अमरावती जिल्ह्याला उद्योगात प्रथम क्रमांकावर आणणार
पालकमंत्री प्रविण पोटे

            अमरावती, दि.2 (जिमाका): अमरावती जिल्ह्यातील औद्योगिक विकासासाठी राज्यमंत्री उद्योग या नात्याने शासनाच्या वतीने उद्योजकांच्या पाठिशी मी ठाम उभा आहे. अमरावती जिल्ह्याला उद्योगात प्रथम क्रमांकावर आणण्यासाठी उद्योजक व शासन यांनी हातात हात घालून काम करण्याची गरज आहे असे प्रतिपादन पालकमंत्री प्रविण पोटे यांनी व्यक्त केले.

          हॉटेल महफिल इन येथे आयोजित आंतरविभागीय उद्योग समितीच्या एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपिठावर आ.डॉ.अनिल बोंडे, आ.रमेश बुंदिले, वस्त्रोद्योग आंतरविभागीय समितीचे अभ्यासगटाचे अध्यक्ष किरण पातुरकर, श्याम इंडो फॅबचे संदीप गुप्ता, रेमंडचे नितीन श्रीवास्तव, जयराम बजाज, व्हिएचएम इंडस्ट्रीजचे नेमा यासह सुर्यलक्ष्मी मिलचे गौतम ढांग, विमा टेक्सचे प्रशांत मोटा, विपुल पंचमतीया, उद्योग सहसंचालक अशोक धर्माधिकारी यासह मान्यवर उपस्थित होते.

          यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ, मराठवाड्याच्या विकासासाठी उद्योगांना कमी दरात (4.40 रु.) प्रती युनिटने वीज उपलब्ध करुन दिली. औद्योगिक विकास करण्याकरीता आंतरविभागीय टेक्सटाईल ग्रुपची स्थापना केली आहे. अशा टेक्सटाईल ग्रुपच्या अभ्यासगटातून येणाऱ्या अभ्यासा अहवालाअंती शासन वस्त्रोद्योगबाबतीत पुढील दिशा ठरवणार आहे. मराठवाडा व विदर्भ या भागात कापसाचे मोठे उत्पादन होत असल्यामुळे याच ठिकाणी कापसावर प्रक्रिया करणारे जिनिंग, प्रेसिंग, विनकर, कापुस उत्पादक शेतकरी यांची मुल्यवर्धीत साखळी तयार होणे गरजेचे आहे. अमरावतीचे भौगोलिक दृष्ट्या स्थान हे उद्योग वाढीसाठी पुरक आहे. उपराजधानी पासुन जवळचे अंतर व कम्यूनिकेशन वे मुळे उद्योजक अमरावतीत आकर्षित होत आहे. आपल्या अखत्यारितील उद्योग व महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ या दोन्ही खात्यांचा समन्वय साधुन उद्योजकांना प्रोत्साह देण्याचा माझा प्रयत्न राहील. उद्योग विकसित झाले तरच रोजगार निर्मिती होईल. परंतु स्थानिकांना रोजगार उपलब्ध करुन देतांनाच युनियनबाजीमुळे उद्योजकांना त्रास होवू नये याची दक्षता देखील आपण घेतली पाहिजे असे आवाहन देखील त्यांनी केले. अमरावती विद्यापिठाने टेक्सटाईल पार्कमधील वाढत्या उद्योगांना लागणारे प्रशिक्षित मनुष्यबळ विकसित करणारे अभ्यासक्रम सुरु करावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राज्यमंत्री उद्योग हा पदभार स्विकारल्या पासुन महाराष्ट्रातील 2700 उद्योगांना आपण व्यक्तिश: भेट देल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेच्या आयोजनाचा हेतू साध्य व्हावा अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण पातुरकर यांनी केले. त्यात त्यांनी कार्यशाळेचा हेतू हा वस्त्रोद्योगाशी संबंधित चर्चा, संवादाची देवान घेवान, कापूस उत्पादक शेतकरी ते गारमेंट उत्पादक यांच्यातील चर्चासत्र, शासनाच्या अपेक्षा, धोरणात्मक बदल, सवलती, मुलभुत सुविधा यासाठी या कार्यशाळेचे आयोजना मागची भुमिका असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेस फायबर टु फॅशन, ॲडव्हांटेज ॲण्ड इश्यूज इन विदर्भ ॲण्ड मराठवाडा, दुसऱ्या सत्रात इम्पॅक्ट ऑफ जिएसटी ॲण्ड डिमोनिटायझेशन- ॲडव्हांटेज विदर्भ ॲण्ड मराठवाडा, तिसऱ्या सत्रात इनिशिएट्यूज ॲण्ड एक्सपेक्टेशन फॉर्म गव्हरमेंट इन डेव्हल्पमेंट इन टेक्सटाईल सेक्टर इन विदर्भ ॲण्ड मराठवाडा या विषयावर गट चर्चा होणार आहे.

          या कार्यशाळेला वस्त्रोद्योग महामंडळाचे सर्व अधिकारी, वस्त्रोद्योजक, वस्त्रोउत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक उदय पुरी यांनी केले.
00000







Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती