वनपट्टेधारकांना बोअरवेलसह सौर पंप मिळणार - प्रकल्प अधिकारी सावन कुमार

 

वनपट्टेधारकांना बोअरवेलसह सौर पंप मिळणार

-          प्रकल्प अधिकारी सावन कुमार

अमरावती, दि. 19 : विशेष केंद्रिय सहाय्य योजनेत वनपट्टेधारकांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी शेतात बोअरवेल व सौर पंपाचा लाभ देण्यात येणार आहे. पात्र व्यक्तींनी दि. 23 मेपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन धारणी येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी सावन कुमार यांनी केले आहे.

वनहक्क कायद्यानुसार अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना वनपट्टे देण्यात आले आहेत. या वनपट्टेधारक शेतक-यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी त्यांच्या शेतात बोअरवेल किंवा डगवेल आणि सौर पंप बसवून देण्यात येणार आहे.

निकष

लाभार्थी अनुसूचित जमातीचा असावा. किमान दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे. सक्षम प्राधिका-याचा रहिवाशी व जातीचा दाखला, वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र, सातबारा उतारा देणे आवश्यक.

निवड प्रक्रिया

कागदपत्रे तपासून पात्र, अपात्र अर्जदारांच्या स्वतंत्र याद्या तयार करण्यात येतील. निवड करताना दारिद्र्यरेषेखालील अर्जदार, दिव्यांग, विधवा, परितक्त्या, निराधार महिला यांना प्राधान्य देण्यात येईल.

संपर्क

अमरावती येथे अप्पर आदिवासी आयुक्त कार्यालयात, धारणी येथे प्रकल्प कार्यालयात, तसेच मोर्शी येथील उप कार्यालयात अर्ज उपलब्ध असून, तिथे 23 मेपूर्वी अर्ज सादर करावेत. अधिक माहितीसाठी (07226) 224217 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

000    

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती