पूर्वतयारी व कार्यवाहीसाठी विविध नोडल अधिकारी नियुक्त - विभागीय आयुक्त पवनीत कौर यांच्याकडून आदेश जारी

 


मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावतीत

पूर्वतयारी व कार्यवाहीसाठी विविध नोडल अधिकारी नियुक्त

-         विभागीय आयुक्त पवनीत कौर यांच्याकडून आदेश जारी

         अमरावती, दि. 19 : स्थानिक स्वराज्य संस्थांतील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग शनिवार, दि. 28 मे रोजी अमरावती येथे विभागीय आयुक्त कार्यालयात सकाळी 9.30 ते 11.30 या वेळेत उपस्थित असेल. आयोगाकडून व्यक्ती व संस्थांकडून निवेदने स्वीकारण्यात येतील. कार्यक्रमाची पूर्वतयारी व कार्यवाही याबाबतच्या जबाबदा-या पार पाडण्यासाठी विविध नोडल अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसा आदेश विभागीय आयुक्त पवनीत कौर यांनी जारी केला आहे.  

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.   याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाचे सदस्य अमरावती येथे शनिवार, दि. 28 मे रोजी उपस्थित असतील. 

 याबाबत पूर्वतयारी व कार्यवाहीसाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. आयोगाचे अध्यक्ष व सदस्यांचे संपर्क अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, विवेक घोडके व मनीष गायकवाड यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. नोडल तथा समन्वय अधिकारी म्हणून अमरावतीचे निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, यवतमाळचे निवासी उपजिल्हाधिकारी ललित व-हाडे, वाशिमचे आरडीसी शैलेश हिंगे, अकोल्याचे आरडीसी संजय खडसे, तसेच बुलडाणा येथील उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय लोखंडे यांना नियुक्त करण्यात आले आहे. आयोगास आवश्यक व्यवस्थेबाबत उपविभागीय अधिकारी रणजीत भोसले यांनाही जबाबदारी देण्यात आली आहे.

          बैठकीच्या कार्यवाहीत आयोगाच्या मदतीसाठी सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, नायब तहसीलदार प्रशांत देशमुख, संजय मूरतकर, लघुलेखक किर्ती पोकळे, अतुल लवणकर यांची टीम नियुक्त करण्यात आली आहे.

आयोगास निवेदन सादर करण्यासाठी इच्छूकांच्या नोंदणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबरोबरच पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात आला आहे.  दि. 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. अशी माहिती पुरवठा उपायुक्त अजय लहाने यांनी दिली. इच्छूकांनी कार्यालयीन वेळेत या कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

00000

 

 

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती