Monday, March 13, 2023

विभागीय लोकशाही दिनात 10 तक्रारींवर कार्यवाही

 




 

विभागीय  लोकशाही दिनात 10 तक्रारींवर कार्यवाही

         अमरावती, दि.13:  विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय यांच्या अध्यक्षतेखाली  विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभाकक्षात आज विभागीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी  प्रलंबित  8 तक्रारींचा आढावा घेण्यात आला. तसेच  नवीन वेळेवर आलेल्या 2 तक्रारी संबंधितांकडे पुढील कार्यवाहीसाठी सुपूर्द करण्यात आल्या.

उपायुक्त संजय पवार, एम. व्ही. प्रधान, श्री. कवडे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप सूर्यवंशी, कामगार विभागाचे राहुल काळे, ठाणेदार राजीव साळवे यांच्यासह सहकार, आरोग्य, महापालिका, महिला व बाल विकास, भूमापन, लेखा व कोषागारे आदी विभागाचे अधिकारी  यावेळी  उपस्थित होते.

00000

 

No comments:

Post a Comment

विशेष लेख - गडांचा राजा : राजगड

  गडांचा राजा : राजगड   सह्याद्रीच्या उंच डोंगररांगांच्या कुशीत उभा असलेला, भव्यता आणि ऐतिहासिक वैभव यांचा अद्वितीय संगम म्हणजे राजगड! छ...