जागतिक कर्णबधीर सप्ताहानिमित्त जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 

जागतिक कर्णबधीर सप्ताहानिमित्त

जनजागृती सप्ताहाचे आयोजन

अमरावती, दि. 2 : जागतिक कर्णबधीर कार्यक्रमांतर्गत दि. 1 मार्च पासून जनजागृती सप्ताहाला सुरुवात झाली असून हा सप्ताह 8 मार्चपर्यंत चालणार आहे.  या कालावधीमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. यामध्ये जनजागृती रॅली, रांगोळी स्पर्धा, श्रवणदोषाबाबत शाळा, महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन कार्यशाळा तसेच ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालये येथे श्रवणदोषाबाबत तपासणी व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात येत असून औषधी वितरण करण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दिलीप सौंदळे यांनी केले आहे.

*****

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती