Posts

Showing posts from October, 2019

आठ विधानसभा मतदारसंघांसाठी आज निवडणूक

Image
                              विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 प्रशासन सज्ज ; प्रत्येकाने मतदान करण्याचे प्रशासनाकडून आवाहन अमरावती, दि. 20 :  जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघासाठी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचे मतदान उद्या दि. 21 ऑक्टोबरला 2 हजार 628 मतदान केंद्रावर होणार असून, प्रशासन त्यासाठी सज्ज आहे. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्राकरीता दुर्गम परिसरासह ग्रामीण भागातही मतदान पथके साहित्यासह आज रवाना करण्यात आली. भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेला मतदानाचा अधिकाराचा वापर करुन 21 ऑक्टोबरला प्रत्येकाने आपल्या कुटूंब, मित्रमंडळीसह मतदान मतदान करुन लोकशाही बळकट करावी, असे आवाहन प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. मतदार संख्या :  जिल्ह्यात 12  लाख 59 हजार 644 पुरुष मतदार, 11 लाख 89 हजार 373 स्त्री मतदार तसेच इतर 43 असे एकूण 24 लाख 49 हजार 60 मतदार आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान आज दि. 21 ऑक्टोंबर रोजी होणार असून दि. 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. मतदानाचा वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यं

स्वीप मोहिमे अंतर्गत अमरावती विद्यापीठात मतदान जनजागृती नवमतदारांनी अधिकाधिक संख्येने मतदान करुन लोकशाही बळकट करा स्वीपच्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांचे आवाहन

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019       अमरावती, दि. 16 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप (Systematic Voters Education and Electoral Participation) मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. भारत देश हा तरुणांचा देश असून तरुणांनी आपल्या मतदानाचा अधिकार वापरुन लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करावे, असे आवाहन स्वीप मोहिमेच्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांनी विद्यापीठात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रमात केले. स्वीप मोहिमे अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व विद्यापीठ प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात आयोजित मतदान जनजागृती कार्यक्रम प्रसंगी त्या बोलत होत्या. विद्यापीठाचे कुलगुरु मुरलीधर चांदेकर, राष्ट्रीय सेवा योजनाचे संचालक डॉ. राजेश बुरंगे, स्वीपचे अधिकारी समीर चौधरी, प्रमोद ताडे यांचेसह विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थींनी यावेळी उपस्थित होते. स्वीप मोहिमेअंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालय यांच्या सहभाग घेऊन गावोग

जिल्हाधिकारी कार्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांना अभिवादन

Image
अमरावती, दि. 15 :  माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनीही डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन

Image
अमरावती,  दि . १३  :  महर्षि वाल्मिकी  यांच्या जयंती निमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांनी महर्षि वाल्मिकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी  उपस्थित अधिकारी - कर्मचा-यांनीही  महर्षि वाल्मिकी यांच्या  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. 00000

विभागातील निवडणूक तयारीचा निवडणूक उपायुक्तांकडून आढावा सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी - निवडणूक उपायुक्त चंद्रभूषण कुमार

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अमरावती, दिनांक 12 :  निवडणूक प्रक्रिया निर्भय, पारदर्शक व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडण्याचे निर्देश भारत निवडणूक आयोगाचे उपायुक्त चंद्रभूषण कुमार यांनी आज येथे दिले.             निवडणूक आयोगाच्या पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन अमरावती विभागातील निवडणूक कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. आयोगातर्फे अति. मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे,  कायदा व सुव्यवस्था राज्य नोडल ऑफिसर मिलींद भारंबे, विशेष खर्च निरीक्षक बी. मुरलीकुमार यांच्यासह विभागीय आयुक्त पियूष सिंह, विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे, पोलीस आयुक्त संजय बावीस्कर,  जिल्हाधिकारी शैलेश नवाल, अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, बुलडाण्याच्या जिल्हाधिकारी निरुपमा डांगे, यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांच्यासह सर्व जिल्ह्यांचे पोलीस अधिक्षक आदी यावेळी उपस्थित होते.             श्री. कुमार म्हणाले की, लोकसभा निवडणूकीपेक्षाही विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया ही स्थानिक संदर

स्वीप मोहिमे अंतर्गत शिंगणापूर येथे मतदान जनजागृती

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अमरावती, दि. 11 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्ह्यात स्वीप मोहिमेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे. मतदानाच्या राष्ट्रीय कार्यात सर्वांचा हिरेरिने सहभाग वाढावा, यासाठी दर्यापूर तालुक्यातील शिंगणापूर ग्राम पंचायतीमध्ये ‘कौन बनेगा करोडपती’च्या विजेता तथा स्वीपच्या सदिच्छा दूत बबीता ताडे व नोडल अधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्याव्दारे मतदान जनजागृती आज करण्यात आली. स्वीप मोहिमेअंतर्गत मतदान जनजागृती करण्यासाठी प्रशासनाच्यावतीने शाळा, महाविद्यालय, स्वयंसेवी संस्था, शासकीय कार्यालय यांच्या सहभाग घेऊन गावोगावी जागर सुरु करण्यात आला आहे. येत्या 21 ऑक्टोंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदान दिवशी सर्वांनी मतदान करावे, यासाठी स्वीपच्या नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मनीषा खत्री यांच्यामार्फत जिल्हाभर मतदान जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून ‘कौन बनेगा करोडपती’च्या सदिच्छा दूत बबीता ताडे यांच्यातर्फे मतदान जनजागृती करण्यात येत आहे.

प्रसारभारतीच्या 'न्यूज ऑन एअर' ॲपवर 'विशेष निवडणूक वार्तापत्र'

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अमरावती,दि. 11 : प्रसारभारतीचे    'न्यूज ऑन एअर ' या ॲपवर    माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित    'विशेष निवडणूक वार्तापत्र'    दि. 12 ऑक्टोबर रोजी    सकाळी 7.25 ते 7. 45 या वेळेत ऐकता येणार आहे. अमरावती आकाशवाणीवरही हे वार्तापत्र प्रसारित केले जाणार आहे.                                                                                                                                                                               आकाशवाणीवरील 'दिलखुलास' कार्यक्रमात 'विशेष निवडणूक वार्तापत्र' शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी    सकाळी 7.25 ते 7. 45 या    वेळेत अमरावतीसह राज्यातील    मुंबई, पुणे, नागपूर,औरंगाबाद,‍नाशिक, जळगांव, कोल्हापूर,परभणी, रत्नागिरी, सांगली, अहमदनगर,अकोला, बीड, चंद्रपूर, धुळे, नांदेड, सिंधुदुर्गनगरी, उस्मानाबाद, सातारा, सोलापूर, यवतमाळ या 22 आकाशवाणी केंद्रावरून प्रसारित केले जाईल.

चांदूर रेल्वे येथे सोळाशे कर्मचा-यांना निवडणूक प्रशिक्षण

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019                                                                                             अमरावती, दि. 11 :  धामणगाव रेल्वे मतदारसंघातील सुमारे सोळाशे कर्मचा-यांचा निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून, त्यात काल चांदूर रेल्वे येथील आयटीआय संस्था व जिल्हा परिषद विद्यालयात प्रशिक्षण वर्ग पार पडला. निवडणूक निर्णय अधिकारी रणजीत भोसले, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र इंगळे, नायब तहसीलदार बबन राठोड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी ईव्हीएम प्रात्यक्षिकासह मॉकपोल, मतदान प्रक्रिया, दस्तऐवज पूर्ण करणे आदी विविध बाबींची माहिती देण्यात आली.                                                  000

खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी यांच्याकडून लेखा तपासणी माहिती सादर न करणा-या उमेदवारांना नोटिसा काढा - खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अमरावती, दि. 11 :  लेखाविषयक खर्च सादर न करणा-या व अनुपस्थित राहणा-या उमेदवारांना नोटिसा काढण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक रामकृष्ण बंडी यांनी आज विविध मतदारसंघांच्या तपासणीदरम्यान दिले.             श्री. बंडी यांनी आज अमरावती निवडणूक कार्यालय, बडनेरा मतदारसंघाचे भातकुली तहसीलस्थित कार्यालय व धामणगाव रेल्वे मतदारसंघाच्या चांदूर रेल्वे येथील कार्यालयात निवडणूक खर्चाची तपासणी केली व आढळून आलेल्या त्रुटींबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.    सर्व उमेदवारांनी आपापल्या खर्चाचे लेखे तपासणीसाठी वेळेत सादर करणे आवश्यक आहे. लेखे सादर न करणा-या उमेदवारांविरुद्ध   लोकप्रतिनिधी अधिनियम   1951   मधील बाब क्रमांक   77   मधील तरतूदीनुसार दंडात्मक कार्यवाही ची तरतूद आहे.   त्यामुळे माहिती सादर न केल्यास निवडणूक आयोगाला कळविण्यात येईल, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.                                                   पुढील तपासणी 15 तारखेला विधानसभा  सार्वत्रिक निवडणूक लढविणा - या सर्व उमेदवारां च्या दैनंदिन निवडणूक खर्चाची पुढील तपासणी दि. 15 व 19

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत रँडमायझेशनची प्रक्रिया सरमिसळीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 अमरावती, दि. 9 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अनुषंगाने ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅटच्या   सरमिसळीकरणाची (रँडमायझेशन) प्रक्रिया निवडणूक निरीक्षक (सामान्य) यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या    सभागृहात झालेल्या सरमिसळीकरणाच्या प्रक्रियेला उमेदवार किंवा त्यांच्या वतीने प्रतिनिधीही उपस्थित होते. यावेळी  सामान्य निवडणूक निरीक्षक राजीव शर्मा, अभिषेक भगोटिया, प्रेमानंद खुंटिया, महावीरप्रसाद शर्मा,  जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शरद पाटील, इटीपीबीएस व मतपत्रिका नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी अजय लहाने, संगणीकीकरण प्रशिक्षण नोडल अधिकारी तथा जिल्हा सूचना अधिकारी अरुण रणवीर, अतिरिक्त सूचना अधिकारी मनीष फुलझेले यावेळी उपस्थित होते.    जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघातील 2 हजार 628 मतदान केंद्रासाठी 3 हजार 156 बॅलेट युनिट, 3 हजार 174 कंट्रोल युनिट व 3 हजार 622 व्हीव्हीपॅट मशीनचे स्कॅनिंग व   सरमिसळीकरण   झाले. तसेच आठही विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्राकरीता

महिला व नवमतदारांत ‘चिंगी’ बाहुली लोकप्रिय

Image
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019                                ‘पपेट शो’च्या माध्यमातून मतदार जागृती             अमरावती, दि. 9 :  ‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो !’ असे म्हणत दिलखुलास संवादाच्या माध्यमातून मतदारांना मतदानाचे महत्व पटवून देणारी ‘चिंगी’ ही बोलकी बाहुली जिल्ह्यातील महिला व नवमतदारांमध्ये लोकप्रिय होत आहे.              शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेत विषय सहायक म्हणून कार्यरत असलेल्या दीपाली बाभुळकर या मतदान जागृतीसाठी ठिकठिकाणी बोलक्या बाहुल्यांचे खेळ सादर करत असून, त्यांची ‘चिंगी’ ही बोलकी बाहुली नागरिकांचे मन जिंकून घेत आहे. गर्दीच्या ठिकाणी, शाळा- महाविद्यालये, वेगवेगळ्या वसाहती अशा विविध ठिकाणी  श्रीमती बाभुळकर या बोलक्या बाहुल्यांचे खेळ सादर करत आहेत. त्याला नागरिकांच मोठा प्रतिसाद मिळत आहे.              श्रीमती बाभुळकर या काही वर्षांपासून ‘दुनिया बोलक्या बाहुल्यांची’ या कार्यक्रमातून, समाजजागृतीचे विधायक कार्य करत आहेत.  विधानसभेची निवडणूक जाहीर होताच त्यांनी स्वीप मोहिमेअंतर्गत ठिकठिकाणी ‘पपेट शो’ सादर करायला सु