Tuesday, September 28, 2021

जिल्हाधिकाऱ्यांकडून ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी

कोरोना प्रतिबंधक, तसेच इतर आरोग्य उपाययोजनांच्या अनुषंगाने तिवसा ग्रामीण रुग्णालय, मोझरी येथील रुग्णालय आदी ग्रामीण आरोग्य यंत्रणेची पाहणी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज केली.       
यावेळी त्यांनी आरोग्य सुविधांबाबत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, तहसीलदार वैभव फरतारे, गटविकास अधिकारी चेतन जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. ज्योत्स्ना पोटपिटे-देशमुख आदी उपस्थित होते. साथरोग नियंत्रणासाठी उपचार सुविधा व आवश्यक औषध साठा सुसज्ज ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी दिले.       
मोझरी विकास आराखड्यातील कामांची, तसेच शिवणगाव रोपवाटिकेची पाहणीही जिल्हाधिकारी श्रीमती कौर यांनी  केली व तहसील कार्यालयातही विविध कामांचा आढावा घेतला.        
रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शिवणगाव रोपवाटिका विकसित करण्यात आली आहे. मनरेगाच्या माध्यमातून अधिकाधिक विकासकामे राबवावीत.  आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत,  असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...