अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी कार्यक्रम-2016
विभागात 82 हजार 352 मतदारांची नोंदणी
* सर्व पदवीधरांनी नोंदणी करावी प्रशासनाचे आवाहन

       अमरावती, दि. 2 (जिमाका) : अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी कार्यक्रम, 2016 अंतर्गत अमरावती विभागात 82 हजार 352 मतदार नोंदणी झाली असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. सन 2015 मधील मतदारांची संख्या 1,67,628 होती सन 2016 च्या तुलनेत 85 हजार 276 पदवीधरांनी नाव नोंदणी केलेली नाही. लोकशाही बळकट करण्यासाठी सर्व पदवीधरांनी मतदानासाठी मतदार नोंदणी करणे आवश्यक असुन अजुनही चार दिवस उरले आहेत. सर्व पदवीधरांनी अमरावती विभाग पदवीधर मतदार संघ नोंदणी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.
          अमरावती विभागातील जिल्हानिहाय मतदार नोंदणीचा तपशिल पुढीलप्रमाणे. कंसात दिलेली आकडेवारी सन 2015 मधील पदवीधर मतदार संख्या दर्शविते.

          विभागीय आयुक्त कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती 33817 (63730), अकोला 14348 (36105), यवतमाळ 12102 (30804), बुलडाणा 13131 (25045), वाशिम 8954 (11944)

          सर्व मतदारांना सुचित करण्यात येते की, त्यांनी तात्काळ आपली मतदार नाव नोंदणी करावी असे आवाहन जिल्हा निवडणुक शाखेकडून करण्यात आले आहे.  
00000

काचावार/गावंडे/दि.02-11-2016/16-30 वाजता

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती