सामान्य जनतेला उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देणार
पालकमंत्री प्रविण पोटे
* पालकमंत्र्यांच्या हस्ते तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतींचे लोकार्पण  

        अमरावती, दि. 4 (जिमाका) : सर्वसामान्य जनतेला उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणार यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे व वैद्यकिय अधिकाऱ्यांच्या भर्तीसाठी पाठपूरावा करणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी शिरजगाव कसबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लोकार्पण प्रसंगी केले.
          यावेळी व्यासपिठावर चांदूर बाजार नगरपालिकेचे नगाराध्यक्ष रवीभाऊ पवार, जिल्हा परिषद सदस्य मनोहर सुने, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, मोहनलाल साबू, सरपंच अविनाश बदकुले उपस्थित होते.
          पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते आज शिरजगाव कसबा, मोथा ता.चिखलदरा, पथ्रोट या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण झाले. शिराळा येथील नाला खोलिकरण, सुरळी येथील व्यायाम शाळेचे भूमिपूजन, करजगाव व चांदूर बाजार येथील कामांचे भूमिपूजन सुद्धा पालकमंत्र्याहस्ते पार पडले.
          यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, शिरजगाव कसबा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत ही उत्तम व सुसज्ज आरोग्य सेवा असलेली जिल्ह्यातील एकमेव इमारत आहे. टेलिमेडिसन व जेनेरिक मेडिसीन द्वारा गरिबातल्या गरीब नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणार आहे. एवढेच नव्हे तर 2022 पर्यंत सर्वसामान्यांना पंतप्रधान आवास योजनेतून घरांचा लाभ मिळणार आहे.
          यावेळी या आरोग्य केंद्रासाठी 2 एकर जागा दान देणारे मोहनलाल साबू यांचा पालकमंत्र्याच्‍या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला. समाजात मोहनलाल साहू यांच्यासारखे दानशूर व्यक्तीमुळे सद्भावाची व समाज हिताची वृत्ती कायम असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
          यावेळी कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानाच भूमिपूजन पालकमंत्र्याच्या हस्ते झाले. यावेळी मोहनलाल साबू यांनी, सोहनी मॅडम यांनी आपले विचार व्यक्त केले. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव यांनी तर संचालन अशोक यावूल यांनी केले.
00000
वाघ/गावंडे/सागर/दि.04-01-2017/18-04 वाजता









Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती