विजाभज कल्याण समितीकडून विविध विषयांचा आढावा

 






विजाभज कल्याण समितीकडून विविध विषयांचा आढावा

अमरावतीदि. 20 : शासनाची विविध कार्यालयेस्थानिक स्वराज्य संस्था यांच्या आस्थापनेवरील विमुक्त जाती व भटक्या जमातीचे अधिकारी व कर्मचारी भरतीबढतीआरक्षण व अनुशेषतसेच विविध कल्याणकारी योजनांचा आढावा महाराष्ट्र विधानमंडळ विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समितीने आज नियोजनभवनात  घेतला.

समितीने गत दोन दिवस जिल्ह्यात विविध ठिकाणी दौरा करून शाळा- वसतिगृहेविकासकामे यांची तपासणी केलीतसेच स्थानिक बांधवांशी चर्चा करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्या अनुषंगाने व विविध आस्थापनांवरील विजाभज प्रवर्गातील अधिकारी- कर्मचारी भरतीबढतीअनुशेष आदींबाबत चर्चा करण्यासाठी नियोजनभवनात बैठक आयोजित करण्यात आली.

 समितीप्रमुख आमदार शांताराम मोरे हे आढावा बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. समितीचे सदस्य सर्वश्री बळवंतराव वानखडे, सुरेश भोळे, संजय दौंड, राजेश राठोडअवर सचिव मंगेश मिसाळकक्षाधिकारी विनोद राठोडजिल्हा पोलीस अधिक्षक अविनाश बारगळमहापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकरनिवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांच्यासह जिल्हा परिषद व विविध विभागप्रमुख उपस्थित होते.

महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, परिवहन, एमआयडीसीपोलीस, उद्योग विभाग, सार्वजनिक बांधकाम, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद कार्यालय, समाजकल्याण आदी कार्यालयांच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचारी यांची भरती, बढती, आरक्षण व अनुशेष आदींबाबत आढावा समितीने घेतला.

          विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या समाजबांधवांना रोजगारनिर्मिती कार्यक्रम,  बीजभांडवल योजनायशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनादुधाळ जनावरांचे वाटपगायगोठे योजना यासह विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रभावी अंमलबजावणी करावी. अमरावतीत बहुरूपी समाजाला कला सादर करण्यासाठी कलाभवन उभारण्याची समाजबांधवांची मागणी आहे. त्यासाठी महापालिकेने पुढाकार घ्यावाअसे निर्देश समितीने दिले.

 

000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती