Wednesday, October 9, 2019

प्रत्येक काम अचूक व सुस्पष्ट असावे - निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह राजपूत

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2019
                             निवडणूक अधिकारी- कर्मचारी प्रशिक्षणाला वेग
                           


अमरावती, दि.  9 : निवडणूक हे राष्ट्रीय कार्य असून, त्यासाठी नियुक्त प्रत्येक अधिकारी व कर्मचा-याने आपली जबाबदारी जाणून घेऊन गांभीर्याने काम करावे. आपले प्रत्येक काम अचूक व सुस्पष्ट असले पाहिजे, असे निर्देश अमरावती विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी उदयसिंह राजपूत यांनी आज येथे दिले.
          मतदारसंघात निवडणूकीसाठी नियुक्त पथकातील मतदान केंद्राध्यक्ष व सहायक अधिकारी अशा एकूण 340 अधिकारी- कर्मचा-यांचे प्रशिक्षण आज श्री संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवनात झाले, त्यावेळी ते बोलत होते.  निवडणूक निर्णय अधिकारी श्री. राजपूत व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी प्रज्ञा महांडुळे यांनी या प्रशिक्षण वर्गात मार्गदर्शन केले.
          ईव्हीएम यंत्रणेसह प्रत्यक्ष कार्यवाहीबाबत यावेळी बारीकसारीक बाबींसह माहिती देण्यात आली. सर्व शंकांचे निराकरण करून घ्यावे. या प्रक्रियेत एकही चूक होता कामा नये. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक निर्देशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश श्री. राजपूत यांनी दिली. दरम्यान, सामान्य निवडणूक निरीक्षक आशिष भगोटिया यांनी या प्रशिक्षणातील पहिल्या सत्रात भेट देऊन प्रशिक्षण वर्गाची पाहणी केली.
          औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ईव्हीएम यंत्रणेबाबत ‘हँडस ऑन ट्रेनिंग’ही मतदान अधिका-यांना आज देण्यात आले. जिल्हा निवडणूक अधिकारी शैलेश नवाल यांनी यावेळी भेट देऊन पाहणी केली.
निवडणूकीसाठी नियुक्त अधिकारी व कर्मचा-यांच्या प्रशिक्षण प्रक्रियेने वेग घेतला असून, प्रशिक्षण उद्या चांदूर रेल्वे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तिवसा येथील वाय. डी. व्ही. डी. कला व वाणिज्य महाविद्यालयात होणार आहे.  
                                         000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 04-09-2025

  जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपाच्या ४५ पदांसाठी रोजगार मेळावा     अमरावती, दि. ४ : जिल्हाधिकारी कार्यालयात अनुकंपा तत्त्वावरील ४५ पदांवर न...