Thursday, March 2, 2023

दिव्यांगांचे तपासणी शिबिर तसेच साहित्य वाटप कार्यक्रमांच्या तारखांमध्ये बदल

 

दिव्यांगांचे तपासणी शिबिर तसेच साहित्य वाटप कार्यक्रमांच्या तारखांमध्ये बदल

* संबंधितांनी नोंद घेण्याचे आवाहन

अमरावती, दि. 2 : अमरावती जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात भारत सरकारच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्यावतीने भारतीय कृत्रीम अंग निर्माण निगम (एलिम्को), मुंबई यांच्या मार्फत भारत सरकारच्या एडीआयपी योजनेंतर्गत दिव्यांगांना साहित्य वाटप व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या दिनांकांमध्ये अंशत: बदल करण्यात येत आहे.

            जिल्ह्यातील चौदाही तालुक्यामधील शिबिर हे तहसील कार्यालयामध्ये आयोजित करण्यात येणार आहे. तेव्हा प्रत्येक तहसील कार्यालयात दिव्यांग बांधव तसेच वैद्यकीय तज्ज्ञांना बसण्यास पुरेशी जागा, पाणी व्यवस्था तसेच आवश्यक त्या सोयी-सुविधा तहसील कार्यालय स्तरावर पुरविण्यात याव्यात, असे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी दिले आहे.

यामध्ये नांदगाव खंडेश्वर येथे बुधवार, दि. 8 मार्चला, मोशी येथे गुरुवार, दि. 9 मार्चला, वरुड येथे शुक्रवार, दि. 10 मार्च रोजी, धामणगाव रेल्वे येथे शनिवार, दि. 11 मार्च रोजी, चांदुर रेल्वे येथे रविवार, दि. 12 मार्च रोजी, अंजनगाव सुर्जी येथे सोमवार, दि. 13 मार्च रोजी, दर्यापूर येथे मंगळवार, दि. 14 मार्च रोजी, तिवसा येथे बुधवार, दि. 15 मार्च रोजी, भातकुली येथे गुरुवार, दि. 16 मार्च रोजी, अचलपूर येथे शुक्रवार, दि. 17 मार्च रोजी, अमरावती येथे शनिवार, दि. 18 मार्च रोजी, चांदुर बाजार येथे रविवार, दि. 19 मार्च रोजी, धारणी येथे सोमवार, दि. 20 मार्च रोजी तसेच चिखलदरा येथे मंगळवार, दि. 21 मार्च रोजी शिबिर आयोजित करण्यात आले आहे, याची संबंधितांनी नोंद घेण्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

*****

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...