मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावतीत

 

मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग 28 मे रोजी अमरावती

इच्छूकांच्या नोंदणीसाठी पाचही जिल्ह्यात मदत कक्ष

-          पुरवठा उपायुक्त अजय लहाने

 

          अमरावती, दि. 19 : स्थानिक स्वराज्य संस्थांतील मागास प्रवर्गाच्या आरक्षणाबाबत समर्पित आयोग शनिवार, दि. 28 मे रोजी अमरावती येथे उपस्थित असेल. निवेदन सादर करण्यासाठी इच्छूकांच्या नोंदणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयाबरोबरच पाचही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मदत कक्ष उघडण्यात आला आहे. आयोगाला भेटण्यास इच्छूक व्यक्ती किंवा संस्थांनी नोंदणी करावी, असे आवाहन पुरवठा उपायुक्त अजय लहाने यांनी केले आहे.

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायती आणि शहरातील महानगरपालिका, नगरपालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे शासनाने समर्पित आयोग गठित केला आहे.

          याबाबत नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी समर्पित आयोगाचे सदस्य अमरावती येथे शनिवार, दि. 28 मे 2022 रोजी सकाळी 9.30 ते सकाळी 11.30 दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालयात उपस्थित असतील.  निवेदन देण्यास इच्छूकांच्या नोंदणीसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासह अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ येथील जिल्हाधिकारी कार्यालयांत मदत कक्ष सुरू आहेत. तिथे दि. 27 मे रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत नोंदणी करता येईल. इच्छूकांनी कार्यालयीन वेळेत या कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

000

 

 

 

 

 

 

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती