धान्य महोत्सव दालनातील सेंद्रीय धान्याला अमरावतीकरांची पसंती

 जिल्हा कृषी महोत्सव 2023

 

धान्य महोत्सव दालनातील सेंद्रीय धान्याला

अमरावतीकरांची पसंती

 

अमरावती, दि. 3 : कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेतर्फे (आत्मा), महिला आर्थिक विकास महामंडळ व कारितास इंडिया यांच्या सहकार्याने सायन्सकोर मैदानावर सुरु असलेल्या प्राकृतिक कृषी, मिलेटस् व जिल्हास्तरीय कृषी महोत्सवाचा आज तिसरा दिवस आहे. हा महोत्सव 5 मार्चपर्यंत चालणार आहे. यात भरडधान्यापासून तयार करण्यात आलेले पौष्टिक व चविष्ट पदार्थ, सेंद्रीय डाळी, धान्य, कृषी अवजारे  विक्रीस उपलब्ध आहेत. कृषी महोत्सवाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

धान्य महोत्सव दालन

जिल्हा कृषी महोत्सवाम


















ध्ये स्वतंत्ररित्या ‘धान्य महोत्सव दालन स्थापन करण्यात आले आहे. या दालनामध्ये केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातूनही शेतकरी सेंद्रीय धान्य विक्रीस घेऊन आले आहे. या सेंद्रीय धान्याला नागरिकांकडून चांगली मागणी होत आहे. यामध्ये चनाडाळ, विनापॉलीश केलेली तुरीची डाळ, विविध वाणाचे तांदूळ उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तुरीच्या डाळीपासून तयार करण्यात येणारा चविष्ट ‘कळणा तसेच आरोग्यवर्धक ‘खपली गहू अमरावतीकरांना आकर्षित करीत आहे. येथे धारणी व मेळघाट भागातील कुटकी, सावा, कोदो, राजगिरा या पौष्टिक भरडधान्यापासून तयार पीठे, भाजणी पीठे यांची रेलचेल आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक असणारे गांडूळ खत, वर्मी वॉश फवारणी द्रावण आणि परसातील बागेसाठी लागणारे उत्कृष्ट प्रतीचे नैसर्गिक खतेही उपलब्ध आहेत.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, गणोरी, ता. भातकुली येथील बचतगटामार्फत ग्रामीण भागात प्रसिध्द असणारी ‘चणोली ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. तसेच येथे अद्रक, विलायची टाकलेला स्वादयुक्त गुळाची मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. जळगाव येथून आलेले केळीचे चिप्स तसेच ‘सुकेळी, रोस्टेड ज्वारी यांनाही चांगली मागणी आहे. याशिवाय विनारंगाची नैसर्गिक हळद पावडर घरीच तयार करण्यासाठी हळदीचे तुकडेही उपलब्ध आहेत. या दालनामध्येच नैसर्गिक रंगापासून तयार केलेले कुंकू, अगरबत्ती, धूपबत्ती यांचेही स्टॉल्स आहेत.

 

शेतकऱ्यांना मदतनीस ठरणारी शेती उपकरणे

          जिल्हा कृषी महोत्सवामध्ये शेती उपकरणाचे स्वतंत्र दालन आहे. यामध्ये नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शेती उपकरणे शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकासह दाखविण्यात येत आहे. तसेच विक्रीसही उपलब्ध आहे. ‘पॉवर वीडर या यंत्राव्दारे शेतीतील आंतरमशागतीचे काम करणे सुलभ होते. यामध्ये डवरणे, खुरपणी, रोटाव्हेटर, फवारणी यासारखी कामे करता येतात.  यावर शेतकऱ्यांना सबसिडीही मिळते. येथे शेती कामास सहाय्य ठरणारे विविध आकाराचे ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांना प्रात्याक्षिकांसाठी ठेवण्यात आले आहे. तसेच शेती कामांसाठी उपयुक्त असणारे ‘इलेक्ट्रीक मिनी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसह नागरिकांचेही लक्ष वेधून घेत आहे. शेतीच्या कामाव्यतिरीक्त मिनी ट्रॅक्टर इलेक्ट्रीक बाईक म्हणूनही वापरता येते.

          या महोत्सवाला केवळ दोन दिवस उरले असून जास्तीत जास्त शेतकरी तसेच नागरिकांनी या महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी केले आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती