बाहुली नाट्यातून दीपालीताईंनी दिला आरोग्य रक्षणाचा संदेश









बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून लोकजागर

बाहुली नाट्यातून दीपालीताईंनी दिला आरोग्य रक्षणाचा संदेश

राजस्तरीय सचित्र  माहिती प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

अमरावती दि 4: शासन व्यवस्था, नागरिक, अधिकार व कर्तव्य, योजना व उपक्रम यांची माहिती कलावंत दीपाली बाभूळकर यांच्या बाहुली नाट्यातून विद्यार्थ्यांना मिळाली. नाट्यातील 'चिंगी' व 'मिनी' या दोन बाहुली पात्रांच्या खुमासदार संवादातून करमणुकीसह सामाजिक संदेशही साधला गेला. संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित सचित्र माहिती प्रदर्शनात हा कार्यक्रम झाला.

विद्यमान शासनाच्या द्विवर्षपूर्ती निमित्त माहिती व  जनसंपर्क विभागाच्यावतीने  शासनाच्या योजना व झालेली फलश्रुतीची माहिती देणारे  प्रदर्शन दि 5 मे पर्यंत आयोजित करण्यात आले आहे.

 कृषी, उद्योग, आरोग्य, शिक्षण तसेच विविध विभागांच्या लोकहिताच्या योजनांची चित्रमय माहिती प्रस्तुत करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने  श्रीमती बाभूळकर यांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, माहिती उपसंचालक हर्षवर्धन पवार, पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे, आकाशवाणीचे वरिष्ठ उद्घोषक संजय ठाकरे उपस्थित होते.

श्रीमती बाभूळकर यांनी बालकांसाठी, मुलींसाठी असलेल्या शैक्षणिक योजना, जंगलाचे महत्त्व, आरोग्य विषयक जनजागृती, चांगला स्पर्श, वाईट स्पर्श, शिक्षणाचे महत्त्व बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून सादर केले. मुलांसोबत संवाद साधत या कार्यक्रमाचे सादरीकरण श्रीमती बाभूळकर यांनी केले.

उपस्थित बालक व पालकांना हसतखेळत, मनोरंजनातून दुनिया बोलक्या बाहुल्यांची या कार्यक्रमातून स्त्री पुरुष समानता, मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, वृक्षारोपण, मुलांची सुरक्षितता या विविध विषयांवर बोलक्या बाहुल्यांच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले. गुड टच बॅड टच हा विषय अतिशय हसतखेळत मुले व पालकांना समजावून सांगत आपल्या सुरक्षिततेकरीता करावयाची उपाययोजना, भावना योग्य शब्दात व्यक्त करता येणे, आपले सुरक्षित वलय तयार कसे करायचे यासह 1098 या क्रमांकाचा सराव घेण्यात आला. वैयक्तिक व सामाजिक आरोग्य या अंतर्गत हात धुण्याची सवय याकरिता प्रात्यक्षिक करून दाखविण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अपर्णा यावलकर यांनी तर आभार पल्लवी धारव यांनी मानले

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती