पोस्टा’चे कामकाज आता अधिक स्मार्ट टपाल विभागाकडून पार्सल पॅकेजिंगसाठी अद्ययावत प्रणाली

 पोस्टा’चे कामकाज आता अधिक स्मार्ट

 टपाल विभागाकडून पार्सल पॅकेजिंगसाठी अद्ययावत प्रणाली

 

            अमरावती, दि.23 : देशभरात वाढत्या ई-कॉमर्स व्यवसायामुळे भारतीय टपाल विभागाने ग्राहकांच्या सोयीसाठी व पार्सलच्या सुरक्षितेसाठी नवीन पार्सल पॅकेजिंग प्रणाली सुरू केली आहे. त्यानुसार कापडी पॅकिंग आता पोस्ट ऑफिसमध्ये स्वीकारली जाणार नाहीत.

ही प्रणाली 1 एप्रिल 2022 पासून सुरू झाली आहे. त्यानुसार सिंगल बॉक्स पॅकेजिंग व बॉक्स इन बॉक्स पॅकेजिंग, तसेच इंटरनल पॅकेजिंग या तीन पद्धती निश्चित करण्यात आल्या आहेत.  

            ‘सिंगल बॉक्स पॅकेजिंग’ पध्दती ही प्रिंटेड मटेरियल, मशिनरी पार्टस् आणि मेटल पार्ट व इतर वस्तू पाठविण्यासाठी वापरण्यात येत आहे. त्याचप्रमाणे, ‘बॉक्स इन बॉक्स पॅकेजिंग’ पध्दती ही अतिनाजूक वस्तू पाठविण्यासाठी वापरली जात आहे. बाहेरील पॅकिंगसाठी इंडिया पोस्ट पार्सल ब्रँडिंग मटेरियल, स्ट्रेच रॅप प्लास्टिक फिल्म, स्ट्रापिंग रोल्स यासारख्या वस्तूंचा वापर सुरु करण्यात आला आहे.

            ‘इंटरनल पॅकेजिंग’साठी बबल रॅप, एअर बॅग, कार्डबोर्ड फिलर्स यासारख्या वस्तूंचा वापर केला जात आहे. वाहतुकीदरम्यान ग्राहकांनी पाठवलेल्या वस्तूंची सुरक्षितता वाढविण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा वापर सुरू करण्यात आल्याची माहिती अमरावती प्रवर डाकघर अधिक्षकांनी दिली.

                                    पॅकेजिंग मटेरियल विक्रीस उपलब्ध

पार्सल पॅकेजिंगसाठी लागणाऱ्या वस्तू या संबंधित पोस्ट ऑफिसमार्फत विकल्या जात आहेत. त्याचप्रमाणे, बल्क पार्सल ग्राहकांना पिक-अप, ट्रॅक आणि ट्रेस, ए.पी.आय., बीएनपीएल यासारख्या सुविधा सुरू करण्यात आल्या आहेत.

सर्व ग्राहकांनी पार्सल सुरक्षित पोहोचविण्याच्या दृष्टीने या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन प्रवर अधिक्षकांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती