Posts

Showing posts from March, 2019

पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ पाच लाखांहून अधिक बालकांचे पोलिओ लसीकरण

Image
अमरावती, दि. ९ : आरोग्य विभागातर्फे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते इर्विन रुग्णालयात झाला. मोहिमेत ५ वर्षांपर्यंतच्या २ लाख ८१ हजार ८११    बालकांना ही लस पाजली जाणार आहे.       पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांच्या हस्ते गुणिशा जैन या बालिकेला पोलिओ लस पाजून मोहिमेचा शुभारंभ झाला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्यासह रुग्णालयातील आरोग्यतज्ज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पल्स पोलिओ मोहिमेत    ५ वर्षांपर्यंतच्या बालकांना २ लाख ८१ हजार ८११ ही लस पाजली जाणार आहे. पोलिओवर मात करण्यासाठी मोहिम परिपूर्ण नियोजनातून सर्वदूर व सातत्याने राबविण्यात येत आहे, असे यावेळी श्री. पोटे पाटील यांनी सांगितले. ग्रामीण भागात   1 लाख 76 हजार 977, तर नगरपालिका क्षेत्रात 37 हजार 763 आणि महापालिका क्षेत्रात 67 हजार 71 बालकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याची माहिती डॉ. निकम यांनी दिली. जिल्ह्यात सर्वदूर मोहिम राबविण्यात येत असून, एकही बालक वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. 0

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची स्थापना

Image
अमरावती, दि. 5 : निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली असून, जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची पहिली बैठक आज झाली.   निवडणूक काळात विविध उमेदवारांकडून प्रसृत होणा-या जाहिरातींचे प्रमाणीकरण व पेड न्यूजबाबत तक्रारींची तपासणी हे काम समिती करणार आहे. समिती सदस्यांनी निवडणूक आयोगाने निश्चित केलेली नियमावली, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आदींबाबत जाणून घेऊन त्यानुसार काम करावे. समितीचे सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी यांनी वेळोवेळी नमूद बाबी समितीच्या निदर्शनास आणून    द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. नवाल यांनी यावेळी दिले. समितीचे सदस्य तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत, तहसीलदार श्रीमती महांडुळे, आकाशवाणीच्या केंद्रप्रमुख सुनालिनी शर्मा, श्री शिवाजी महाविद्यालयाच्या जनसंवाद विभागाचे प्रमुख कुमार बोबडे, सायबर सेलचे सहायक पोलीस निरीक्षक कांचन पांडे,    सदस्य सचिव जिल्हा माहिती अधिकारी श्री. पवार, सहायक माहिती अधिकारी विजय राऊत, सामान्य सहायक योगेश गावंडे आदी यावेळी उपस्थित होते.   दरम्या

सत्तर गाव पाणीपुरवठा योजना गतीने कामे करण्याचे पाणी पुरवठा मंत्री यांचे आदेश मंत्रालयात चर्चा

Image
अमरावती, दि. 5 : सत्तर गाव पाणीपुरवठा योजनेबाबत सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज मुंबई येथे दिले.सत्तर गाव पाणीपुरवठा योजना पुनर्जीवित करण्यासाठी आज मंत्रालयात पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री प्रविण पोटे पाटील ,आमदार डॉ अनिल बोंडे उपस्थित होते. शासन निर्णयाप्रमाणे सुधारित प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश पाणीपुरवठा मंत्री यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील अपर वर्धा धरणात पाणी साठा कमी असल्याने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचे निर्देश    पालकमंत्री श्री पोटे पाटील यांनी दिले. ते म्हणाले की सत्तर गाव पाणीपुरवठा योजनेतून लवकरच    गावांना पाणी उपलब्ध होणार आहे,नागरिकांना पिण्याचे पाणी विनासायास मिळावे असे शासनाचे धोरण आहे.लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून सत्तरगाव पाणीपुरवठा योजना मार्गी लावावी. मंत्रालयातील अनेक अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 00000