Thursday, January 5, 2017

मुख्य सचिवांचा महसुल प्रशासनाच्या वतीने सत्कार
          अमरावती, दि.10 (जिमाका): मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रीय यांचा आज सपत्नीक सत्कार महसुल प्रशासनाच्या वतीने करण्यात आला. यावेळी विभागीय आयुक्त जे.पी.गुप्ता, जिल्हाधिकारी किरण गित्ते, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.किरण कुळकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंग परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर, उपजिल्हाधिकारी प्रविण ठाकरे यासह सर्व विभागांचे वरिष्ट अधिकारी उपस्थित होते.
          यावेळी अमरावतीमध्ये माझ्या सेवेचा बराच कालखंड असल्याने मला अमरावती विषयी ऋणानुबंध आहे असे भावोद्गार मुख्य सचिवांनी काढले. महसुल विभागातील प्रधान सचिव असतांना स्वाधीन क्षत्रीय यांनी घेतलेल्या महाराजस्व अभियान व विभागाअंतर्गत महत्वाच्या निर्णयामुळे महसुल प्रशासन लोकाभिमूख झाले. यावेळी भेटवस्तू, पुष्पगुच्छ देवून मुख्य सचिवांनाच सपत्नीक सत्कार जिल्हाधिकारी किरण गित्ते व महसुल विभागाच्या इतर अधिकारी केला. या सत्काराचे संचालन प्रविण ठाकरे तर आभार प्रदर्शन सुरेश बगळे यांनी केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...