Monday, October 1, 2018

पालकमंत्र्यांकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा आढावा
अपूर्ण कामांना गती देऊन तत्काळ पूर्ण करावीत
            -पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील
            अमरावती, दि.1:  मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रगतीपथावरील तसेच अद्यापही सुरु न झालेली  सर्व कामे मार्चपूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी आज येथे दिले.
          योजनेचा तपशीलवार आढावा पालकमंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला, त्यावेळी ते बोलत होते.  आमदार रमेश बुंदिले, जिल्हाधिकारी अभिजीत बांगर, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रदीप खवले आदी यावेळी उपस्थित होते.
मेळघाटमधील दळणवळण भक्कम करण्यासाठी योजनेत अनेक कामांचा समावेश केला आहे. 2016-17 मधील 18 व 2017-18 मधील 12 कामे प्रगतीपथावर आहेत. ती पूर्ण करावीत तसेच सुरु न झालेल्या कामांच्या आरंभ कार्यादेश काढून कामाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी बैठकीत दिले.
00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...