्ट सेंटर्स महिला आर्थिक विकास महामंडळाचा उपक्रम              -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर           कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या व्यक्तींना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येत आहेत. त्याद्वारे स्थलांतरितांचे प्रश्न सोडविणे व रोजगार मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर दिली.        कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-व्यवसायांवर मर्यादा आल्या, अनेकांचा रोजगार हिरावल्याने त्यांना गावी परतावे लागले. अशा व्यक्तींना पुन्हा रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत मायग्रंट सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येणार आहेत.  बेरोजगारांना मार्गदर्शन, समुपदेशन, कौशल्य प्रशिक्षण यासह उद्योगांत उपलब्ध असलेल्या रोजगाराच्या संधी मिळवून देण्यात येणार असून, त्यासाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचाही वापर केला जाणार आहे. ऑक्टोबर 2020 ते मार्च 2021

यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वितरणऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य ठेवावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वितरण ऑनलाईन रोजगार मेळाव्यांत सातत्य ठेवावे           - जिल्हाधिकारी शैलेश नवाल        कोरोना संकटकाळात  ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा इच्छूकांना रोजगार मिळवून देण्यासाठी लाभ होत आहे. याद्वारे जिल्ह्यात 232 उमेदवारांची प्राथमिक निवड झाली आहे. यापुढेही या मेळाव्यांत सातत्य राखण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे दिले.        जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या कामकाजाबाबत आढावा बैठक, तसेच यशस्वी उमेदवारांना प्रमाणपत्राचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयात आज झाले, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहायक संचालक प्रफुल्ल शेळके, प्राथमिक शिक्षणाधिकारी ई. झेड. खान, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता एस. डी. वाडेकर, महिला व बालविकास विभागाचे अतुल भडांगे, नायब तहसीलदार एस. पी. थोटे, कृषी अधिकारी ना. स. धनवटे, व्ही. डब्ल्यू. भोयर, महापालिकेचे एस. बी. पाटील, पदवीधर अंशकालीन कर्मचारी संघाचे अध्यक्ष अनिल वरघट आदी यावेळी उपस्थित होते.         श्री. नवाल म्

पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपोषण मागे

Image
पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीने विद्यार्थी वाहतूक संघटनेचे उपोषण मागे          येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे सुरू असलेले अन्न, जलत्याग उपोषण राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांच्या मध्यस्थीने सोडविण्यात आले.          राज्य चालक मालक विद्यार्थी वाहतूक संघटनेतर्फे  स्कुलबसचालकांसमोरील विविध प्रश्नांबाबत अन्न, जलत्याग उपोषण सुरू करण्यात आले होते. या प्रश्नाबाबत कॅबिनेट, तसेच शासन स्तरावर मांडण्यात येईल व लवकरात लवकर शक्य त्या सर्व मागण्या पूर्ण होण्याबाबत सर्वतोपरी सहकार्य केले  जाईल, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले. संघटनेतर्फे अतुल खोंड यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ न दिल्यास फौजदारी करू- जिल्हाधिकाऱ्यांची विमा कंपन्यांना तंबी

Image
पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना तत्काळ न दिल्यास फौजदारी करू - जिल्हाधिकाऱ्यांची विमा कंपन्यांना तंबी ९ नोव्हेंबरपर्यंत मोबदला द्यावा             - जिल्हाधिकारी शैलेश नवाल          नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना शासनाकडून विमा संरक्षण दिल्या जाते. पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ठ आहे. जिल्ह्यात एआयसी कंपनीच्या (Agriculture Insurance Company of India Ltd.) पिकविम्या संदर्भात शेतकऱ्यांकडून अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. सदर कंपनीने त्रुट्यांचे तत्काळ निराकरण करुन येत्या 9 नोव्हेंबरपर्यंत पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज दिले. तसे न झाल्यास आपणाविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करुन फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशाराही त्यांनी बैठकीत दिला.       जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत कृषी विभागाचा आढावा श्री. नवाल यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिका

कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी सपोर्ट सेंटर्स - ॲड. यशोमती ठाकूर

Image
नांदुरा बु. येथील विकासकामांचे पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्नरत कोविड संकटकाळात नोकरी गेलेल्यांना रोजगार देण्यासाठी सपोर्ट सेंटर्स - ॲड. यशोमती ठाकूर          कोरोना प्रादुर्भावात नोकरी गेलेल्या तरूणांना पुन्हा रोजगार मिळवून देण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत सपोर्ट सेंटर्स उभारण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी नांदुरा. बु येथे दिली.         अमरावती तालुक्यातील नांदुरा बु. येथील रस्ता काँक्रिटीकरण, चौक सौंदर्यीकरण व इतर विकासकामांचे भूमिपूजन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी रणजित भोसले, तहसीलदार संतोष काकडे, पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.            पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, कोरोना संकटकाळात लॉकडाऊनमध्ये अनेक उद्योग-व्यवसायांवर मर्यादा आल्या, अनेकांचा रोजगार हिरावल्याने त्यांना गावी परतावे लागले. अशा व्यक्तींना पुन्हा रोजगाराच्या संधी मिळवून

भुखंड मिळूनही उद्योग न उभारणाऱ्यांना नोटीसा द्याव्यात - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
औद्योगिक वसाहत विकासाबाबत बैठक औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी एकसंध प्रयत्नांची आवश्यकता  भुखंड मिळूनही उद्योग न उभारणाऱ्यांना नोटीसा द्याव्यात - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर         जिल्ह्यातील मुख्यालयासह विविध तालुक्यांतील औद्योगिक वसाहतींच्या विकासासाठी एकसंध प्रयत्न आवश्यक आहेत. त्यासाठी सर्वदूर औद्योगिक विकासाच्या शक्यता लक्षात घेऊन त्यानुसार कृषी प्रक्रिया उद्योगासह विविध बाबींचा समावेश करून परिपूर्ण आराखडा तयार  करावा,  असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले. औद्योगिक वसाहतीत भूखंड मिळूनही अनेक वर्षे उद्योग सुरू न करणाऱ्यांना नोटीसा द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले.         जिल्हाधिकारी कार्यालय येथे  नांदगावपेठ, तसेच इतर तालुक्यातील औद्योगिक वसाहतीतील प्लॉटवाटप व मूलभूत सुविधांबाबत आढावा बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, माजी जि.प. सभापती जयंतराव देशमुख, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे विभागी

कोरोना उपचार व यंत्रणांसाठी सुमारे २६ कोटी २५ लक्ष खर्चसंख्या घटली, पण जोखीम अजूनही कायमदक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
कोरोना उपचार व यंत्रणांसाठी सुमारे २६ कोटी २५ लक्ष खर्च संख्या घटली, पण जोखीम अजूनही कायम दक्षता नियमांचे काटेकोर पालन करावे                -  जिल्हाधिकारी शैलेश नवाल          एप्रिलपासून आतापर्यंत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या विविध कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी सुमारे 26 कोटी 25 लाख 44 हजार रूपये निधीतून उपचार, आवश्यक यंत्रणा व इतर सुविधा पुरविण्यात आल्या. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. तथापि, धोका टळलेला नाही. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांतही नागरिकांनी दक्षता बाळगावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी केले आहे.           कोरोना प्रतिबंधासाठी एप्रिलपासून जिल्ह्यात विविध उपाययोजना राबविण्यात आल्या. पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांच्या मार्गदर्शनानुसार व पाठपुराव्याने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी अल्पावधीत अनेक सुविधा उभारण्यात आल्या, अशी माहिती जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दिली. ते म्हणाले की,  सुपर स्पेशालिटी रूग्णालयात स्वतंत्र कोविड रूग्णालय अत्यंत कमी काळात उभारण्यात आले. स्थानिक स्तरावर चाचणीची सुविधा असावी म्हणून संत गाडगेबाबा अमरावती विद

रेमेडेसिवीर व इतर औषधे विक्रीसंदर्भात प्रशासनाने काटेकोर नियंत्रण ठेवावे - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
रेमडेसिविरची किंमत २ हजार ३६० रू. निश्चित    रूग्णांना रेमडेसिविर उपलब्ध होण्यासाठी खासगी औषधे केंद्रेही निश्चित रेमेडेसिवीर व इतर औषधे विक्रीसंदर्भात  प्रशासनाने काटेकोर नियंत्रण ठेवावे                   -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर         खासगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना रेमडेसिविर इंजेक्शन वाजवी किंमतीत मिळावे यासाठी शासनाने त्याचे दर निश्चित केले आहेत. अमरावतीसह राज्यातील  प्रत्येक जिल्ह्यात  २ हजार ३६० रुपयांना हे इंजेक्शन उपलब्ध होण्यासाठी  एक औषध केंद्रही निश्चित करण्यात आले आहे. यामुळे रुग्णांना वेळेवर आणि वाजवी किंमतीत रेमडेसीविर इंजेक्शन मिळावे यासाठी  प्रशासनाने दक्षता घेण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले आहेत.         राज्यातील शासकीय रुग्णालयामध्ये हे औषध मोफत उपलब्ध आहे. परंतु खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना हे औषध मिळत नसल्याच्या अथवा महाग मिळत असल्याच्या तक्रारी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खाजगी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांना निश्चित

डिजीटली घराघरात जात महिला, बालकांचे पोषण करणार - ॲड. यशोमती ठाकूर

Image
डिजीटली घराघरात जात महिला, बालकांचे पोषण करणार   - ॲड. यशोमती ठाकूर ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ या डिजीटल व्यासपीठाचे उद्घाटन      कोरोना काळात स्तनदा माता, लहान बालके अशा 74 लाख लाभार्थ्यांना पोषण आहार पोहोचवण्याचे शिवधनुष्य विभागाने पेलले. आता ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ डिजिटल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून घराघरात जाऊन स्तनदा माता, बालकांचे पालक यांच्याशी संवाद साधत महाराष्ट्र सुपोषित केला जाईल, असा विश्वास महिला व बालविकास ॲड. यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला.       ‘तरंग सुपोषित महाराष्ट्राचा’ या आय.व्ही.आर. (इंटरॲक्टिव्ह वॅाइस रिस्पॅान्स) प्रणालीवर आधारित ॲानलाईन संवाद व्यासपीठाचे आज मंत्री ॲड. ठाकूर यांच्या हस्ते व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत उद्घाटन झाले. यावेळी सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त इंद्रा मालो, महिला व बाल विकास आयुक्त ऋषिकेश यशोद यांच्यासह राज्यातील जिल्हा महिला बाल विकास अधिकारी उपस्थित होते.      यावेळी ॲड. ठाकूर म्हणाल्या, कोरोना महामारीमुळे कठीण अशा काळातही विभागाच्या सातत्यपुर्ण प्रामाणिक प्रयत्नांमुळेच राष्ट्रीय पोषण माह

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठीसर्व विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यात येणार - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्यात येणार       - महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर        महिलांवरील अत्याचार हा संपूर्ण देशातच गंभीर प्रश्न आहे. या प्रश्नाच्या अनुषंगाने सर्व यंत्रणांची या संवेदनशीलता वाढवावी लागेल. राज्यात महिला व बालविकास विभागाच्या माध्यमातून गृह, परिवहन, शिक्षण आदींसह सर्वच विभागांच्या समन्वयातून काम करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, असे महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.       महिलांची सुरक्षा, संरक्षण या अनुषंगाने राज्यात महिला सुरक्षा ऑडिट करणे या अनुषंगाने या क्षेत्रात काम करणाऱ्या अशासकीय स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक आज सह्याद्री अतिथीगृह आयोजित करण्यात आली होती. यावेळी गृह राज्यमंत्री सतेज पाटील, महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती आय. ए. कुंदन, महिला व बाल विकास आयुक्त ऋषिकेश यशोद, राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा श्रीमती सुशीबेन शहा, अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक हरी बालाजी, बाल कल्याण समितीच्या माजी सदस्य श्रीमती नीला

मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात (सीएमईजीपी) ११५ अर्जांना मंजुरीयोजनेचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

Image
मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात (सीएमईजीपी) ११५ अर्जांना मंजुरी योजनेचा अधिकाधिक युवकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन            मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात (सीएमईजीपी) ११५ अर्जांना मंजुरी देतानाच, जिल्ह्यातून आणखी अर्ज येण्याची गरज व्यक्त करत त्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येथे दिले.           उद्योग विभागातर्फे मुख्यमंत्री रोजगारनिर्मिती कार्यक्रमात प्राप्त अर्जांवर निर्णय घेण्यासाठी बैठक जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे, जिल्हा अग्रणी बँकेचे समन्वयक जितेंद्रकुमार झा यांच्यासह माविम, समाजकल्याण, आदिवासी विकास विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.             योजनेत प्राप्त अर्जांची छाननी व मंजुरीची प्रक्रिया सभेत झाली. ही सर्व प्रकरणे बँकांना तत्काळ पाठवून कर्जाचे वितरण विहित कालावधीत करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी दिले.             योजनेत सुशिक्षित बेरोजगा

जिल्ह्यात 1 हजार 73 कोटी 94 लाख रू. कर्जवाटपशेतकरी बांधवांच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
खरीप पीक कर्जाचे गत पाच वर्षातील उच्चांकी वाटप  महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचा अनेकांना लाभ जिल्ह्यात 1 हजार 73 कोटी 94 लाख रू. कर्जवाटप शेतकरी बांधवांच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध  - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर         महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व विविध प्रयत्नांमुळे जिल्ह्यात खरीप कर्जवितरणाची टक्केवारी वाढून आता हे प्रमाण 62 टक्क्यांवर पोहोचले आहे. गत पाच वर्षांतील खरीप कर्जवितरणात हे सर्वाधिक प्रमाण आहे. त्यानुसार अद्यापपर्यंत 1 लाख 23 हजार 681 शेतकरी बांधवांना 1 हजार 73 कोटी 94 लाख रू. कर्जवाटप खरीप कर्ज वितरीत करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांच्या विकासासाठी महाविकास आघाडी शासन कटिबद्ध आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.           कोरोना संकटकाळात विविध क्षेत्रांपुढे नवनवी आव्हाने उभी राहिली. ग्रामीण कृषी अर्थकारणातही अनेक अडचणी उभ्या राहिल्या. या काळात विविध अडचणींवर मात करण्याचे प्रयत्न होत असतानाच शेतकरी बांधवांना खरीपाचे कर्ज वाटप सुरळीत व्हावे या हेतूने महात्मा ज

जिल्हाधिका-यांकडून दर्यापूर तालुक्यात कामांची पाहणी‘मनरेगा’मध्ये वैविध्यपूर्ण कामे राबवावीत - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
जिल्हाधिका-यांकडून दर्यापूर तालुक्यात कामांची पाहणी ‘मनरेगा’मध्ये वैविध्यपूर्ण कामे राबवावीत             - जिल्हाधिकारी शैलेश नवाल        मनरेगा योजनेत भरीव रोजगारनिर्मितीसह स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक वैविध्यपूर्ण कामांचा समावेश करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दर्यापूर दौ-यात प्रशासनाला दिले.        जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर, लेहगाव आदी विविध गावांना भेटी देऊन तेथील कामांची पाहणी केली. तहसीलदार योगेश देशमुख यांच्यासह तालुका प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते.           ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने अधिकाधिक कामे राबवावीत व या कामांत स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन वैविध्य ठेवावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.          लेहगाव येथे भेट देऊन जिल्हाधिका-यांनी नरेगाअंतर्गत पांदण रस्ता ,वृक्षलागवड कामाची पाहणी केली.  लेहगाव येथील भोलेश्वरी नदीच्या खोलीकरणाची पाहणीही त्यांनी केली. शेतकरी बांधवांना शेतात जाण्यासाठी आवश्यक सुविधा म्हणून बांध बांधण्य

पोलीस व सैन्यभरतीच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना विविध मैदाने खुली - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
पोलीस व सैन्यभरतीच्या सरावासाठी विद्यार्थ्यांना विविध मैदाने खुली - जिल्हाधिकारी शैलेश नवाल         कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणे बंद असल्याने पोलीस, सैन्यभरतीसाठी सराव करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. हे लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांसाठी आता विभागीय क्रीडा संकुलाप्रमाणेच शहरातील इतरही मैदाने खुली करून देण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.          याबाबत विद्यार्थ्यांकडून होणारी मागणी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी क्रीडा विभाग व संबंधित संस्थांची बैठक घेऊन विद्यार्थ्यांसाठी मैदाने खुली करून देण्याचा निर्णय घेतला. क्रीडा उपसंचालक गणेश जाधव, डॉ. विशाखा सावजी, डॉ. अंजली ठाकरे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.          कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर क्रीडांगणे बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे पोलीस, सैन्यभरतीसाठी प्रयत्न करणा-या विद्यार्थ्यांची गैरसोय होत होती. सरावासाठी त्यांना विभागीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर मोठी गर्दी होत होती. हे लक्षात घेऊन इतरही मैदाने विद्यार्थ्यांना खुली करून देण्यात आली आहेत. स

जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरणगरीब व गरजू बांधवांना लाभ - पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
जिल्ह्यात आतापर्यंत साडेतीन लाखांहून अधिक शिवभोजन थाळ्यांचे वितरण गरीब व गरजू बांधवांना लाभ -  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर         कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी जारी लॉकडाऊन, संचारबंदीच्या काळात गरजू बांधवांसाठी  शिवभोजन थाळीचे दर पाच रूपये करण्यात आले. त्याचप्रमाणे, या काळात योजनेंतर्गत जिल्ह्यात थाळ्यांची संख्या अडीच हजार प्रतिदिन एवढी वाढविण्यात आली. त्यानुसार साडेतीन लाखांहून अधिक थाळ्यांचे वितरण आतापर्यंत झाले. गरीब, वंचित व गरजू बांधवांना या योजनेचा लाभ मिळत असून, ही योजना आधार ठरली आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.            कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर राज्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. त्यानंतर राज्यात काम करणारे मजूर, स्थलांतरीत लोक, बेघर लोक तसेच बाहेरगावी अडकलेले विद्यार्थी आणि इतर सर्वच नागरिकांना शिवभोजन थाळीने मोठा आधार दिला. लॉकडाऊन काळात गरजू बांधवांचे जेवणाचे हाल होऊ नयेत म्हणून योजनेतील थाळीची किंमत  प्रति थाळी 5 रुपये इतकी करण्यात आली. बाजार समिती, रूग्णालये व इतर सार्वजनिक ठिकाण

पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी प्राप्त लसीकरण, टॅगींगचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी प्राप्त     लसीकरण, टॅगींगचे काम विहित मुदतीत पूर्ण करावे                            -   जिल्हाधिकारी शैलेश नवाल                 राष्ट्रीय पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात जनावरांमध्ये लाळखुरकत रोग प्रतिबंधासाठी सहा लाख 12 हजार लसी जिल्ह्यात प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार पशुधनाच्या शंभर टक्के लसीकरणासह टॅगिंगचे कामही विहित वेळेत करून घ्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी येथे दिले.        पशुरोग निर्मूलन कार्यक्रम समितीची बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच झाली, त्यावेळी ते बोलत होते. पशुसंवर्धन विभागाचे डॉ. मोहन गोहोत्रे, डॉ. राधेश्याम बहादुरे यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.        जिल्ह्यात सुमारे 5 लाख 94 हजार 569 एवढे पशुधन असून, पशुरोग निर्मूलन कार्यक्रमात सहा लाखांहून अधिक लसी, तसेच 5 लाख 99 हजार 56 टॅग प्राप्त झाले आहेत. संपूर्ण लसीकरणासाठी पुरेशी सामग्री प्राप्त आहे. या कार्यक्रमात विविध 168 संस्थांचे अधिकारी, कर्मचारी व तेवढेच प्रायव्हेट व्हॅक्सिनेटरच्या माध्यमातून लसीक

वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी - राज्यमंत्री बच्चु कडू

Image
वनौंषधी उत्पादन वाढीसाठी विभागीयस्तरीय समिती स्थापन करावी   - राज्यमंत्री बच्चु कडू Ø   कृषी विभागाच्या आढावा बैठकीत निर्देश अमरावती, दि. 20 :  पानपिंपळी, सफेदमुसळी व पानवेल या ‘आजीबाईच्या    बटव्या’तील अतिशय महत्वाच्या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेत समस्या निर्माण झाल्या आहेत. या वनौंषधीच्या उत्पादन प्रक्रियेतील अडथळे, पिक विम्याचे संरक्षण, वनौंषधीचे विपणन, बाजारपेठेची उपलब्धता आणि औषधी पिकांच्या संशोधनाला चालना देण्यासाठी विभागीयस्तरावर समिती स्थापन करावी, असे निर्देश राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी बैठकीत दिले. आज विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात विभागीय कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त पियूष सिंह, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अमरावतीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय चव्हाळे, यवतमाळचे नवनाथ कोळमकर, वाशिमचे शंकर तोटावार, अकोलाचे यू. एस. नलावडे, बुलडाणाचे नरेंद्र नाईक, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. के. बी. खोत उपस्थित होते. बच्चु कडु यांनी वनौंषधी उत्पादनांबाबतचा आढावा घेतांना सांगीतले

बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करा - जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू

Image
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी बाधित क्षेत्राचे तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईचे प्रस्ताव सादर करा                                         -जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू   अमरावती, दि. 20 : परतीचा पाऊस तसेच या अगोदर आलेल्या किडीचा प्रादुर्भाव यामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात शेती व शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. या संकटातून शेतकऱ्यांना सावरण्यासाठी शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी पंचनामे करण्याचे निर्देश देतानाच ही मदत दिवाळीअगोदर मिळण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करण्यात येतील, असे जलसंपदा राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी सांगितले.  नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांतील शेती पिकांची प्रत्यक्षपणे पाहणी श्री. कडू यांनी केली. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय चवाळे तसेच महसूल व कृषी विभागाचे अधिकारी यावेळी पाहणी दौऱ्यात उपस्थित होते. श्री. कडू म्हणाले की, परतीच्या पावसामुळे राज्यातील सर्वच भागातील शेत

विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत उपक्रम बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रमात 481 गावांचा समावेश - जिल्हाधिकारी शैलेश नवाल

Image
विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत उपक्रम  बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रमात 481 गावांचा समावेश                   -   जिल्हाधिकारी शैलेश नवाल          विदर्भ मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पांतर्गत बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रम जिल्ह्यातील 481 गावांमध्ये राबविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर व सकस चारानिर्मिती होईल. पशुसंवर्धनासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल, असा विश्वास जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज येथे व्यक्त केला.         जिल्हाधिकारी श्री. नवाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीची याबाबत नुकतीच बैठकही झाली. या समितीकडून बहुवार्षिक चारा लागवड कार्यक्रमात जिल्ह्यात 3 हजार 737 लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. 2 हजार 78 लाभार्थ्यांना बहुवार्षिक वैरण ठोंबे लागवडीसाठी वितरीत करण्यात आले आहेत. हायब्रीड, नेपिअर, डीएचन-6, 10 अशा विविध चाराप्रकारांचा त्यात समावेश आहे.  जिल्ह्यात सुमारे 45 लाख थोंब्यांचे वितरण झाले आहे. सुमारे 950 एकर क्षेत्रावर लागवड साध्य झाली असून, जिल्ह्यात सर्वदूर हा कार्यक्रम भरीवपणे राबविण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत.