Posts

Showing posts from October, 2018

रा. सु. गवई यांच्या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
मुंबई ,  दि. 29 : दिवंगत नेते रा. सु. गवई यांचे स्मारक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित विभागाला दिल्या. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रा. सु. गवई स्मारकासंदर्भातील शिखर समितीची बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला गृह राज्यमंत्री दीपक केसरकर ,  पर्यावरण राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील ,  मुख्य सचिव दिनेश कुमार जैन ,  वित्त व नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव यु.पी.एस. मदान ,  मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी ,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी ,  नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर यांच्यासह अमरावती येथून आमदार सुनील देशमुख ,  अमरावती जिल्हयाचे जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदवारे बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले ,  बिहार आणि केरळ राज्याचे माजी राज्यपाल दिवंगत रा. सु. गवई यांचे स्मारक अमरावतीमध्ये उभारण्यात येणार आहे. या स्मारकाचे काम नियोजित वेळेत पूर्ण करत

नोंदणी न झालेल्या मतदारांनी लाभ घ्यावा -जिल्हाधिकारी अभिजित बांगर

Image
मतदार नोंदणीसाठी रविवारी विशेष मोहिम रविवारी सर्व मतदान केंद्रावर बीएलओ असणार अमरावती, दि.26: पात्र असूनही मतदार नोंदणी न झालेल्या नागरिकांनी रविवारी (ता. 28) आयोजित विशेष संक्षिप्त पुनरीक्षण मोहिमेत मतदान केंद्रावर जाऊन नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी केले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार  दि. 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादीचा विशेष पुनरीक्षण कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या अंतर्गत 1 जानेवारी 2019 रोजी मतदार म्हणून नोंदणीस पात्र असूनही मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या व्यक्तींची नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदणी तसेच मतदार यादीतील नोंदीची दुरुस्ती करण्यात येत आहे.           दिनांक 1 सप्टेंबर 2018 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारुप मतदार यादी संबंधी दावे व आक्षेप दाखल करण्याची मुदत दि. 31 ऑक्टोबर 2018 रोजी संपत आहे. तत्पूर्वी जास्तीत जास्त नवमतदारांची नोंदणी करण्यासाठी दिनांक 28 ऑक्टोबर 2018  रोजी संपूर्ण अमरावती जिल्ह्यात याकरिता विशेष मोहीम राबविण्यात येत असून, या दिवशी जिल्ह्यातील प्रत्येक मत

सैन्यदलाची भरती प्रक्रिया सुरळीत अफवांवर विश्वास ठेवू नका - कर्नल आर.एम. नेगी

Image
अमरावती, दि. 27 :   भारतीय   सैन्य   दलातर्फे   सैन् यभरती   प्रक्रिया 3 नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, आतापर्यंत सुमारे 15 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी चाचणीत भाग घेतला. चाचणी प्रक्रिया अत्यंत पारदर्शकपणे पार पडत असून, उमेदवारांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन कर्नल आर. एम. नेगी यांनी येथे केले. बुलडाणा वगळता नागपूर व अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी अमरावतीत भरती प्रक्रिया सुरु आहे.  सैन्यभरतीसाठी ऑनलाईन नोंदणीसह (ऑनलाईन ॲप्लिकेशन कम रजिस्ट्रेशन)अद्ययावत यंत्रणा उपलब्ध आहे. अत्यंत काटेकोर व पारदर्शीपणे हीप्रक्रिया   पार पडते. तथापि, काही समाजकंटकांकडून उमेदवारांची फसवणूक झाल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. उमेदवारांनी कुठल्याही भूलथापांना    बळी पडू नये, असे आवाहन श्री. नेगी यांनी केले. ते म्हणाले की, उमेदवारांची मोठी गर्दी लक्षात घेता सैन्यदलातर्फे काटेकोरपणे अविरत प्रक्रिया सुरु आहे. येथे  सुमारे दीडशे अधिकारी- कर्मचारी कार्यरत आहेत. अधिकारी श्रेणीतील 15 जणांसह 7- 8 डॉक्टरांचाही समावेश आहे. निवड अचूक व काटेकोर होण्यासाठी सैन्यदलाकडून अविश्रांत काम

दृष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक पाणीटंचाई, चाराटंचाई उपाययोजनांबाबत होणार चर्चा

Image
                दृष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत आज बैठक                                      पाणीटंचाई, चाराटंचाई उपाययोजनांबाबत होणार चर्चा अमरावती, दि. 26 : जिल्ह्यातील दुष्काळसदृश स्थितीच्या अनुषंगाने पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी पाच तालुक्यांतील 42 गावांचा दौरा केला  आहे.  त्यानुसार त्यांनी पाणीवितरण व अपेक्षित नियोजन याबाबत चर्चा करण्यासाठी अप्पर वर्धा प्रकल्प डावा व उजवा कालवा सल्लागार समितीची बैठक बोलावली आहे.  टंचाई व उपाययोजनांच्या दृष्टीने ही महत्वपूर्ण बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उद्या (ता. 27) दुपारी 1 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.  बैठकीत जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आदींसह जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, कार्यकारी अभियंता आदी उपस्थित राहणार आहेत. टंचाईच्या अनुषंगाने अप्पर वर्धा प्रकल्पाचे पाणीवितरण, चाराटंचाई व अपेक्षित कार्यवाही आदी विविध विषयांवर चर्चा होईल.             जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत

नरभक्षक वाघाबाबत पालकमंत्र्यांकडून वनमंत्र्यांना पत्र नागरिकांना शांततेचे आवाहन

Image
          अमरावती,दि 24 : - अमरावती जिल्हृयातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मंगरुळ दस्तगीरचे रहिवासी शेतकरी राजेंद्र निमकर यांना आणि अंजनसिंगी येथील शेतमजूर मोरेश्वर वाळके हे नरभक्षक वाघाने केलेल्या  हल्ल्यात ठार झाले.संपूर्ण परिसर नरभक्षक वाघाच्या दहशतीखाली असून या वाघाच्या बंदोबस्तासाठी तातडीने कार्यवाहीसाठी जिल्हृयाचे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पत्राद्वारे विनंती केली आहे. त्याचप्रमाणे, हल्ल्यात बळी पडलेल्या मृतांच्या कुटुंबियांना मदत देण्याची मागणीही त्यांनी केली आहे.           पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी ही गंभीर परिस्थिती वनमंत्र्यांना पत्र देऊन अवगत करुन दिली व नरभक्षक वाघास जेरबंद करण्यासाठी तातडीने उपाययोजनेची  मागणी केली आहे.           या वाघाने आतापर्यंत अनेक पाळीव प्राणी व जनावरेही फस्त्‍ केली आहेत. नरभक्षक वाघाच्या हल्ल्याच्या  भितीपोटी शेतकरी व शेतमजूर शेतात जाण्यास धजावत नसून धामनगाव व तिवसा तालुक्यातील महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे तात्काळ ही समस्या सोडविण्या

अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात प्रशिक्षण अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी ‘जीवसंजीवनी’ प्रशिक्षण उपयुक्त - मुख्यमंत्री

Image
मुंबई ,  दि. 23 : हृदयविकाराच्या रुग्णांना जीवनदायी ठरणाऱ्या ‘जीवसंजीवनी’ क्रियेबाबत मंत्रालयातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आरोग्य भारतीय भूलतज्ज्ञ संघटना यांच्या मार्फत आज कार्यक्रम घेण्यात आला. त्रिमूर्ती प्रांगणात झालेल्या या प्रशिक्षण कार्यक्रमास भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण माहिती घेतली. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी ही क्रिया महत्वपूर्ण असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत ,  गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता ,  गृहराज्यमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. हृदयविकार रुग्णांसाठी ‘जीवसंजीवनी क्रिया’ जीवनदायी - आरोग्यमंत्री आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते या प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, एखाद्या व्यक्तीचे प्राण वाचविण्यासाठी आपण योगदान दिले आहे याचे समाधान खूप मोठे असते. जेव्हा हृदयविकाराच्या झटक्याने एखादा व्यक्ती आपल्या समोर कोसळतो तेव्हा आपण मदतीसाठी  १०८ क्रमांक रुग्णवाहिकेशी संपर्क साधतो किंवा गोंधळून जातो. तर अशावेळी गोंधळून न जाता प्रथो

मीझल्स रुबेला लसीकरण मोहिम मोहिमेच्या यशस्वितेसाठी समन्वयाने काम करावे - अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

Image
अमरावती, दि. 23 :  नवी पिढी सुदृढ व सशक्त होण्यासाठी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमाचे मोठे योगदान आहे., आता शासनाने हाती घेतलेली  मीझल्स रुबेला लसीकरण मोहिम अत्यंत महत्वपूर्ण असून, त्याच्या यशस्वितेसाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आज येथे दिले. मोहिमेच्या पूर्वतयारीबाबत बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. श्री. परदेशी म्हणाले की, ही मोहिम शाळांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहे. शाळाबाह्य मुलामुलींपर्यंत पोहोचून त्यांचे लसीकरण झाले पाहिजे. अंगणवाड्यांत, शाळांत पालकसभा घेण्यात याव्यात. लसीकरणाबाबत पालकांमध्ये जनजागृती करावी. आदिवासी क्षेत्रात, दुर्गम परिसरात पोहोचण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत.  एकही बालक या लसीकरणापासून वंचित राहता कामा नये.  मोहिमेत स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य मिळवावे, असेही ते म्हणाले. मोहिमेबाबत प्रशिक्षण, जनजागृतीसाठी प्रत्येक रूग्णालयात फलक, रॅल

भगवान ऋषभदेवांचा अहिंसेचा संदेश आजही अनुकरणीय - राष्ट्रपती राम नाथ कोविंद

Image
नाशिक ,  दि. 22 : अहिंसेच्या माध्यमातून शांती आणि शांततेच्या माध्यमातून अहिंसेचा संदेश भगवान ऋषभदेव यांनी दिला आहे. जगातील सद्यस्थिती पाहता त्यांचा अहिंसेचा संदेश आजही प्रासंगिक आणि अनुकरणीय आहे ,  असे प्रतिपादन राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी केले. सटाणा तालुक्यातील भिलवाड (मांगीतुंगी) येथे आयोजित विश्वशांती अहिंसा संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल चे. विद्यासागर राव , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ,  श्रीमती सविता कोविंद ,  केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे ,  पालकमंत्री गिरीष महाजन ,  आमदार राजेंद्र पाटणी ,  गणिनी प्रमुख आर्यिकाज्ञानमती माताजी ,  आर्यिकारत्न चंदनामती माताजी ,   मूर्ती निर्माण समितीचे अध्यक्ष रविंद्रकिर्ती स्वामी आदी उपस्थित होते. राष्ट्रपती म्हणाले ,  मानवी कल्याणासाठी कार्य करणाऱ्या जैन धर्माचे अधिष्ठान ‘ अहिंसा परमो धर्मा: ’  हा संदेश आहे. तीर्थंकरांनी सम्यक  ज्ञान ,  सम्यक दर्शन आणि सम्यक आचरणाचा संदेश दिलेला आहे. अहिंसा केवळ मानवाप्रती अभिप्रत नसून मन ,  वचन आणि आचरणाने अहिंसा तत्वाचे पालन करणे गरजेचे आहे. केवळ म

वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील 26 महिला उद्योजिका होणार सहभागी

Image
‘ केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे आयोजित ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’मध्ये महाराष्ट्रातील 26 महिला उद्योजिका सहभागी होणार आहेत. केंद्रीय महिला व बाल विकास मंत्रालयाच्यावतीने ‘वुमेन ऑफ इंडिया ऑरगॅनिक फेस्टिव्हल’ चे आयोजन दिल्लीतील इंदिरा गांधी कला केंद्र येथे करण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन येत्या शुक्रवारी दिनांक 26 ऑक्टोबरला होणार आहे. देशभरातील 500 महिला उद्योजिका या फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. सेंद्रीय शेती करणा-या महिला शेतकरी व महिला उद्योजकांस प्रोत्साहन देण्यासाठी या मेळयाचे आयोजन मागील चार वर्षापासून करण्यात येत आहे. महिला उद्योजकांस योग्य व्यासपीठ मिळावे, त्यांचे सक्षमीकरण व्हावे, महिला उद्योजकांसाठी अधिकाधिक संधीची दारे उघडावीत हा या फेस्टिव्हलचा उद्देश आहे. महाराष्ट्रामधून नंदुरबार(4), जळगाव(4), नागपूर(2), भंडारा(1), अमरावती(2), यवतमाळ(4), औरंगाबाद(1), हिंगोली(1), बीड (1), मुंबईतून (4) महिला उद्योजिका सहभागी होणार आहेत. यासह विदर्भ कापूस उत्पादक समिती, सबीना असोसियेशन ऑफ ऑरगॉनिक फारमर्स यांचाही सहभाग असणार आहे. महाराष्ट्रा

ऐकालयाच हवं अमरावती जिल्हा माहिती कार्यालय प्रस्तुत संवादपर्व

Image

दुष्काळ परिस्थितीबाबत पाहणीसाठी पालकमंत्र्यांचा जिल्हाभर दौरा दुष्काळ जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय - पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील

Image
-                        अमरावती, दि. 21:     अमरावती जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी पालकमंत्र्यांनी जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी दौरा करत आहेत. दुष्काळ जाहीर करण्याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज सांगितले.  जिल्ह्यातील तिवसा,अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, तसेच चिखलदरा तालुक्यातील आडनदी, मडकी, बोरी, सलोना, लिनझरा गावात व    प्रत्यक्ष शेतशिवारात जाऊन दुष्काळग्रस्त भागांची पाहणी पालकमंत्री श्री. पोटे पाटील यांनी केली.           दौ-यादरम्यान पालकमंत्र्यांनी शेतकरी, शेतमजूर, गावकरी यांच्याशी संवाद साधून परिस्थितीची माहिती घेतली. दि. 31 ऑक्टोबरपर्यंत दुष्काळग्रस्त भाग जाहीर करण्यासाठी आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही करण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिक्षक, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, उपविभागीय महसूल अधिकारी यांना दिले आहेत.            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती दौऱ्यात दुष्काळ जाहीर करण्याबाबतची कार्यवाही लवकरच करू असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे जिल्हा प्रशासनाकडून

दिलखुलास कार्यक्रमात ‘महाराष्ट्र आणि महात्मा गांधी’ ग्रंथातील श्राव्य लेख

Image
मुंबई ,  दि. 20 :  माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात    महात्मा गांधीजींच्या  150  व्या जयंती निमित्त माहिती  व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या  ‘ महाराष्ट्र आणि महात्मा गांधी ’  या ग्रंथातील श्राव्य लेख आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 22  आणि मंगळवार दि. 23  ऑक्टोबर रोजी सकाळी  ७.२५ ते ७.४०  या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका श्रीमती पुनम चांदोरकर यांनी निवेदन केले आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे महात्मा गांधीजींच्या  150  व्या जयंती निमित्त  ‘ महाराष्ट्र आणि महात्मा गांधी ’  या शीर्षकाचा ग्रंथ प्रकाशित करण्यात आला. या ग्रंथात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या  ‘ युगपुरुषाचा आदर्श ’  या लेखात महात्मा गांधीजींच्या विचारातून मिळणाऱ्या प्रेरणेबाबत माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र बेडेकर यांनी  या लेखाचे वाचन केले आहे.

वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणपूरक नगर निर्मितीसाठी योगदान द्यावे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Image
         पुणे ,  दि. 20 : मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होत असताना शहरांचा नियोजनबध्द विकास होणे गरजेचे आहे. सध्या तापमानवाढीचं मोठ संकट आपल्यासमोर आहे. यासाठी वास्तुविशारद शाखेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचा विचार करुन ,  उत्कृष्ट दर्जाच्या नगर निर्मितीसाठी योगदान देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.             सतीश मिसाळ एज्युकेशन फाऊंडेशनच्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चर ,  उंड्री या संस्थेचा पहिला पदवीप्रदान समारंभ मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाला ,  त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे ,  महापौर मुक्ता टिळक ,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाचे कुलगुरु नितीन करमळकर ,  संस्थेच्या विश्वस्त आमदार माधुरी मिसाळ ,  कार्यकारी संचालक पूजा मिसाळ ,  दीपक मिसाळ ,  प्राचार्या पूर्वा केसकर आदी उपस्थित होते.            कार्यक्रमात  ‘ थेसीस कॅटलॉग ’ चे प्रकाशन श्री.फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या व पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.           
Image
राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ ऊर्जा विभागाच्या लोकाभिमुख, लोकहिताच्या तीन महत्त्वाकांक्षी योजनांचा भव्य शुभारंभ                                                                          -  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस        मुंबई ,  दि. 16 : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या, लोकाभिमुख अशा महत्वाकांक्षी तीन योजना सुरु केल्या असून याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना व जनतेला मोठ्या प्रमाणात होईल ,  असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.               ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्प ,  विद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स व शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या तीन अभिनव योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.               या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकात पाटील ,  ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट ,  गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता ,  आदिवासी