Thursday, January 5, 2017

सर्व बँकांत नवीन चलनाचे व्यवहार सुरळीत
जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्याकडून पहाणी
*जुन्या नोटा बदलून नव्या देणे,डिपॉझिट,पेमेंटसाठी जादा काऊंटर
सर्व बँकांत चोख बंदोबस्त, व्यवहार शिस्तीत
11 नोव्हेंबर पासून एटिएम वर नवीन चलन व 100 च्या नोटा मिळणार

          अमरावती, दि.10-(जिमाका): केंद्र शासनाने दि.8 नोव्हेंबर,16 च्या मध्यरात्रीपासून देशात 500 व 1000 रु.च्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानुसार अमरावती जिल्ह्यात सर्व बँकांमध्ये नवीन चलनाचा पुरेसा साठा उपलब्ध करुन ठेवण्यात आला असून निर्देशानुसार ग्राहकांना जुन्या नोटा बदलुन नविन चलन देणे, जुन्या नोटा डिपॉझिट म्हणून स्वीकारणे आणि मर्यादेनुसार त्यांना पेमेंट देण्यासाठी जादा काऊंटर उघडण्यात आलेले आहेत.  जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी भारतीय स्टेट बँकेच्या शहरातील कँप शाखेत तसेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाम चौकातील मुख्य शाखेस भेट देऊन पहाणी केली. बँक व्यवस्थापकांना आवश्यकते निर्देश देऊन ग्राहकांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करुन देण्याचे निर्देश दिले. त्यांच्या समवेत पोलिस उपायुक्त आयुक्त विवेक पानसरे उपस्थित होते.

          शहरातील कँप शाखेतील सहा. महाप्रबंधक रमेशकुमार सिंह यांनी जिल्हाधिकारी गित्ते व पानसरे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकेतील गर्दीत जाऊन ग्राहकांशी चर्चा केली. बँकेकडून स्वतंत्रपणे एक्सचेंजसाठी तसेच डिपॉझिट,पेमेंट आणि शासकीय पेमेंटसाठी स्वतंत्र चार काऊंटर सुरु केले आहेत. दोन हजार रुपयांचे नवीन चलन ग्राहकांना देण्यात येत आहे. दि.11 नोव्हेंबर,16 पासून एटिएमवर रक्कमा काढता येणार आहेत. सद्यस्थितीत 100 रुपयांच्या तुटवडा लक्षात घेता एटिएमवर 100 रुपयांच्या नोटा उपलब्ध करुन देण्यात येतील अशी माहिती सहाय्यक महाप्रबंधक रमेशकुमार सिंह यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

          स्टेट बॅंक ऑफ इंडियाच्या शाम चौकातील मुख्य शाखेला जिल्हाधिकारी गिते यांनी भेट देऊन पहाणी केली. तेथेही मोठ्या रांगा दिसून आल्या. सर्व व्यवहार शांततेत चालू ठेवावेत, कायदा सुव्यवस्था निर्माण होणार नाही तसेच व्यवस्थेचा दुरुपयोग होणार नाही याची बँक प्रशासनाने काळजी घेण्याच्या सुचना यावेळी त्यांनी केल्या.  

                                                00000









No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...