Posts

Showing posts from March, 2023

जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरामेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा

Image
जिल्ह्याच्या  शिरपेचात मानाचा तुरा मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला जागतिक मानकाचा दर्जा अमरावती, दि. 29 : जागतिक स्तरावरील ‘ग्लोबल टायगर फोरम’तर्फे (जीटीएफ) मेळघाट व्याघ्र प्रकल्पाला ‘कंझर्वेशन ॲश्युअर्ड टायगर स्टँडर्ड’ (कॅटस्) या जागतिक मानकाचा दर्जा जाहीर करण्यात आला आहे. वाघाच्या संवर्धनासाठी आवश्यक मानकांची पूर्तता प्रकल्पाने केली असल्याने हा बहुमान प्राप्त झाला असून, अरण्यसमृद्ध अमरावती जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.     सातपुड्याच्या पर्वतरांगांत वसलेला मेळघाट व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या नऊ व्याघ्र प्रकल्पांपैकी एक आहे. उंच समांतर पर्वतरांगा, उत्तुंग सागवृक्ष, मिश्र वनांचे पट्टे, धबधबे यांनी समृद्ध मेळघाटात गौर, सांबरसारख्या प्राण्यांपासून पक्षी, फुलपाखरे, कीटकांपर्यंत विपुल जैवविविधता आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण करत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा सन्मान मिळण्याचा योग प्रकल्पाच्या अधिकारी व कर्मचा-यांच्या, तसेच अमरावतीकरांच्या आनंदात भर घालणारा आहे. व्याघ्र प्रकल्पाचे सामाजिक, सांस्कृतिक, जैविक महत्व, व्यवस्थापन

जिल्ह्यात कृषी विभागातर्फे चारशेहून अधिक शेतीशाळा पीक मार्गदर्शनासाठी शेतीशाळा प्रभावी माध्यम

Image
  जिल्ह्यात कृषी विभागातर्फे चारशेहून अधिक शेतीशाळा पीक मार्गदर्शनासाठी शेतीशाळा प्रभावी माध्यम   अमरावती, दि. २८ :   शेतकरी बांधवांना शेतातील पिकाविषयी प्रत्यक्ष माहिती, मार्गदर्शन देणारी शेतीशाळा हे प्रभावी माध्यम ठरले आहे. कृषी उत्पादकतेत भर पडण्यासाठी आवश्यक बाबींचे प्रशिक्षणच याद्वारे मिळत असून, जिल्ह्यात कृषी विभागातर्फे चारशेहून अधिक शेतीशाळा घेण्यात आल्या आहेत. प्रत्यक्ष शेतावर या शेतीशाळा घेण्यात येत असून, शेतक-यांकडून घेतले जाणा-या पिकांची परिपूर्ण माहिती व मार्गदर्शन त्यांना देण्यात येते. गावातील पीक क्षेत्र निवडून परिसरातील त्या पिकाचे उत्पादन घेणा-या शेतकरी बांधवांना एकत्र आणून त्यांना व्याख्याने व अधिकाधिक प्रात्यक्षिकातून अनुभवाधारित शिक्षण दिले जाते. आवश्यक तिथे अद्ययावत तंत्रज्ञानाचे पथदर्शी प्रात्यक्षिकही घेतले जाते. एकात्मिक पीक व्यवस्थापन, एकात्मिक कीड व्यवस्थापन, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन आदी बाबींचे धडे या शेतीशाळेतून मिळतात. खरीप व रब्बी हंगामात पीकनिहाय शेतीशाळा घेतल्या जातात. गत वर्षभरात संत्रा फळपीकासाठी 131, कापूस पिकासाठी 28, सोयाबीनसाठी 112,

अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी गौण खनिज धोरण - महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

Image
  अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी गौण खनिज धोरण -         महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील               अमरावती, दि. 27 : राज्यातील गौण खनिजांचे अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्याकरिता लवकरच गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण आणण्यात येईल. त्यामुळे नागरिकांना कमी दरात वाळू उपलब्ध होईल, त्यासाठी आवश्यक डेपो आदी तयारी प्रशासनाकडून होत आहेत, असे प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केले.             महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महसूल व पशुसंवर्धन विभागाची बैठक नियोजनभवनात झाली, त्यावेळी ते बोलत होते. माजी राज्यमंत्री तथा आमदार प्रवीण पोटे पाटील, आमदार प्रताप अडसड, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविष्यांत पंडा, महापालिका आयुक्त प्रवीण आष्टीकर, सहायक जिल्हाधिकारी रिचर्ड यानथन, उपायुक्त संजय पवार आदी यावेळी उपस्थित होते. मंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, राज्यात यावर्षीपासून नविन वाळू धोरण शासनाने आणले असून आगामी पंधरा दिवसात त्याची सर्वच जिल्ह्यांमध्ये अंमलबजावणी होणार आहे. नविन वाळू धोरण सर्वसा

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण

Image
  महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी शासन कटीबध्द -राधाकृष्ण विखे-पाटील           अमरावती, दि. २७: तहसील कार्यालय हे तालुक्याच्या विकासाचे केंद्रबिंदू असते. ग्रामीण भागातील सामान्य जनतेच्या मागण्या, प्रश्न व अडीअडचणी या ठिकाणाहून सोडविण्यात येते. सद्यस्थितीत प्रत्येक क्षेत्रात ऑनलाईन तंत्रज्ञान विकसित झाले असून प्रशासनाची व्याप्ती वाढली आहे. तहसील कार्यालयाच्या नवनिर्मित वास्तूच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकाला न्याय मिळवून देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन तथा दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आज येथे केले.     जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण मंत्री श्री. विखे-पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करुन आज झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. आमदार प्रताप अडसड, आमदार प्रवीण पोटे-पाटील, जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी, विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय, जिल्हाधिकारी पवनीत कौर,   अधीक्षक अभियंत

क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार उपचार आवश्यक - डॉ. अजय डवले

 क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार उपचार आवश्यक -  डॉ. अजय डवले अमरावती, दि. 24 : जगात क्षयरोगाने दरवर्षी 16 लाख मृत्यू होतात. त्यातील 25 टक्के मृत्यू भारतात होतात. क्षयरोग निर्मूलनासाठी ‘स्टँडर्ड रेजिमन’नुसार अचूक निदान, तत्काळ उपचार व पाठपुरावा आवश्यक असून, त्यासाठी शासकीय आरोग्य यंत्रणा सतत प्रयत्नरत असते, असे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य डॉ. अजय डवले यांनी येथे सांगितले.    जागतिक क्षयरोग दिनानिमित्त केंद्रातर्फे आयोजित जनजागृती कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की, क्षयरूग्णांच्या मृत्यूची भारतातील आकडेवारी चिंताजनक आहे. कोविडकाळात हे प्रमाण आणखी वाढले. क्षयरोगासाठी अचूक उपचारप्रणालीचे पालन होणे आवश्यक असते. अनेकदा तसा औषधोपचार न मिळाल्याने रूग्ण प्रकृतीत सुधारणा होत नाही. शासकीय आरोग्य यंत्रणा तंतोतंत निदान, अचूक उपचार व पाठपुरावा काटेकोरपणे करते. निक्षय मित्र व शासनाला सहकार्य करणा-या स्वयंसेवी संस्थाही रूग्णाला रोगमुक्त करण्यास तत्पर असतात. या यंत्रणेचा लाभ गरजूंना मिळण्यासाठी जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉ. वासनिक यांनीही यावेळी

आदिवासी युवकांसाठी विनामूल्य स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षण

 आदिवासी युवकांसाठी विनामूल्य स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षण  अमरावती, दि. 24 : परतवाड्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राद्वारे विविध पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षण देऊन तयारी करून घेतली जाते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.  प्रशिक्षण कालावधी साडेतीन महिन्यांचा असून त्यात प्रशिक्षणार्थीना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणारांना विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य मिळतो. प्रशिक्षणासाठी किमान पात्रता दहावी उत्तीर्ण आहे, तसेच दि. 1 एप्रिल 2023 रोजी वयाची किमान 18 वर्षे पूर्ण असावीत. त्याचप्रमाणे, दि. 15 जुलै 2023 रोजी 30 वर्षे पूर्ण केलेली नसावी.    प्रशिक्षणाचे सत्र एप्रिलमध्ये सुरू होत असून, इच्छूकांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे, लाल पुलाजवळ, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती (दूरध्वनी क्र. 07223-221205 व मोबाईल नं. 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधावा.   

