Posts

Showing posts from May, 2022

जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा

Image
  जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा अमरावती, दि.31: राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सामान्य रुग्णालय येथे ‘जागतिक तंबाखू विरोधी दिना’निमित्त जनजागृतीपर कार्यक्रम साजरा करण्यात आला. तसेच तंबाखू मुक्तीबाबत शपथ घेण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत महल्ले होते. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. साळुंके, समिती अध्यक्ष डॉ. सविता पाटणकर, वुमन डॉक्टर विंग अध्यक्ष डॉ. आशा हरवानी, सचिव डॉ. सानिष्ठा बेले, सहसचिव डॉ. नीरज मुरके,डॉ सुजित डांगोरे, डॉ. गिरीश तापडिया, दंतरोग तज्ज्ञ डॉ. आतिश पवार, जिल्हा सल्लागार राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम डॉ. मंगेश गुजर, दंतरोग तज्ज्ञ डॉ. प्रितीश पाडगावकर, अधिसेविका श्रीमती अडळकर, आहार तज्ज्ञॉ श्रीमती देशमुख, निरुत्ती इंदुरकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. या वर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे घोष वाक्य "तंबाखूमुळे आपल्या पर्यावरणाला धोका ” हे होते. तंबाखू उत्पादनात होणारा अतिरिक्त रासायनिक खताचा वापर, यामुळे जमिनीचा कस कमी होतो व कालांतराने जमीन नापीक बनते. राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षण 2019-20 नुसार, अमरावती

प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी साधला लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद

Image
  लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले समाधान, राज्य शासनाप्रती व्यक्त केली कृतज्ञता   लाभार्थी परिसंवाद कार्यक्रम संपन्न   प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांनी साधला लाभार्थ्यांशी ऑनलाईन संवाद   जिल्ह्यातील 350 लाभार्थी नियोजन भवनात उपस्थित   तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा यशस्वी   विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांचा पुढाकार                   अमरावती, दि.31 :   केंद्र शासनाच्या अथवा राज्य शासनाच्या योजना गरजूंपर्यंत पोहचविण्यासाठी राज्य शासनामार्फत विविध उपक्रम राबवून या योजनांची प्रसिध्दी करुन लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यात येतो. तळागाळातील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहचविण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा यशस्वीपणे कार्य करीत आहे. याचीच परिणती म्हणून लाभार्थी परिसंवाद कार्यक्रमात लाभार्थ्यांनी शासकीय योजनांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी जिल्ह्यातील 350 लाभार्थी उपस्थित होते.            भारताच्या स्वातंत्र्य प्राप्तीच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनामार्फत देशभरात आजादी का अमृत महोत्सवांतर्गत विव

शहरात कलम 37 (1) व (3) लागू

  शहरात    कलम   37   (1)    व (3) लागू   अमरावती,   दि. 31 :    शहरात शांतता व सुव्‍यवस्‍था अबाधित राहावी,   यासाठी पोलीस उपायुक्त (अमरावती शहर) यांनी महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या   कलम   37   (1) व (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे. सदर प्रतिबंधात्मक आदेश शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, याकरिता पोलिस आयुक्तयालय परिक्षेत्रात दि. 1 जून ते 15 जून 2022 पर्यंत लागू करण्यात आला आहे. या   कलमाचा भंग करणाऱ्या व्‍यक्‍तीविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्‍यात येईल, असे पोलीस उपायुक्त (अमरावती शहर)    यांनी कळविले आहे. 000000  

शासन पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभे आहे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

Image
  शासन   पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभे आहे - प्रधानमंत्री नरेंद्र मोदी   कोरोना काळात अनाथ झालेल्या बालकांना केंद्र व राज्य शासनामार्फत ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’व्दारे मदतीचे वाटप संपूर्ण देशभर एकाचवेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मदत निधीचे वितरण अमरावती जिल्ह्यातील 15 बालकांना 2 कोटी 25 लक्ष रुपयांचा लाभ              अमरावती, दि.30 : कोरोना आपत्तीमुळे अनेकांचे जीवन बदलले. या काळात ज्यांनी आपल्या परिवारातील सदस्य गमावले, त्यांचे दु:ख शब्दातीत आहे. परंतु परोपकाराची जाणीव असलेला आपला भारत देश आणि शासन यंत्रणा कोरोना पीडितांच्या पाठीशी संवेदनशीलतेने उभी आहे. यासाठी कोरोना पीडितांनी आपले मनोबल दृढ ठेवावे. तुम्हाला पुढील आयुष्य खंबीरतेने आणि यशस्वीपणे जगण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करीत आहे, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ‘पीएम केअर फॉर चिल्ड्रेन’ योजनेव्दारे कोविड काळात दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना मदतनिधी वितरण कार्यक्रम व्हिडीओ कॉन्फरन्सिंगव्दारे जिल्हाधिकारी कार्यालयातील

गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता‘पिझोमीटर’ भूजलमापक यंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

