Thursday, January 5, 2017

जिल्हाधिकारी कार्यालयात
मायक्रो एटिएम ची सुविधा
          अमरावती दि.29 (जिमाका): सर्वसामान्यांची गरज लक्षात घेता येथील जिल्हाधिकारी कार्यालयात एक्सीस बँकेने मायक्रो एटिएम सुविधा सुरुवात केली असून विभागीय आयुक्त  जे.पी.गुप्ता यांच्या हस्ते या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक, मनपा आयुक्त हेमंत पवार, एक्सीस बँकेचे शाखा व्यवस्थापक आल्हाद कलोती, मनिष उइके, व्यवस्थापक अतूल अरके, अर्पित मिश्रा, सागर हरणे, सिद्धार्थ लांडगे, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातूरकर, उप जिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, प्रविण ठाकरे, गजेंद्र बावणे, सुभाष वानखेडे, तहसिलदार सुरेश बगळे, आदी उपस्थित होते.
          जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज मोठ्या संख्येने नागरिक येत असतात. कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बँकांतील एटिएमची मोठी रांग कमी करुन सामान्यांना त्याचा अधिक लाभ मिळावा यासाठी एक्सीस बँकेने जिल्हाधिकारी कार्यालयात मायक्रो एटिएम सुविधा सुरु केली असल्याचे शाखा व्यवस्थापक आल्हाद कलोती यांनी सांगितले. मायक्रो एटिएम छोटे यंत्र असून त्यावर एटिएम कार्ड स्विप केल्यावर आपणास पाहिजे असलेली रक्कम बँकेचे कर्मचारी देतात. आवश्यकतेनुसार जिथे नेटवर्क रेंज आहे अशा ठिकाणी हि सुविधा हलविता येते. ग्राहकांचा प्रतिसाद आणि गरजेनुसार ही सुविधा वाढविण्याचा मानसही कलोती यांनी यावेळी व्यक्त केला.
          यावेळी बॅंक ग्राहक महेश दुबे यांनी एटिएम कार्ड स्विप केल्यानुतर विभागीय आयुक्त गुप्ता यांच्याहस्ते महेशला रक्कम देण्यात आली. प्रारंभी कलोती, व मनिष उईके यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

                                                00000




No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...