2022 पर्यंत सर्वांसाठी घरे उपलब्ध करुन देणार
पालकमंत्री प्रविण पोटे
       अमरावती, दि.31 (जिमाका) : सामान्य लोकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांसाठी घरे 2022 ही महत्वकांक्षी योजना आणली असुन देशातील प्रत्येकाला 2022 पर्यंत स्वत:च्या हक्काच घर उपलब्ध करुन देणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज शिव नगर व महेंद्र कॉलनी येथील जिल्ह्यातील प्रधानमंत्री आवास योजनेच्या पहिल्या घरकुल लाभार्थी नंदा पोपटराव मळेकर यांच्या घराचे भूमिपूजन आज यांनी केले.  राजू ओढेकर यांच्यादेखील घराचे भूमिपूजन पालकमंत्र्यांहस्ते झाले 
          यावेळी मनपा आयुक्त हेमंत पवार, नगरसेविका कुसुमताई साहू, रेखाताई तायवाडे, नगरसेवक धिरज हिवसे, विवेक कलोती उपस्थित होते.
          स्वत:च्या घराच प्रत्येक सर्वसामान्यांचा स्वप्न असते. अन्न, वस्त्र, निवारा ह्या मानवाच्या मुलभूत गरजा आहे. घरांच्या किंमती सर्वसामान्यांना बरेचदा परवडणाऱ्या नसतात. मात्र या योजनेद्वारे समाजाच्या शेवटच्या घटकातील लोकांना निवारा उपलब्ध होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गतीमान कार्यप्रणालीमुळे सर्वांसाठी घरे 2022 हे पुर्ण करण्यासाठी शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी कटिबद्ध आहे असे उद्गार पालकमंत्री प्रविण पोटे यांनी काढले.
          अमरावती महानगरपालिका मध्ये या योजनेंतर्गत मागणी सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये आतापर्यंत 53 हजार 796 अर्ज प्राप्त झाले असुन मनपा अमरावतीकडून मार्च-16 मध्ये घटक 3 मधील 860 घरांचा व घटक 4 मधील 6 हजार 158 घरांचा प्रस्ताव शासनास सादर करण्यात आलेला आहे. त्यानूसार राज्य शासनाने दोन्ही प्रस्तावास मंजुरी देवून ते केंद्र शासनास मान्यता व सनियंत्रण समितीच्या मंजुरी करीता पाठविण्यात आले आहे. या घरांसाठी योजनेतील लाभार्थ्याने स्वखर्चाने चौथऱ्या पर्यंत बांधकाम केल्यावर लाभार्थ्याला पहिला टप्पा देण्यात येईल. पहिला टप्पा 40 टक्के प्लिंथ लेवल, दुसऱ्या टप्प्यात 40 टक्के स्लॅब लेवल, तिसऱ्या टप्प्यात 20 टक्के फिनिशिंग लेवल बांधकाम पुर्ण झाल्यावर अशा पद्धतीने अनुदान लाभार्थ्याच्या थेट बँक खात्यात गोळा होणार आहे.
00000

वाघ/गावंडे/सागर/दि.31-12-2016/15  वाजता





Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती