Monday, October 15, 2018

एस एल ॲन्ड एस एस गर्लस् हायस्कुलला भेट


मराठी भाषा मंत्री श्री. तावडे यांनी चर्नी रोड येथील एस एल ॲन्ड एस एस गर्लस् हायस्कुलला भेट दिली. यावेळी मुंबई परिसरातील विविध शाळांतील मुले उपस्थित होती. वाचन प्रेरणा दिनानिमित्ताने या शाळेत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांतर्गत श्री. तावडे यांनी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला.
आजच्या काळातही पुस्तक वाचनाचे महत्व विद्यार्थ्यांना पटवून देताना श्री. तावडे यांनी विद्यार्थ्यांना शाळेत येणे अभ्यास करणे हे महत्वाचे असले तरी अभ्यासासोबत अवांतर पुस्तके पण वाचा त्यातून तुम्हाला आनंद आणि ज्ञान मिळेल, असे सांगितले. अभ्यासशाळा यामधून थोडा तरी वाचनासाठी वेळ काढा. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी महिन्यातून एक पुस्तक तरी वाचले पाहिजे. वाचनाची आवड तुम्हाला डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलामांसारखे प्रतिभावंत करेल असे सांगितले.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...