Friday, March 24, 2023

आदिवासी युवकांसाठी विनामूल्य स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षण

 आदिवासी युवकांसाठी विनामूल्य स्पर्धापरीक्षापूर्व प्रशिक्षण


 अमरावती, दि. 24 : परतवाड्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्राद्वारे विविध पदांच्या स्पर्धा परीक्षेसाठी आदिवासी उमेदवारांची विनामूल्य प्रशिक्षण देऊन तयारी करून घेतली जाते. या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


 प्रशिक्षण कालावधी साडेतीन महिन्यांचा असून त्यात प्रशिक्षणार्थीना दरमहा एक हजार रूपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण करणारांना विविध विषयांच्या चार पुस्तकांचा संच विनामूल्य मिळतो. प्रशिक्षणासाठी किमान पात्रता दहावी उत्तीर्ण आहे, तसेच दि. 1 एप्रिल 2023 रोजी वयाची किमान 18 वर्षे पूर्ण असावीत. त्याचप्रमाणे, दि. 15 जुलै 2023 रोजी 30 वर्षे पूर्ण केलेली नसावी.  


 प्रशिक्षणाचे सत्र एप्रिलमध्ये सुरू होत असून, इच्छूकांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, जयस्तंभ चौक, मातोश्री मंगल कार्यालयामागे, लाल पुलाजवळ, अचलपूर कॅम्प, परतवाडा, जि. अमरावती (दूरध्वनी क्र. 07223-221205 व मोबाईल नं. 7709432024 या क्रमांकावर संपर्क साधावा. 


      अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, दहावी उत्तीर्ण गुणपत्रिका, उपविभागीय अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र तसेच जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे ऑनलाईन कार्ड


        ( http://rojgar.mahaswayam.in) आदी प्रमाणपत्रांच्या साक्षांकित प्रती व एक स्वत:चा पासपोर्ट साईज फोटो जोडणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये.


०००

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...