Posts

Showing posts from July, 2021

पोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप महिला व बालविकास मंत्र्यांकडून सॅल्यूट

Image
  पोलीस कर्मचाऱ्याला सन्मानपूर्वक निरोप महिला व बालविकास मंत्र्यांकडून सॅल्यूट     ३१ जुलै : पोलीस दलातील कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांना अथवा लोकप्रतिनिधींना सॅल्यूट मारताना आपण नेहमी पाहत   असतो. मात्र राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री एडवोकेट यशोमती ठाकूर यांनी आज   आपल्या ताफ्यातील वाहन चालक मारुती किंन्हाके यांना सॅल्युट करत त्यांच्या अविरत प्रामाणिक सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. मारुतीराव किन्हाके 1989 साली पोलीस दलात रुजू झाले गेल्या दोन वर्षांपासून ते महिला आणि बालकविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या ताफ्यात कार्यरत आहेत. यशोमती यांना राज्यभरात त्यांच्या वाहनाचा चालक या निमित्तानं ते सारथ्य करीत असतात. मारुतीराव   यांची आज सेवानिवृत्ती आहे. कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी त्यांचं औक्षण करून तसेच त्यांना शाल , श्रीफळ देऊन त्यांचा गौरव श्रीमती ठाकूर यांनी केला तसेच सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेल्या मारुतीराव यांनी गेल्या दोन वर्षात केलेल्या सहकार्याबद्दल गौरवोद्गार काढत त्यांना ठाकूर यांनी सॅल्यूट केला तसेच त्यांना भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

पालकमंत्र्यांकडून तिवसा नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा

Image
  पालकमंत्र्यांकडून तिवसा नगरपंचायतीच्या कामकाजाचा आढावा कामे सुरळीत नसल्याने  पालकमंत्र्यांकडून तीव्र नाराजी ;  बेजबाबदारपणाबद्दल खडसावले नागरिकांच्या जीवाशी खेळू नका -   पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर                 अमरावती ,  दि. ३१ : तिवसा शहरात सफाईकामांत नियमितता नाही. डेंग्यूचे रूग्ण वाढत असल्याच्या सतत तक्रारी येत आहेत.  स्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळू नका. बेजबाबदारपणे वागल्यास कठोर कारवाई करण्याचा इशारा महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज नगरपंचायत प्रशासनाला दिला.         तिवसा शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असल्याच्या तक्रारीची दखल घेत पालकमंत्र्यांनी तिथे भेट देऊन पाहणी केली व नगरपंचायतीच्या कामांचा स्वतंत्र बैठकीद्वारे आढावा घेतला. उपविभागीय अधिकारी नरेंद्र फुलझेले ,  तहसीलदार वैभव फरतारे ,  मुख्याधिकारी पल्लवी सोटे ,  माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे ,  नरेंद्र विघ्ने आदी यावेळी उपस्थित होते.             पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की ,  पावसाळ्याच्या काळात डेंग्यू ,  मलेरिया आदी साथरोग प्रति

गोरगरीब व गरजू रुग्णांसाठी ग्रामीण आरोग्य यंत्रणेचे बळकटीकरण पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर

Image
  पावणेसात   कोटी   रुपये   निधीतून   आरोग्य   उपकेंद्रे ,   रस्ते ,   विश्रामगृह   विस्तारीकरण भिवापूर ,   बोर्डा ,   वणी   ममदापुर   येथील   आरोग्य   उपकेंद्राचे   पालकमंत्र्यांच्या   हस्ते   भूमीपूजन गोरगरीब   व   गरजू   रुग्णांसाठी   ग्रामीण   आरोग्य   यंत्रणेचे   बळकटीकरण पालकमंत्री   ऍड .   यशोमती   ठाकूर   अमरावती ,   दि .   १   : जिल्ह्यात   ठिकठिकाणी   आरोग्य   केंद्रे ,   उपकेंद्रे ,   रुग्णालयांचे   श्रेणीवर्धन   अशी   अनेक   कामे   आकारास   येत   आहेत .   त्यामुळे   ग्रामीण   आरोग्य   यंत्रणेचे   बळकटीकरण   होऊन    गोरगरीब   व   गरजू   रुग्णांना   उत्तम   दर्जाची   उपचार   सुविधा   निर्माण   होईल ,   असे   प्रतिपादन   राज्याच्या   महिला   व   बालविकास   मंत्री   तथा   जिल्ह्याच्या   पालकमंत्री   ऍड .   यशोमती   ठाकूर   यांनी   विविध   आरोग्य   उपकेंद्रांच्या   शुभारंभप्रसंगी   केले . भिवापूर ,   बोर्डा ,   वणी   ममदापुर   या   तीन   ठिकाणी   आरोग्य   उपकेंद्राचे ,   तसेच   आखतवाडा   येथील   काँक्रीट   रस्त्याचे   भूमीपूजन ,   तसेच   मोझरी   व   तिवसा   येथील   शासकीय