Image
  गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्याकरिता‘पिझोमीटर’ भूजलमापक यंत्राचे पालकमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन   अमरावती, दि. 28 :  अटल भूजल योजनेतंर्गत वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत गावातील भूजल पातळीचा अभ्यास करण्यासाठी पिझोमीटर  (भूजल मापक यंत्र) बसविण्यात आले आहे. महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशाोमती ठाकूर यांच्या हस्ते आज पिझोमीटरचे उद्घाटन करण्यात आले.             सरपंच ललिता जोमदे, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे प्रादेशिक उपसंचालक संजय कराड, मोर्शीचे तहसिलदार सागर ढवळे, गटविकास अधिकारी आर. पवार, वरिष्ठ भूवैज्ञानिक हिमा जोशी आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. अत्याधुनिक पध्दतीने गावातील भूजल पातळीच्या अभ्यास करण्याकरिता अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड, मोर्शी  व चांदुरबाजार या तालुक्यामध्ये एकूण 90 ग्रामपंचायतीमध्ये भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत पिझोमीटरसाठी स्थळ निश्चित करण्यात आले आहे. जमिनीतील भूशास्त्रीय रचनेनुसार जलधारक खडकाचा अभ्यास व तसेच भूजल पातळीचा अभ्यास अत्याधुनिक पध्दतीने करण्याकरिता पिझोमीटरने (भूजल मापक यंत्र) खो

जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

Image
  जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक                  -    पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन   अमरावती, दि. 28 :  जिल्ह्याच्या विकासासाठी आरोग्य सेवा बळकट असणे अत्यंत आवश्यक आहे. याच धर्तीवर डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयातील अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षामुळे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना अमरावती शहरातच या आरोग्य सुविधेच्या लाभ घेता येईल. यामुळे रुग्णांना तसेच रुग्णांच्या नातेवाईकांना निश्चितच दिलासा मिळेल, असा विश्वास महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी आज व्यक्त केला.  डॉ. पंजाबराज देशमुख वैद्यकिय महाविद्यालयात अद्ययावत श्वसनरोग अतिदक्षता कक्षाचे उद्घाटन श्रीमती ॲड. ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल देशमुख, संचालक डॉ. पद्माकर सोमवंशी, संस्थेचे उपाध्यक्ष नरेश ठाकरे, रामचंद्र शेळके, कोषाध्यक्ष दिलीप इंगोले आदी मान्यवर य

प्राथमिक आरोग्य केंद्र हा ग्रामीण जीवनाचा कणा - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर

Image
      प्राथमिक आरोग्य केंद्र हा  ग्रामीण जीवनाचा  कणा    - पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर पालकमंत्र्यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण              अमरावती, दि. 28 :  प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम उच्च दर्जाचे करण्यात यावे. प्राथमिक आरोग्य केंद्र हे ग्रामीण जीवनाच्या कणा आहे. यामुळे या इमारतीचे बांधकाम नियोजनबद्ध व सर्व सोयींनी युक्त असावे. तसेच पुढील काळात येथील पाणंद रस्ताचे काम लवकरच पूर्ण करणार,असे आश्वासन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशाोमती ठाकूर यांनी आज दिले. जिल्हा परिषद सदस्य दत्ताभाऊ ढोमणे, सरपंच मंगला लोखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले, तहसिलदार सागर ढवळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेश जयस्वाल, रमेश काळे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. विचोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे निर्लेखन करुन नवीन इमारत बांधकामचे भूमीपूजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. या कामाची अंदाजे किंमत साडेचार कोटी रुपये एवढी आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र व विस्तारीकरणांतर्गत हे विकास काम करण्यात येणार आहे.  अडगाव बु. ये

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्ग आरक्षण समर्पित आयोगाने जाणून घेतली संस्था, व्यक्तींची मते सुमारे चाळीस संस्था, संघटनांशी चर्चा

Image
  स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्ग आरक्षण समर्पित आयोगाने जाणून घेतली संस्था, व्यक्तींची मते सुमारे चाळीस संस्था, संघटनांशी चर्चा                अमरावती, दि. 28 : स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोगाने आज विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारली व त्यांचे मत जाणून घेतले. यावेळी 40 संस्था-संघटना, तसेच सुमारे दीडशे नागरिकांनी आयोगाची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले. आयोगाचे अध्यक्ष जयंतकुमार बांठिया, सदस्य नरेश गीते, डॉ. शैलेशकुमार दारोकार, एच. बी. पटेल व सदस्य सचिव पंकजकुमार आदींनी संस्था व नागरिकांकडून प्रत्यक्ष चर्चा करून निवेदने स्वीकारली. अप्पर विभागीय आयुक्त नीलेश सागर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पुरवठा उपायुक्त अजय लहाने, उपजिल्हा निवडणूक अधिकारी नरेंद्र फुलझेले, आयोगाचे संशोधन अधिकारी डॉ. नितीन धाकतोडे, निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह विविध जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.               आयोगाकडून घेण्यात आलेल्या प्रत्