Monday, May 23, 2022

दुसरे महायुध्द अनुदानधारक माजी सैनिकांसाठी सूचना

 दुसरे महायुध्द अनुदानधारक माजी सैनिकांसाठी सूचना


       अमरावती, दि.23: अमरावती जिल्ह्यातील दुसरे महायुध्द अनुदान लाभार्थी माजी सैनिक तथा दिवंगत सैनिकांच्या पत्नी यांनी आपले जिवित असल्याचे दाखले बँक खाते क्रमांकासह संबंधित बँकेच्या सही व शिक्क्यानिशी कॅम्पमधील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात 31 मेपूर्वी सादर करण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मनीषकुमार गायकवाड यांनी केले आहे.

ज्या लाभार्थ्यांचे हयातीचे दाखले या कार्यालयास प्राप्त होणार नाहीत, त्यांचे अनुदान बंद करण्यात येईल, असे त्यांनी सूचित केले आहे.

0000

No comments:

Post a Comment

जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ

  जिल्हातील घरांसाठी 5 हजार अतिक्रमण नियमानुकूल * शहरीसह ग्रामीण भागातील नागरिकांना लाभ अमरावती, 13 : सर्वांसाठी घरे उपलब्ध होण्यासाठी श...