पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते
विकास कामांचे भूमिपुजन संपन्न
            अमरावती, दि.2 (जिमाका): पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते आज विशेष प्रकल्प विभागांतर्गत येत असेल्या कामांचे भुमिपूजन संपन्न झाले. यामध्ये वडुरा वडगाव रस्ता ते जिल्हा बार्डर ग्रामा 12 कि.मी. 0/00 ते 2/00 ता.नांदगाव खंडेश्वर ची सुधारणा करणे 25 कि.मी. अंदाजित किंमत 34.96 लक्ष, नांदसावंगी खंडाळा रोड ग्रामा 43 कि.मी. 0/00 ते 1/300 व 2300 ते 2/800 ता.नांदगाव खंडेश्वर ची सुधारण करणे 30 कि.मी. अंदाजित किंमत 38.34 लक्ष, सातरगाव सावनेर रस्ता सुधारणा करणे ग्रामा 19 कि.मी. 1/00 ते 3/00 ता.नांदगाव खंडेश्वर 50 कि.मी. अंदाजित किंमत 38.35 लक्ष, येरंडगाव सातरगाव रस्त्याचा सा.क्र. 0/400 मध्ये लहान पुलाचे बांधकाम करणे 30/25 कि.मी. अंदाजित किंमत 109.75 लक्ष, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील एरंडगाव ते दादापूर रस्ता अंदाजित किंमत 140.69 लक्ष, कवठा कडू ते दिधी महल्ले ग्रामा 22 कि.मी. 0/700 ते 2/00 ता.चांदूर रेल्वे ची सुधारणा करणे 35/40 कि.मी. अंदाजित किंमत 22.95 लक्ष, घुईखेड निमगव्हाण ग्रामा 105 कि.मी. 2/400 ते 3/600 चांदूर रेल्वे ची सुधारणा करणे अंदाजित किंमत 17.03 लक्ष या विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
          यावेळी आ.विरेंद्र जगताप, माजी आ.अरुण अडसड, नांदसावंगी सरपंच कुंजलताताई बेलोकार व ग्रामस्थ उपस्थित होते.

00000


Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती