Tuesday, January 31, 2017

                   







कॅशलेस इकॉनॉमीसाठी युवकांनी उत्प्रेरक म्हणुन काम करावे
                                                     जिल्हाधिकारी
                             * डिजीधन जनजागृती कार्यशाळेचे उद्घाटन
        
अमरावती, दि. 31 (जिमाका) :  कॅशलेस इकॉनॉमीसाठी राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा येाजनेच्या सर्व विद्यार्थ्यानी अमरावती  शहर 100 टक्के  कॅशलेस व्यवहार करण्यासाठी प्रयत्न करावे. युथ कॅन मेक अ चेंज ॲन्ड लेटस शो दॅट धीस कॅन बी डन असा आत्मविश्वासपुर्ण आशावाद जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी आज नियोजन भवन येथे आयोजित कार्यशाळेत केला.
          महाराष्ट्र  डिजीधन जनजागृती कार्यक्रम कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभट्टी, जिल्हा अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके ,सहायक अग्रणी बॅक अधिकारी चौबे यासह मुख्यमंत्री कार्यालयातील   शिष्यवृत्तीधारक स्वप्नील पुरी ,सचिन अहीर, विवेक चिराणीया ,किर्ती खंडेलवाल ,ऋषीकेश सरोदे उपस्थित होते.

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले की रोकडरहीत अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच डिजीटल पेंमेट पध्दतीच्या प्रचार प्रसारासाठी देशभरात अनेक प्रयोग सुरू आहेत. यासाठी निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सोबत देशातील 607 जिल्हाधिकाऱ्यांच्या चर्चा मंथनातुन सामान्य जनतेला डिजीटल पेंमेटकडे प्रेरीत करण्यासाठी अनेक नवीन संकल्पना समोर येत आहेत. देशातील  पाच अग्रेसर  राज्यांच्या मुख्यमंत्र्याचा गट सुध्दा याबाबतीत काम करत आहे. त्यामध्ये आंध्रप्रदेश, सिक्कीम महाराष्ट आदीसह अन्य्‍ दोन राज्यांचा समावेश आहे.
जिल्हयात 360 बॅंका असुन त्यामधील 60 बॅंक शहरात असुन उर्वरीत 28 बॅंक ह्या ग्रामीण भागात आहे. या बॅंकेच्या माध्यमातुन प्रत्येक विद्यार्थ्यांच्या चमुसोबत एक बॅंक शाखा जोडण्यात येणार आहे अशी माहीतीही जिल्हाधिकाऱ्यांनी  यावेळी दिली.
डिजीटल हरीसालच्या माध्यमातुन अतिदुर्गम भागात सुध्दा आपल्या जिल्हयात प्रयोग करण्यात आला आहे. डिजीधन जनजागृती कार्यक्रमातील 31 जानेवारी ते 12 फेबुवारी या  पहील्या टप्प्यानंतर एप्रील महीन्यात दुसरा टप्पा राबविण्यात येईल. नार्वे या देशात 86 टक्के जनता दैनंदिन आर्थिक व्यवहार डिजीटल पध्दतीने करतात. सार्वजनिक क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी कॅशलेस इकॉनॉमी अंगीकारावी लागेल. 
 मुख्यमंत्री फेलोशिप योजनेत देखील जिल्हयातील  युवक युवतींनी अर्ज करावेत असे आवाहन किरण गीतते यांनी केले. डिजीधन कार्यक्रमाअंतर्गत पहिल्या टप्प्यात 25 शहर, दुसऱ्या टप्प्यात 350 नगरपालीका, नगरपरिषद व तिसऱ्या टप्प्यात 28 हजार गावात हा कार्यक्रम राबविण्यात येईल. पथदर्शी कार्यक्रमातील त्रुट्या, अडचणीवर मात करुन भविष्यात हा कार्यक्रम राज्यात अन्य शहरात राबविण्यात येईल असे ही त्यांनी सांगीतले.   मात्र टॉप टु बॉटम ॲप्रोच असलेला हा राज्यातील पहीलाच कार्यक्रम आहे. जिल्हयात एकुण 30 लाख लोकसंख्या आहेत. शहराची लोकसंख्या 8 ते 9 लाख आहे. मात्र फक्त 64 हजार नागरीक म्हणजे 8 टक्के नागरीक डिजीटल पेमेंट करतात. म्हणुन उर्वरीत लोकांना डिजीटल पेमेंटकडे वळविण्यासाठी भरपूर वाव आहे.
जगातील कोणत्याही विधायक कार्यात तरुणांनी चेंजमेकरची भुमिका बजावली आहे. युवकांनी झोकुन देऊन अमरावती शहराला या कार्यक्रमात अग्रेसर बनवुन युवकांनी बदल घडवावा. शहरातील 32 महाविद्यालयातील जवळपास 6 हजार एनएसएस स्वयंसेवकांमार्फत हा डिजीधन जागरूकता कार्यक्रम राज्यातील पथदर्शी कार्यक्रम अमरावती शहरात राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाविद्यालयीन विद्यार्थ्यानी डिजीदुत म्हणुन काम करावे. उत्तम काम करणाऱ्या टिमला राज्यस्तरावर पुरस्कृत करण्यात येईल .या पथदर्शी कार्यक्रमातील यशस्वीतेनंतरच संपूर्ण राज्यात अन्यत्र हा कार्यक्रम राबविण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगीतले. यावेळी डिजीटल पध्दतीने पेंमेट करण्याचे प्रात्यक्षीक जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.
निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिध्दभटी व अग्रणी बॅक व्यवस्थापक रामटेके यांनीही समयोचित विचार मांडले .कार्यक्रमाचे संचालन किर्ती खंडेलवाल यांनी केले. कार्यक्रमाला विदयार्थ्यांची लक्षणीय उपसिथती होती.

वाघ/राणे/हरदुले/31-01-17/14-22 वाजता


No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...