Sunday, October 7, 2018

ऑक्सिजन पार्कमध्ये वन्यजीव सप्ताहाचा समारोप पर्यावरण जपण्यासाठी नव्या पिढीने योगदान द्यावे - आमदार डॉ. सुनील देशमुख















            अमरावती, दि. 7 : शहरात साकारत असलेला ऑक्सिजन पार्क हा महाराष्ट्रातील एक चांगले स्थळ म्हणून नावारुपाला येईल. अशा सुंदर उद्याननिर्मितीतून आणि वृक्ष संवर्धनातून पर्यावरण जपण्यासाठी नव्या पिढीने योगदान द्यावे, असे आवाहन आमदार डॉ. सुनील देशमुख यांनी केले. 
            वनविभागातर्फे वन्यजीव सप्ताहाचा समारोप येथील ऑक्सिजन पार्क येथे झाला त्यावेळी ते बोलत होते. पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हा अधिक्षक दिलीप झळके, वन विभागाचे डॉ. प्रवीण चौहान, एम.एस.रेड्डी, अशोक कविटकर, रामेश्वर अभ्यंकर,जयंत वडतकर यांच्यासह शहरातील अनेक वनप्रेमी कार्यकर्ते व नागरिक यावेळी उपस्थित होते.
            श्री. देशमुख म्हणाले की, वन विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अत्यंत आत्मीयतेने पार्कच्या कामाला गती दिली आहे. केवळ एका वर्षात झाडांची वाढलेली उंची पाहता हे स्थळ दाट वृक्षराजीने रमणीय होईल यात शंका नाही. येथील बैल जोडीचे शिल्पही अप्रतिम झाले आहे. या परिसरात पूर्वी डम्पिंग ग्राऊंड सारखा कचरा पडलेला दिसायचा. त्यामुळे पार्कची संकल्पना मांडली. 14 व्या वित्त आयोगातून निधी मिळवून कुंपण करण्यात आले. आता वेगवेगळी झाडे, त्यांची शास्त्रीय माहिती, विविध शिल्पकृती आदी मांडणी पार्कमध्ये होत आहे. एक यशोगाथा म्हणून हे उद्यान महाराष्ट्रासमोर उभे राहील.
            वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन यावेळी करण्यात आले. श्री. तरवडे, श्री. झळके, डॉ. चौहान, श्री. कविटकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
            बैल जोडीची शिल्पकृती उभारणाऱ्या शिल्पकार रमेश व राजू तसेच उत्कृष्ट वृक्षसंवर्धनाबद्दल गजू थेट यांना गौरविण्यात आले. वन विभागातर्फे आयोजित विविध स्पर्धांचे बक्षिस वितरण यावेळी झाले. पारितोषिक विजेत्यांना सायकल देण्यात आली. जि.प. माध्यमिक कन्या शाळा कस्तूरबा विद्यालय, सोनिया गांधी उर्दू विद्यालय, रामकृष्ण क्रिडा महाविद्यालय, मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय, प्रशांत विद्यालय आदी शाळांच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. क्षिप्रा मानकर यांनी सुत्रसंचालन केले.

00000

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...