राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

 






राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना पालकमंत्र्यांच्या हस्ते धनादेश वाटप

अमरावती, दि. ११ : तालुक्यातील राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते  धनादेश वाटप करण्यात आले. या योजनेअंतर्गत घरातील कर्ता पुरुष गमावलेल्या कुटुंबियांना, त्यांच्या वारसांना शासनाकडून वीस हजार रुपये प्रमाणे मदत प्रदान करण्यात येते. जिल्हाधिकारी पवनीत कौर, तहसीलदार संजय काकडे आदी यावेळी उपस्थित होते.  13 लाभार्थ्यांना श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते धनादेश वितरित करण्यात  आले.

राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजनेअंतर्गत तिवसा तालुक्यातील खालील लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले.माहुली जहागीर येथील सोनाली उमक, मंदा बावने व वर्षा गुलहाने, ब्राम्हणवाडा येथील इंदिरा मरसकोल्हे, रामगावच्या शुभदिनी इंगळे, यावली शहिदच्या शेख कमरून शेख रहमान व प्रीती बोराडे, वाघोली येथील सविता सावरकर व काजल नाईक, नांदगाव पेठ येथील पुष्पा पोहनकार, वलगाव येथील विशाखा भगत, रहाटगावच्या अरुणा आठवले आणि पिंपरी येथील वैशाली महल्ले आदी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती