Posts

Showing posts from January, 2017
Image
                    कॅशलेस इकॉनॉमीसाठी युवकांनी उत्प्रेरक म्हणुन काम करावे                                                      जिल्हाधिकारी                              * डिजीधन जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन           अमरावती, दि. 31 (जिमाका) :   कॅशलेस इकॉनॉमीसाठी राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा येाजनेच्या सर्व विद्यार्थ्यानी अमरावती  शहर 100 टक्के  कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करावे. युथ कॅन मेक अ चेंज ॲन्ड लेटस शो दॅट धीस कॅन बी डन असा आत्मविश्वासपुर्ण आशावाद जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज नियोजन भवन येथे आयोजित कार्यशाळेत केला.           महाराष्ट्र  डिजीधन जनजागृती कार्यक्रम कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके ,सहायक अग्रणी बॅक अधिकारी चौबे यासह मुख्यमंत्री कार्यालयातील   शिष्यवृत्तीधारक स्वप्नील पुरी ,सचिन अहीर, विवेक चिराणीया ,किर्ती खंडेलवाल ,ऋषीकेश सरोदे उपस्थित होते. यावेळी बोलतांना
Image
हुतात्मा दिनानिमीत्त मौन आदरांजली अमरावती जिमाका दि.30 - हुतात्मा दिनानिमीत्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात दोन मिनीट मौन पाळुन हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किरण ‍गित्ते अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेसी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभटटी जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके  व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 00000 वाघ/सागर/30-1 -2017/17-27 वाजता
Image
                           डिजीधन जागरूकता मोहीम              राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविणार         अमरावती, दि.27 (जिमाका): रोकडरहीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच डिजीटल पेमेट पध्दतीच्या प्रचार प्रसारासाठी राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी डिजीदुत म्हणुन काम करावे. उत्तम काम करणाऱ्या टिमला राज्यस्तरावर पुरस्कृत करण्यात येईल असे प्रतिपादन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयेाजित बैठकीत केले. बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेसी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके यासह समन्वयक ऋषीकेश सरोदे व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.                             या पथदर्शी कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्याची निवड करण्यात आली असुन 32 महाविद्यालयातील जवळपास 6 हजार एनएसएस स्वयंसेवकांमार्फत हा डिजीधन जागरूकता कार्यक्रम शहरात 30 जानेवारी ते 12 फेब्रुवारी या पहील्या टप्पयात राबविण्यात येईल. याच अनुषंगाने
Image
              विभागीय आयुक्तांनी घेतली पदवीधर उमेदवारांची बैठक         अमरावती, दि.29 : पदवीधर मतदारसंघासाठी आज निवडणुक निर्णय अधिकारी तथा  विभागीय आयुक्ता जे.पी गुप्ता यांनी आज विभागीय आयुक्त कार्यालयात सर्व उमेदवार व राजकीय पक्षाच्या प्रतिनीधींची बैठक घेतली.                  या बैठकीला निवडणुक निरीक्षक विकास देशमुख, पोलीस आयुक्त दत्तात्रय मंडलिक  विभागातील सहाय‍क निवडणुक निर्णय अधिकारी अमरावती जिल्हाधिकारी किरण गित्ते, बुलढाणा जिल्हाधिकारी विकास झाडे, वाशिम जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी, यवतमाळ जिल्हाधिकारी संचिद्रप्रताप सिंग, अधिकारी उपस्थित होते.     सहायक निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना आज डमी मतपत्रीका उपलब्ध करुन देण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. पदवीधर निवडणुकीसाठी उजव्या हाताच्या तर्जनीला शाई लावण्यात येईल. निवडणुक आयोगाने दिलेल्या परवानगीनुसार मतमोजणीसाठी  14 ऐवजी 30 टेबलवर  होणार असल्याने मतमोजणी वेगात होईल. मतदान केंद्रापासुन 200 मिटर वाहन लावता येणार नाही. राजकीय पक्षांना 200 मिटर परिसराच्या अतंरावरुन  मतदारचिठ्ठी देता येईल. मतदानाच्या दिवशी सकाळी 7 वाजता
Image
    चिखलदरा महोत्सव उत्साहात करा विभागातील प्रत्येक जिल्हयात पर्यटन महोत्सव आयोजित करावा विभागीय आयुक्त         अमरावती,दि. 29 : चिखलदरा  महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर विभागातील अन्य जिलहयांनी पर्यटन महोत्सव आयोजित करावेत अशी सुचना विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता यांनी दिल्या. चिखलदरा महोत्सवाच्या आयोजनाचा आढावा घेण्यासाठी आयेजित बैठकीत बोलत होते.                     या बैठकीला विभागातील अमरावती जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किरण गित्ते,बुलढाणा जिल्हाधिकारी विकास झाडे,वाशिम जिल्हाधिकारी राहुल व्दिवेदी,जिल्हाधिकारी यवतमाळ संचिद्रप्रताप सिंग,धारणी उपविभागीय अधिकारी षण्मुखराजन चिखलदरा  नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डीले, प्रवीण येवतीकर व इतर अधिकारी उपस्थित होते. अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी यांनी गेल्या बैठकीतील मुद्यांना अनुसरून माहिती दिली. आयुक्त म्हणाले की पर्यटनवाढीसाठी चिखलदऱ्यांच्या धर्तीवर बुलडाणा जिल्हयात येत्या मार्च महिन्यात लोणार महोत्सव होत आहे. अकोला जिल्ह्यातही नरनाळा महोत्सव असतो.पर्यटन महोत्सवाच्या निमीत्ताने स्थानिक  कलावंताना प्रोत्साहन मिळते.    
Image
वॉटर कप स्पर्धेमुळे धारणीची समृध्दीकडे वाटचाल सुरु होईल                                                 - जिल्हाधिकारी * स्पर्धेत सहभागी होणारा पहिला आदिवासी तालुका * 109 गावांचा सहभाग   * म.ग्रा.रो.ह यो   मध्ये काम करण्यास सवलत.           अमरावती, दि 28 : निसर्गाने समृद्धीच दान मेळघाटला दिल आहे. इथे पावसाळ्यात 1200 मिलीमीटर पाऊस पडतो. पण   उन्हाळ्यात इथे वन्यजीवांसोबतच माणसांनाही पाण्यासाठी भटकावे लागते. कारण याभागात पडणारे पावासाचे पाणी   वाहून जाते. वॉटर कप स्पर्धेमुळे पावसाचे पाणी अडवून साचलेल्या पाण्यातून धारणी तालुक्याची समृद्धीकडे वाटचाल सुरु होईल. यासाठी प्रत्येक गावाने सत्यमेव जयते वॉटर कप   स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी केले.           पाणी फाउंडेशन च्या वतीने आयोजित वॉटर कप स्पर्धा-2 मध्ये यावर्षी धारणी तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. धारणी हा महाराष्ट्रातील या स्पर्धेत सहभागी होणारा एकमेव आदिवासी तालुका आहे. त्यासाठी आज धारणी येथे आयोजित   पहिल्या   कार्यशाळेत   मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते. या कार्यशाळेला पाण
Image
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण                                                      अमरावती, दि.26 : भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन समारंभ जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याहस्ते सकाळी 8-10 वाजता ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले त्यानंतर राष्ट्रध्वजास सलामी दिली. तसचे जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित अधिकारी व मान्यवरांना प्रजासत्ताकाच्या शुभेच्छा दिल्या.           यावेळी अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परेदशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, जिल्हा पुरवठा अधिकारी डि.एस.वानखडे, उपजिल्हाधिकारी प्रविण ठाकरे, परिविक्षाधिन आय.ए.एस. अधिकारी राहुल करडिले, विनोद शिरभाते, गजेंद्र बावने, जिल्हा नियोजन अधिकारी रविंद्र काळे, जिल्हा सुचना अधिकारी रणवीर, तहसिलदार सुरेश बगळे, विशेष कार्यअधिकारी अनिल भटकर, विधी अधिकारी ॲड.नरेंद्र बोरा, माहिती अधिकारी शैलजा वाघ-दांदळे तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 00000 वाघ/बारस्कर/सागर/26-01-2017/ 11-25  वाजता
Image
भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभात ध्वजारोहण           अमरावती, दि.26 : भारतीय प्रजासत्ताकाचा 67 वा वर्धापन दिन समारंभ जवाहरलाल नेहरु स्टेडियम येथे उत्साहात साजरा झाला. पालकमंत्री  प्रविण पोटे यांच्याहस्ते मुख्य शासकीय समारंभात सकाळी 9-15 वाजता ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर लगेच राष्ट्रगीत झाले त्यानंतर सर्वांनी राष्ट्रध्वजास सलामी दिली.           यावेळी स्वातंत्र्य संग्राम सैनिक, विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, अतिरिक्त विशेष पोलिस महानिरीक्षक विजयसिंह जाधव, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलीक, राज्य राखीव पोलिस बल गटाचे समादेशक जी.बी.डाखोरे, पोलिस अधिक्षक लखमी गौतम, माजी राज्यमंत्री वसुधाताई देशमुख, मनपा आयुक्त हेमंत पवार, प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी जे.एन.आभाळे, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्धभट्टी, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थींनी, वरिष्ठ पत्रकार, जेष्ठ नागरिक उपस्थित होते.           पालकमंत्री प्रविण पोटे यांनी स्वातंत्र
               पदवीधर मतदारसंघाचा निवडणुक कार्यक्रम जाहीर                           निवडणूक 3 फेब्रुवारी रोजी          अमरावती, दि. 5 (जिमाका) : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असुन निवडणूक  कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. अधिसुचनेचा प्रसिद्धी दिनांक 10 जानेवारी, 2017 आहे. नामनिर्देशित पत्र दाखल करण्याचा अंतिम दिनांक 17 जानेवारी, असून दिनांक 18 जानेवारी रोजी नामनिर्देशित पत्रांची छाननी करण्यात येईल. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस 20 जानेवारी असून 3 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजेपासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येईल. 6 फेब्रुवारी रोजी मतमोजणी करण्यात येईल. दिनांक 9 फेब्रुवारी पूर्वी निवडणूक प्रक्रीया पूर्ण करण्यात येईल. मतदार यादी 7 जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात आली आहे. मतदारांनी त्यांच्या नावाची खातरजमा करावी . दिनांक 4 जानेवारी पासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली असून अमरावती ‍ जिल्हयामध्ये आदर्श आचार संहितेचे पालन करावे असे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. 000000 वाघ/दि.05-01-2017/15-40 वाजता
Image
सामान्य जनतेला उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देणार पालकमंत्री प्रविण पोटे * पालकमंत्र्यांच्या हस्ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचे लोकार्पण           अमरावती, दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणार यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे व वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या भर्तीसाठी पाठपूरावा करणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी शिरजगाव कसबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी केले.           यावेळी व्यासपिठावर चांदूर बाजार नगरपालिकेचे नगाराध्यक्ष रवीभाऊ पवार, जिल्हा परिषद सदस्य मनोहर सुने, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, मोहनलाल साबू, सरपंच अविनाश बदकुले उपस्थित होते.           पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते आज शिरजगाव कसबा, मोथा ता.चिखलदरा, पथ्रोट या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाले. शिराळा येथील नाला खोलिकरण, सुरळी येथील व्यायाम शाळेचे भूमिपूजन, करजगाव व चांदूर बाजार येथील कामांचे भूमिपूजन सुद्धा पालकमंत्र्याहस्ते पार पडले.           यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, शिरजगाव कसबा ये
Image
 चिखलदरा पर्यटन महोत्सवात यंदा आठवडाभराची मेजवाणी * फेब्रुवारीच्या  12 ते 18 दरम्यान होणार महोत्सव पालकमंत्री प्रविण पोटे यांनी घेतला आढावा         अमरावती, दि. 03 : चिखलदरा पर्यटन महोत्सव हा तीन दिवसाऐवजी आठवडाभराचा करावा व यामध्ये स्थानिक कलावंताचा सहभाग घ्यावा अश्या सुचना  पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज दिल्या. यामुळे पर्यटकांना यावर्षी आठवडाभर सास्कृंतीक कार्यक्रमाची मेजवाणी मिळणार आहे.                         जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चिखलदरा महोत्सवाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार प्रभुदास भिलावेकर , नगर परिषद चिखलदऱ्याचे अध्यक्ष राजेंद्रसिह सोमवंशी,  जिल्हाधिकारी किरण गित्ते,  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण कुळकर्णी  व इतर अधिकारी उपस्थित होते.             अतिरिक्त जिल्हाधिकारी परदेशी यांनी या पुर्वीच्या झालेल्या बैठकांची माहिती यावेळी दिली.  महोत्सव आयोजनाचा कालावधी 12 ते 18 फेब्रुवारी राहणार असुन पर्यटनमंत्री व इतरांना यासाठी आमंत्रित करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.महोत्सवादरम्यान खादय महोत्सव, साहसी खेळांचे आयेाजन ,मेळघाटा