दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाच्या जागेची पालकमंत्र्यांकडून पाहणी

 






दिवंगत नेते रा. सू. गवई स्मारकाच्या जागेची पालकमंत्र्यांकडून पाहणी

स्मारकासाठी आवश्यक निधी मिळवून देऊ

काम गतीने पूर्ण करण्याचे निर्देश

-  पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

 

अमरावती, दि. २४ : माजी राज्यपाल, दिवंगत नेते रा. सू. गवई यांच्या स्मारकाचे काम पूर्णत्वास जाण्यासाठी नियोजनानुसार आवश्यक निधी मिळवून देण्यात येईल. हे काम गतीने पूर्ण होण्यासाठी प्रशासनानेही कामांना वेग देण्याचे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.

येथील विद्यापीठ परिसरातील स्मारकाच्या कामांची पाहणी पालकमंत्र्यांनी आज सकाळी केली, त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार बळवंतराव वानखडे, जिल्हाधिकारी पवनीत कौर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता थोटांगे आदी यावेळी उपस्थित होते.

पूर्णाकृती पुतळा, सभागृहाचे नियोजन

स्मारकासाठी नगरविकास विभागाकडून 20 कोटी 3 लक्ष रूपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. स्मारकात दादासाहेब गवई यांचा पुर्णाकृती पुतळा, जीवनपट दर्शविणारे स्मृती सभागृह, कॅफेटेरिया, दोनशे क्षमतेचे प्रेक्षागृह, आवारभिंत, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते व सौंदर्यीकरण, वाहनतळ आदी कामे होणार आहेत.  ही सर्व कामे नियोजनानुसार दर्जेदार व वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. कामांसाठी आवश्यक निधी वेळोवेळी पाठपुरावा करून मिळवून देण्यात येईल. पहिल्या टप्प्यातील कामांसाठीचा उर्वरित निधीही तत्काळ मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल. निधीची कमतरता पडू देणार नाही. काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण व्हावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे विविध अधिकारी यावेळी उपस्थित होते.

00000

Comments

Popular posts from this blog

शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून अर्ज आमंत्रित

‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 21 फेब्रुवारी रोजी; 62 रिक्तपदांवर होणार भरती: युवक-युवतींना रोजगाराच्या संधी

युवक-युवतींना रोजगाराच्या संधी कौशल्य विकास केंद्राचा ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ येत्या 29 ऑगस्ट रोजी 61 रिक्तपदांवर होणार भरती