Thursday, January 5, 2017

मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांची
सेमाडोह, मोझरीटिपॉईंट, पंचबोलपॉईंट, आणि कोलखास पर्यटन स्थळास भेट
पर्यटनवाढीसाठी केलेल्या उपक्रमाची माहिती घेतली
अमरावती दि.11- राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी आज चिखलदरा येथील मोझरीटी पॉईंट, पंचबोल पॉईंट, सेमाडोह येथील वन विभागाचे संकूल, आणि कोलखास येथील शासकीय विश्रामगृहास भेट देऊन वन्यजिव विभागाने तसेच वन विभागाने केलेल्या पर्यटनवाढीच्या उपक्रमांची माहिती घेतली.
          विभागीय आयुक्त जे.पी. गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, व्याघ्र प्रकल्पाचे संचालक डॉ.दिनेशकुमार त्यागी, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण कुलकर्णी,अप्पर आदिवासी विकास आयुक्त गिरीष सरोदे, प्रकल्प अधिकारी षण्मुख राजन, गुगामल वन्यजिव विभागाचे उप वनसंरक्षक रविंद्र वानखेडे, पूर्व मेळघाट वन्यजिव विभागाचे  ,आदी उपस्थित होते.
          सेमाडोह येथील वन्यजिव विभागाच्या संकुलात शीघ्रकृती दलाच्या महिला व पुरुष वन निरिक्षकांशी संवाद साधला. संचालक डॉ.दिनेश त्यागी यांनी मुख्य सचिव क्षत्रिययांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सेमाडोह संकुल पर्यटन वाढीसाठी वन्यजिव विभागाच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या सोयी सुविधांची माहिती दिली. पर्यटन वाढीसाठी संकुल परिसर नजिक नदिमध्ये बंधारा बांधल्यास तेथे बोटिंग पॉईंटची निर्मिती करण्यासंदर्भात त्यांनी प्रशासनांना सुचना केल्या.  पंचबोल पॉईंट येथेही पर्यटकांची मोठी गर्दी नेहमीच असते. तेथे रस्ते आदीच्या सोयी वाढविण्यासाठी सुचना केल्या. 
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्यावतीने परिसरात वन्यजिवांसाठी करण्यात आलेल्या पानवठ्यांची तसेच मचान आदिसुविधांची पहाणी केली. वन्य जिववाढीसाठी तसेच संरक्षणासाठी विभागाने केलेल्या प्रयत्नाची माहिती दिनेश त्यागी आणि रविंद्र वानखेडे यांनी दिली.

000








No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...