Thursday, January 5, 2017

सर्वसामान्यांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देणार
पालकमंत्री प्रविण पोटे
       अमरावती, दि.30 (जिमाका) : सर्व सामान्य जनतेला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा देण्यासाठी घाटलाडकी येथील नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचा उपयोग होईल. या आरोग्य केंद्रामार्फत उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा देणार असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी आज घाटलाडकी ता.चांदूर बाजार येथे केले. यावेळी व्यासपिठावर खा.आनंदराव अडसुळ, आ.बच्चू कडू यासह घाटलाडकी गावचे सरपंच अशोक उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी भालेराव, तहसिलदार शिल्पा बोबडे उपस्थित होत्या.
          यावेळी घाटलाडकी येथील 3 कोटी 22 लक्ष रुपये बांधकाम खर्च असलेल्या नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राचे भूमिपूजन झाले. भूमिपूजनला आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत उपस्थित होते. सन 2024 पर्यंत स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा, दर्जेदार शिक्षण ह्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. विकासासाठी सर्वांचा सहभाग असला पाहिजे असे मत ही त्यांनी व्यक्त केले.
          यावेळी सर्वसामान्य लोकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी शासनातर्फे घाटलाडकी परिसरात उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात आले. आजुबाजुच्या परिसरातील 40 ते 45 हजार लोकसंख्येला या माध्यमातून आरोग्य सुविधा पुरविणार असे मत आ.बच्चू कडू यांनी व्यक्त केले.
          नवीन वर्षाच्या शुभेच्छा देवून खा.आनंदराव अडसूळ यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी व नागरिकांनी सुद्धा लक्ष घालावे असे आवाहन केले.
          त्यांनतर चांदूर बाजार येथील श्रेणीवर्धन करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकामचे भूमिपूजन देखील यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी खा.आनंदराव अडसूळ, आ.बच्चू कडू, जिल्हाधिकारी किरण गित्ते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अरुण राऊत उपस्थित होते. श्रेणीवर्धन करण्यात आलेल्या ग्रामीण रुग्णालयाला 4 कोटी रुपये निधीची प्रशासकीय मान्यता मिळालेली आहे.

00000






No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...