Posts

Showing posts from September, 2021

जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून संत्रा शेती व मूल्यवृद्धी प्रकल्पाची पाहणी

Image
  जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्याकडून संत्रा शेती व मूल्यवृद्धी प्रकल्पाची पाहणी अमरावती, दि. 30 : संत्रा हे जिल्ह्यातील महत्वाचे फळपीक आहे. संत्रा उत्पादक शेतकरी बांधवांच्या अडचणी सोडविण्याबरोबरच संत्रा फळपीक मूल्यवृद्धी व निर्यातवृद्धीसाठी प्रयत्न व्हावेत. शेतकरी उत्पादक संस्थांचा मूल्य साखळीतील सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सर्वंकष प्रयत्न करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले. जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी आज वरूड तालुक्याचा दौरा करून फळपीक शेतीची पाहणी व कृषी प्रकल्पांना भेटी दिल्या, त्यावेळी त्या बोलत होत्या. उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, तहसीलदार गजेंद्र मालठाणे, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अर्चना निस्ताने, उपविभागीय कृषी अधिकारी राहूल सातपुते आदी उपस्थित होते.             जिल्हाधिका-यांनी आज बेनोडा, जरूड, वरूड आदी ठिकाणी भेटी दिल्या. यावेळी त्यांनी शेतकरी गटामार्फत नाविन्यपूर्ण उपक्रमाची पाहणी व ई- पीक पाहणी कार्यक्रमात सहभाग घेतला. बेनोडा येथे संत्रा उत्पादक शेतक-यांनी खडका धरण येथून पाईपलाईन आणून फुलवलेल्या संत्रा

जिल्ह्यात 1 ऑक्टोबरपासून ‘क्लीन इंडिया’ कार्यक्रम

Image
  ‘आझादी का अमृत महोत्सवा’चे औचित्य जिल्ह्यात 1 ऑक्टोबरपासून ‘क्लीन इंडिया’ कार्यक्रम विविध संस्था व नागरिकांचा सहभाग मिळवावा -            निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल   अमरावती, दि. 30 : केंद्रिय युवक कल्याण व क्रीडा मंत्रालय, तसेच नेहरू युवा केंद्रातर्फे   ‘आझादी का अमृत महोत्सवा’निमित्त 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान विविध संस्थांच्या सहभागासह ‘क्लीन इंडिया’अंतर्गत जिल्ह्यात गावोगाव सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, तसेच प्रबोधनपर कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी विविध संस्था व नागरिकांचा अधिकाधिक सहभाग मिळवावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल यांनी आज येथे केले. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. सहायक रोजगार संचालक प्रफुल्ल शेळके, जिल्हा रूग्णालयाचे डॉ. अमोल नरोटे, नेहरू युवा केंद्राचे सदस्य शरद गढीकर, जयंत डेहणकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी गीता वंजारी, नेहरू युवा केंद्राच्या समन्वय अधिकारी स्नेहल बासुतकर, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, उपशिक्षणाधिकारी प्रिया देशमुख, आयटीआयच्या प्राचार्य मंगलात

उधवस्त झालेल्यांचा आधार व्हा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

Image
  उधवस्त झालेल्यांचा आधार व्हा पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन   अमरावती, दि. 30 : राज्यातील जनतेला प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सौहार्दाचे, आपुलकीची आणि न्यायाची अपेक्षा असते. त्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी उध्वस्त झालेल्या लोकांचा आधार होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी केले आहे.       अमरावती येथील महिला प्रबोधिनी येथे महिला बाल विकास अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या.एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन महिला आणि बालविकास विभागात एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून नव्याने रुजू झालेल्या   अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणादरम्यान महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी त्यांना मार्गदर्शन केले. तसेच   राज्यातील नव्याने रुजू झालेल्या काही अधिकाऱ्यांच वर्तन जनतेप्रती कशी मुजोर पणाची होती याचा किस्सा सांगत त्यांनी अधिकाऱ्यांना वेळीच प्रशिक्षण मिळालं नाही तर त्यांची वागणूक कशी होते याचे उदाहरण दिले.   त्यामुळे संघर्ष करून आलेल्या अधिकाऱ्यांनी जनतेचा सं

जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी

Image
कोरोना प्रतिबंधक, तसेच इतर आरोग्य उपाययोजनांच्या अनुषंगाने तिवसा ग्रामीण रुग्णालय, मोझरी येथील रुग्णालय आदी ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज केली.        यावेळी त्यांनी आरोग्य सुविधांबाबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे-देशमुख आदी उपस्थित होते. साथरोग नियंत्रणासाठी उपचार सुविधा व आवश्यक औषध साठा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.        मोझरी विकास आराखड्यातील कामांची, तसेच शिवणगाव रोपवाटिकेची पाहणीही जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी  केली व तहसील कार्यालयातही विविध कामांचा आढावा घेतला.         रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शिवणगाव रोपवाटिका विकसित करण्यात आली आहे. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासकामे राबवावीत.  आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत,  असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.०००

आपद्ग्रस्तांच्या मदतीसाठी चार कोटी 71 लाख रु. निधी जिल्ह्याला प्राप्त- पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

Image
जुलैमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानाच्या भरपाईसाठी अमरावती जिल्ह्यासाठी 4 कोटी 71 लाख 98 हजार रूपये निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आले आहेत. याबाबत उर्वरित निधीही लवकरच मिळवून दिला जाईल. एकही बाधित व्यक्ती वंचित राहू देणार नाही, अशी ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज दिली.           अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे पडझड झालेली घरे, झोपडी, गोठे, दुकानदार, टपरीधारक, कुक्कुटपालन शेड, शेतजमीन आदींच्या नुकसानासाठी बाधितांना मदतीचे वाटप करण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीतून मदत वितरित करण्यात आली आहे. अतिवृष्टीनंतर पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी स्वत: गावोगाव दौरे करूनमि पंचनाम्याच्या प्रक्रियेबाबत गतिमान कार्यवाहीचे आदेश दिले होते व याबाबत शासनाकडेही पाठपुरावा केला. यानंतरही आवश्यक निधी मिळवून दिला जाईल. महाविकास आघाडी शासन शेतकरी बांधव व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असे पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी सांगितले.  जिल्हाधिका-यांकडून तालुक्यांना निधी वितरणाचा आदेश जारी          जिल्ह

दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Image
  श्री क्षेत्र झुंज दुर्घटना प्रकरणी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू दुर्घटनाग्रस्तांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडातून मदत मिळावी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी   अमरावती , दि. १५ : वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथील वर्धा नदीमध्ये बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व सीएम रिलीफ फंडाच्या माध्यमातून तात्काळ मदत मिळावी , अशी मागणी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष निवेदन देऊन केली. अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील वर्धा नदीत बुडून उलटून झालेल्या दुर्घटनेत 14 सप्टेंबर रोजी अकरा व्यक्ती नदीमध्ये बुडाल्या. त्यापैकी तीन व्यक्तींचे मृतदेह शोध बचाव पथकाने शोधून काढले असून उर्वरित व्यक्तींचा आपत्ती निवारण दल व जिल्हा पथकाद्वारे शोध घेणे चालू आहे. सदर घटनेमुळे संबंधितांच्या कुटुंबीयांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला असून या दुःखद प्रसंगी आपण सर्व त्यांच्या समवेत उभे आहोतच तरी या घटनेतील व्यक्तींच्या कुटुंबियांना राज्य

वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाले प्रशासनामार्फत युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरु

  वर्धा नदीत नाव उलटून 11 जण बुडाले प्रशासनामार्फत युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरु   अमरावती दि, 14 : अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील श्री क्षेत्र झुंज येथे वर्धा नदीच्या पात्रात बोट उलटून 11 जण बुडाल्याची धक्कादायक घटना आज सकाळी घडली. आतापर्यंत नावाड्यासह तिघांचे मृतदेह सापडले असून इतर लोकांचा शोध बचाव पथकामार्फत युद्धपातळीवर सुरु आहे.              वरुड तालुक्यातील बेनोडा शहीद ठाण्यांतर्गत झुंज धबधबा येथे नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी गेले असतांना नाव उलटल्याची घटना घडली. गाडेगांव येथील मटरे कुटुंबातील दशक्रिया विधीला उपस्थित राहण्यासाठी त्यांच्या जवळचे नातेवाईक सोमवारी तेथे पोहचले होते. दशक्रिया विधी आटोपल्यानंतर आज सकाळी सर्वजण श्री क्षेत्र झुंज येथे पोहचले. या ठिकाणी नदीपात्रातच कमी उंचीचा धबधबा असून पर्यटक मोठ्या प्रमाणावर येथे गर्दी करतात. सकाळी दहाच्या सुमारास एका नावेतून महादेव मंदिराकडे जात असतांना नाव नदीपात्रात उलटली. नावेमध्ये 11 व्यक्ती होत्या. यामध्ये बहीण, भाऊ, जावई तसेच त्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. त्यापैकी वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुका येथील तारासावंगा गावा

दुर्गवाडा, धारवाड्याचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करा - पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आदेश

Image
                            निम्न वर्धा पुनर्वसितांना न्याय मिळवून द्यावा दुर्गवाडा ,  धारवाड्याचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करा -           पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांचे आदेश   अमरावती ,  दि. १४ : निम्न वर्धा प्रकल्पाच्या दुर्गवाडा ,  धारवाडा या गावांचा दर्जेदार पुनवर्सन योजनेत समावेश करून तिथे अधिकाधिक     सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज नागपूर येथे दिले. या गावांच्या पुनवर्सनाबाबत बैठक नागपूर येथील सिंचनभवनात विदर्भ सिंचन विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांसमवेत झाली ,  त्यावेळी त्या बोलत होत्या. व्हीआयडीसीचे राजेंद्र मोहिते यांच्यासह अभियंता अधिकारी उपस्थित होते. श्रीमती ठाकूर म्हणाल्या की ,  दुर्गवाडा ,  धारवाड्यात १० वर्षांपूर्वी नागरी सुविधात काही सुविधा झाल्या. मात्र योग्य देखभाल झाली नाही. त्यामुळे या गावांचा दर्जेदार पुनर्वसन योजनेत समावेश करून तिथे आवश्यक सुविधा उभाराव्यात.या दोन्ही गावांत पक्के रस्ते निर्माण करावेत.धारवाडा गावातील पाणी पुरवठा योजना बॅक वॉटरमध्ये असल्याने तिचे स्थलांतर व्हा

स्कायवॉक आकर्षण ठरणार असल्याने चिखलदऱ्यातील विकासकामे करावीत - राज्यमंत्री बच्चू कडू

Image
                                                                                                स्कायवॉक आकर्षण ठरणार असल्याने चिखलदऱ्यातील विकासकामे करावीत -राज्यमंत्री बच्चू कडू अमरावती, दि. 14 : चिखलदऱ्यातील स्काय वॉक पर्यटकांचे आकर्षण ठरणार आहे. यामुळे येथे येणाऱ्या पर्यटकांत वाढ होणार असल्याने याठिकाणी करण्यात येणाऱ्या पायाभूत सुविधांसाठी सर्व विभागांनी येथील विकासकामे करावीत, असे निर्देश राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. आज जिल्हाधिकारी कार्यालयात चिखलदारा विकास आराखड्यातील विकास प्रकल्पांच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी आमदार राजकुमार पटेल, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सहायक जिल्हाधिकारी तथा एकात्मिक आदिवासी विकास प्रक्लप अधिकारी वैभव वाघमारे, धारणीचे तहसिलदार वैभव पाटोळे, चिखलदऱ्याच्या तहसिलदार श्रीमती माने आदी उपस्थित होते. श्री. कडू म्हणाले, चिखलदऱ्या उभारण्यात येत असलेला स्काय वॉक देश-विदेशातील पर्यटकांसाठी आकर्षण असणार आहे. स्काय वॉकमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प गतीने पुर्ण होणे गरजेचे आहे. स्काय वॉकवर जाण्यासाठी बिनतारी संदेशाच्या केंद्रा

कोविडकाळात कुटुंबातील कर्ता गमावलेल्या महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण

Image
  ' माविम ',' ग्रीव्ह इंडिया ',' सहयाद्री फाउंडेशन ' व ' लाईफ फर्स्ट ' यांच्या वतीने ' एक हात मदतीचा ' कोविडकाळात कुटुंबातील कर्ता गमावलेल्या महिलांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वितरण अमरावती , दि. १२ : कोविड   प्रादुर्भावात जिल्ह्यातील अनेक कुटुंबियांनी प्रमुख कर्ता व्यक्ती गमावला. अनेक कुटुंबांचा आधार तुटलेला आहे. या महिलांना सर्व संकटांना पेलून आपल्या मुलाबाळांसाठी एक नवी सुरुवात   करावी लागणार आहे. माविमच्या माध्यमातून या महिलांना रोजगार , स्वयंरोजगार , प्रक्रिया उद्योगाचा आधार मिळणार आहे , असे सांगून उपस्थित महिलांचे मनोबल राज्याच्या बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी वाढविले. ग्रीव्ह इंडिया , सहयाद्री फाउंडेशन व लाईफ फर्स्ट यांच्यावतीने ' एक हात मदतीचा ' कार्यक्रम बचत भवन येथे आयोजित करण्यात आला. कोविडमुळे घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या महिला स्वयंसहाय्यता बचत गटातील महिलांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेश वितरीत करण्यात आले. माजी आमदार वीरेंद्र जगताप , जिल्हाधिकारी पवनीत कौर , माविमचे ज

पालकमंत्र्यांनी सोडविल्या दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या समस्या

Image
    शासकीय दूध संकलनात खंड पडू नये          -  पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर पालकमंत्र्यांनी   सोडविल्या दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या समस्या   अमरावती दि 11: शासकीय दूध योजना कार्यालयाने जिल्ह्यातील संस्थांकडून नियमित दूध संकलित करावे. दूध संकलनात खंड पडू नये. दूध संकलनाचे योग्य नियोजन करावे , असे निर्देश जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड यशोमती ठाकूर यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात   आज जिल्ह्यातील दूध पुरवठाधारक शेतकऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत बैठक घेण्यात आली.बैठकीला जिल्हाधिकारी पवनीत कौर , दुग्ध व्यवसाय अधिकारी   गिरीष सोनवणे , प्रादेशिक दुग्ध विकास कार्यालयाचे विकास तावडे आदी उपस्थित होते दुधाची रोजची गरज पूर्ण होण्यासाठी जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांनी प्रत्येकी 50 लिटर दुधाचा शासकीय दूध योजना कार्यालयाला पुरवठा करावा. जिल्हयात सक्रिय सात संस्था शासकीय दुध योजना कार्यालयात दूध पुरवठा करतात. दूध पुरवठा करण्यात नियमीतता असावी. दुधाचा तुटवडा निर्माण होऊ नये याबाबत दक्षता घ्यावी. असे श्रीमती ठाकूर यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी दूध उत्पादक शे