Wednesday, March 8, 2023

जागतिक महिलादिनानिमित्त 119 महिलांचे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

 राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण व दृष्टीक्षिणता कार्यक्रम

जागतिक महिलादिनानिमित्त 119 महिलांचे

मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण

सर्वोकृष्ट नेत्र शल्य चिकित्सक म्हणून डॉ. नम्रता सोनवणे यांचा गौरव

अमरावती, दि. 8 : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे 1 ते 8 मार्च या कालावधीत 119 महिलांचे मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्र विभागात दरवर्षी मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया करण्यात येतात. या आर्थिक वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत 4 हजार 670 मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आल्या.

मोतीबिंदू नेत्र शस्त्रक्रिया कार्याच्या यशस्वीतेबद्दल महिला दिनाचे औचित्य साधून नेत्र शल्य चिकित्सक डॉ. नम्रता सोनवणे यांना ‘जनऔषधी दिवस व ‘महिला आरोग्य दिनानिमित्त मुंबई येथे राज्यपाल व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘सर्वोकृष्ट नेत्र शल्य चिकित्सक कार्याबद्दल पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नेत्र विभागाने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी श्रीमती डॉ. सोनवणे तसेच नेत्र विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

जागतिक महिला दिनानिमित्त अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नरेंद्र सोळंके, अधिसेविका ललिता अटाळकर, आहारतज्ज्ञ कविता देशमुख, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक व जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक डॉ. संतोष भोंडवे, नेत्र शल्य चिकित्सक डॉ. कुणाल वानखडे, डॉ. दिप्ती उमरे, डॉ. अंकिता राऊत, विभाग प्रमुख विद्या भुसारे, नेत्र शस्त्रक्रियागृह प्रमुख प्रमिला कांबळे, नेत्र शल्यगृह परिचारिका सोनाली चांदेकर, कांचन सातार, सविता मुंदाणे, पल्लवी पेठे, मोनाली शिरभाते, आम्रपाली क्षीरसागर, गोपाल डागर, नेत्र कक्ष परिचर विरु चव्हाण, विक्की मोगरे, शुभांगी ढोके, रुपेश सोनगडे आदी उपस्थित होते.

नेत्र विभागातील नेत्र चिकित्सा अधिकारी भरत गोयनका, राजेंद्र फसाटे, मनोज देशमुख, अमित शिंदे, पूजा चव्हाण, निलेश ढेंगळे तसेच अतिदक्षता विभागाच्या प्रमुख परिचारिका मंदा ढगे, कालिंदी ढगे, मनिषा कांबळे, श्रीमती धाकडे, श्रीमती सारा, रेखा तेटू, श्रीमती लोणारे, शोभा पेंदाम, कांचन कटके आदी परिचारिका उपस्थित होत्या.

कार्यक्रमाचे संचालन आणि आभार सेवानिवृत्त नेत्र चिकित्सा अधिकारी गायत्री फडनीस यांनी केले. डॉ. नरेंद्र सोळंके यांनी महिला आरोग्याबद्दल घ्यावयाच्या दक्षतेबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

0000





No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...