चुरणीत वैद्यकीय शिबिराचा दीड हजारांवर रूग्णांना लाभ

 चुरणीत वैद्यकीय शिबिराचा दीड हजारांवर रूग्णांना लाभ  अमरावती, दि. 24 : चिखलदरा तालुक्यातील चुरणी येथील ग्रामीण रुग्णालयात चार दिवसांचे वैद्यकीय व दंतरोग आणि नेत्रतपासणी शिबीर नुकतेच झाले. मेळघाटातील दुर्गम भागातील दीड हजारांवर रूग्णांना त्याचा लाभ झाला.   मेळघाटबरोबरच मध्यप्रदेशातील रुग्णांनीही शिबिराचा लाभ घेतला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे व अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे यांच्या मार्गदर्शनात शिबीर घेण्यात आले. त्यात 1 हजार 638 रुग्णांची तपासणी करण्यात आली. तपासणीत दंतरोग, स्त्रीरोग, बालरोग, जनरल शस्त्रक्रिया कान, नाक, घसा, अस्थिव्यंग या सर्व प्रकारातील एकूण 80 शस्त्रक्रिया करण्यात आल्या व 5 रुग्णांना पुढील उपचारासाठी मोठ्या रूग्णालयांत संदर्भित करण्यात आले, अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक व नेत्र शल्यचिकित्सक डॉ. रामदेव वर्मा यांनी दिली.  डॉ. वर्मा यांनी  एक काच बिंदू रूग्ण व 40 संशयित मोतीबिंदू रुग्णांपैकी 29 रुग्णांची निवड करून मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात संदर्भित केले. सामान्य शस्त्रक्रियांमध्ये 30 दंत शस्त्रक्रिया, पाच ऑर्थो, एक गा

एपीएल कार्डधारक शेतकरी बांधवांना धान्याऐवजी वर्षाकाठी अठराशे रुपये अमरावती जिल्ह्यात पावणेचार लाख लाभार्थ्यांना लाभ

 एपीएल कार्डधारक शेतकरी बांधवांना धान्याऐवजी वर्षाकाठी अठराशे रुपये  अमरावती जिल्ह्यात पावणेचार लाख लाभार्थ्यांना लाभ          अमरावती, दि. 24 : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त चौदा जिल्ह्यांतील एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी बांधवांना अन्नधान्याऐवजी आता थेट रोख रक्कम हस्तांतरण (डीबीटी) करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, प्रति लाभार्थी वार्षिक एक हजार आठशे रूपये रुपये  देण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यातील 3 लाख 79 हजार 882 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे.        राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियमांतर्गत एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबांना प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांप्रमाणे अन्नधान्याचा लाभ देण्यात येत होता. मात्र राज्य शासनाने अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अमरावती जिल्ह्यातील एकूण 93 हजार 778 शेतकरी कुटूंबांतील  3 लाख 79 हजार 882 या व्यक्तींना दरवर्षी 1 हजार 800 रुपये डीबीटीद्वारे देण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे यांनी दिली.       राज्यात अमरावती विभागातील अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, तसेच नागपूर विभागात

विभागीय आयुक्तांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी

Image
  विभागीय आयुक्तांकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी पंचनामे तात्काळ पूर्ण करा -विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय   अमरावती, दि. 20 : अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे व्यवस्थित व काळजीपूर्वक करा. नुकसान भरपाईपासून एकही शेतकरी वंचित राहू नये, असे आदेश विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांनी आज दिले. अमरावती जिल्ह्यातील काही भागात शनिवार व रविवारदरम्यान (दि. 18 व 19 मार्च) अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे जिल्ह्यातील शेती व शेतमालाचे नुकसान झाले आहे. दोन दिवसात जिल्ह्यात सरासरी 14.5 मि. मी. पाऊस पडला.   तसेच अमरावती तालुक्यात 663.50 हे.आर शेतीचे नुकसान झाले. त्यात गहू, हरभरा, संत्रा पीकाचे नुकसान झाल्याचा अहवाल आहे. वडगांव माहोरे येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय व जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केली. यावेळी डॉ. पाण्डेय यांनी जिल्हा प्रशासनाला त्वरित कार्यवाही करण्याची सूचना दिली. जिल्हा प्रशासनामार्फत नुकसान झालेल्या शेतीची पाहणी करुन पंचनामा करण्याची कार्यवाही सुरु आहे. डॉ. पाण्डेय यांनी वडगांव माहोरे येथील पांडुरंग श्रीखंड

'इन्फ्लूएंझा’बाबत परिस्थितीचा आढावा यंत्रणा सुसज्ज करा; तपासण्यांचे प्रमाण वाढवा - जिल्हाधिकारी पवनीत कौर

Image
  'इन्फ्लूएंझा’बाबत परिस्थितीचा आढावा यंत्रणा सुसज्ज करा; तपासण्यांचे प्रमाण वाढवा -       जिल्हाधिकारी पवनीत कौर   अमरावती, दि. 20 : जिल्ह्यात इन्फ्लुएंझाचे रूग्ण आढळून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर तपासण्यांचे प्रमाण वाढवावे. आवश्यक तिथे तत्काळ उपचारासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवा, असे निर्देश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज येथे दिले. जिल्ह्यात उद्भवलेल्या इन्फ्लूएंझा संसर्ग एच -३ एन- २ आजाराविषयीची आढावा बैठक जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली महसूलभवनात झाली, त्यावेळी त्या बोलत होत्या. जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा, पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिलीप सौंदाळे, डॉ. प्रमोद निरवणे, डॉ. सुभाष ढोले, डॉ. प्रशांत घोडाम, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव डॉ. विक्रम देशमुख, डॉ. प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी श्रीमती कौर म्हणाल्या की,    बाधित रुग्णांवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवावी.   रोज किमान एक हजार तपासण्या व्हाव्यात. औषधसाठा पुरेसा असल्याची खात्री करावी. लसीकरणाचा वेग वाढवावा. आवश्यक तिथे खास

विभागीय लोकशाही दिनात 10 तक्रारींवर कार्यवाही

Image
    विभागीय   लोकशाही दिनात 10 तक्रारींवर कार्यवाही           अमरावती, दि.13:   विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली   विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी   प्रलंबित   8 तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच   नवीन वेळेवर आलेल्या 2 तक्रारी संबंधितांकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आल्या. उपायुक्त संजय पवार, एम. व्ही. प्रधान, श्री. कवडे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कामगार विभागाचे राहुल काळे, ठाणेदार राजीव साळवे यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागाचे अधिकारी   यावेळी   उपस्थित होते. 00000  

जागतिक महिलादिनानिमित्त 119 महिलांचे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

Image
  राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षिणता कार्यक्रम जागतिक महिलादिनानिमित्त 119 महिलांचे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण *  सर्वोकृष्ट नेत्र शल्य चिकित्सक म्हणून डॉ. नम्रता सोनवणे यांचा गौरव अमरावती, दि. 8 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 1 ते 8 मार्च या कालावधीत 119 महिलांचे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागात दरवर्षी मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतात. या आर्थिक वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत 4 हजार 670 मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या. मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया कार्याच्या यशस्वीतेबद्दल महिला दिनाचे औचित्य साधून नेत्र शल्य चिकित्सक डॉ. नम्रता सोनवणे यांना ‘जनऔषधी दिवस ’  व ‘महिला आरोग्य दिना ’ निमित्त मुंबई येथे राज्यपाल व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘सर्वोकृष्ट नेत्र शल्य चिकित्सक ’  कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नेत्र विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी श्रीमती

धान्य महोत्सव दालनातील सेंद्रीय धान्याला अमरावतीकरांची पसंती

Image
  जिल्हा कृषी महोत्सव 2023   धान्य महोत्सव दालनातील सेंद्रीय धान्याला अमरावतीकरांची पसंती   अमरावती, दि. 3 : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा), महिला आर्थिक विकास महामंडळ व कारितास इंडिया यांच्या सहकार्याने सायन्सकोर मैदानावर सुरु असलेल्या प्राकृतिक कृषी, मिलेटस् व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. हा महोत्सव 5 मार्चपर्यंत चालणार आहे. यात भरडधान्यापासून तयार करण्यात आलेले पौष्टिक व चविष्ट पदार्थ, सेंद्रीय डाळी, धान्य, कृषी अवजारे  विक्रीस उपलब्ध आहेत. कृषी महोत्सवाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. धान्य महोत्सव दालन जिल्हा कृषी महोत्सवाम ध्ये स्वतंत्ररित्या ‘धान्य महोत्सव दालन ’  स्थापन करण्यात आले आहे. या दालनामध्ये केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातूनही शेतकरी सेंद्रीय धान्य विक्रीस घेऊन आले आहे. या सेंद्रीय धान्याला नागरिकांकडून चांगली मागणी होत आहे. यामध्ये चनाडाळ, विनापॉलीश केलेली तुरीची डाळ, विविध वाणाचे तांदूळ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तुरीच्या डाळीपासून तयार करण्यात येणारा चविष्ट ‘कळणा ’  तसेच आरोग्यवर्धक ‘खपल