पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते
विकासकामांचे भूमिपुजन संपन्न
       अमरावती, दि.03 (जिमाका) : पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते आज विशेष प्रकल्प विभागांतर्गत येत असलेल्या कामांचे भुमिपूजन संपन्न झाले.
            अमरावती जिल्ह्यातील वलगाव कुंड पांढरी निंभोरा रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. 12/0 ते 15/0 रामा 298 (पांढरी गावाजवळ) अंदाजित किंमत 150 लक्ष, अमरावती जिल्ह्यातील खोलापूर ऋणमोचन आसरा रस्त्याची रुंदीकरणासह सुधारणा करणे कि.मी.33/00 ते 35/500 रामा 301 (आसरा फाटा पुढे म्हैसांग फाट्याजवळ) अंदाजित किंमत 100 लक्ष, निंभा ते निंभा फाटा गणोरी भातकूली गणोजादेवी रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. 23/00 ते 25/00 व 32/00 ते 33/00 (निंभा फाट्याजवळ) अंदाजित किंमत 50 लक्ष, गणोजादेवी ते दाढी रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. 11/00 ते 14/00 प्र.जि.मा.-24 (गणोजादेवी गावाजवळ) अंदाजित किंमत 100 लक्ष, गणोरी व भातकूली रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा 82 कि.मी. 0/00 ते 2/00 (गणोरी गावाजवळ) अंदाजित किंमत 57.69 लक्ष, गणोरी व भातकुली रस्त्याची सुधारणा करणे 2/00 ते 4/00 (गणोरी गावाजवळ) अंदाजित किंमत 57.68 लक्ष, गणोरी बहादूरपूर रस्त्याची सुधारणा करणे ग्रामा 26 कि.मी. 0/00 ते 3/00 (गणोरी गावाजवळ) अंदाजित किंमत 57.69 लक्ष रुपये आहे. यावेळी स्थानिक आमदार रवी राणा व संबंधित गावांचे सरपंच व ग्रामस्थ उपस्थित होते.
            मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन 2015-16 या वित्तीय वर्षातील भूमिपूजन अमरावती जिल्ह्यातील रामा 280 राजुरा मासोद वडगाव शेवती नांदगाव रस्ता (एमआरएल-03) अंदाजित किंमत 241.27 लक्ष, अमरावती जिल्ह्यातील भातकुली येथे ग्रामा 43 ते काकरखेडा रस्ता (एलआर-15) अंदाजित किंमत 69.60 लक्ष, अमरावती टाकळी जहांगिर ते अंगाडा रस्ता (एमआरएल-06) अंदाजित किंमत 82.35 लक्ष. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सन 2016-17 या वित्तीय वर्षातील भूमिपूजन चांदूर बाजार रामा-278 (दहिगाव) रसुलपूर कृष्णापूर रस्ता (एमआरएल-07) अंदाजित किंमत 282.22 लक्ष रुपये या कामाचेही भूमिपूजन आज पालकमंत्र्यांच्या शुभहस्ते झाले.
            पुर्णा नगर साऊर शिराळा रस्त्यावर साऊर गावाजवळ सा.क्र. 10/400 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे (साऊर गावाजवळ) अंदाजित किंमत 97.66 लक्ष, आसरा-हरताळा नवथळ विर्शी मार्की रस्त्याची सुधारणा करणे कि.मी. 25/00 ते 29/00 प्र.जि.मा.-4 (हातखेडा ते मार्की स्थळ हातखेडा गावाजवळ) अंदाजित किंमत 100 लक्ष रुपये कामाचे भूमिपूजन पालकमंत्र्याच्याहस्ते झाले. तिवसा मतदार संघातील कामांमध्ये आमदार ॲड.यशोमती ठाकुर उपस्थित होत्या. रेवसा गावातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पालकमंत्री प्रविण पोटे यांनी हारार्पण केले व निर्माणाधिन सभागृहाच्या कामाच्या प्रगतीची माहिती घेतली.
00000

वाघ/गावंडे/हरदुले/दि.03-12-2016/18-22 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती