Tuesday, October 16, 2018

राज्यातील शेतकऱ्यांना मोठा लाभ
ऊर्जा विभागाच्या लोकाभिमुख, लोकहिताच्या
तीन महत्त्वाकांक्षी योजनांचा भव्य शुभारंभ
                                                                    - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
      मुंबईदि. 16 : ऊर्जा विभागाने लोकहिताच्या, लोकाभिमुख अशा महत्वाकांक्षी तीन योजना सुरु केल्या असून याचा लाभ राज्यातील शेतकऱ्यांना व जनतेला मोठ्या प्रमाणात होईलअसा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
            ऊर्जा विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत उभारण्यात आलेले सौर ऊर्जा प्रकल्पविद्युत वाहन चार्जिंग स्टेशन्स व शेतकऱ्यांच्या कृषीपंपाला नवीन वीज जोडणी देण्याकरिता उच्चदाब वितरण प्रणाली (एचव्हीडीएस) या तीन अभिनव योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज मंत्रालयात करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
            या कार्यक्रमास महसूलमंत्री चंद्रकात पाटील, ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापटगृहनिर्माण मंत्री प्रकाश महेताआदिवासी विकास मंत्री विष्णू सवराजलसंपदा मंत्री गिरीष महाजनपर्यटन मंत्री जयकुमार रावलउद्योग राज्यमंत्री प्रविण पोटे-पाटीलगृह राज्यमंत्री दिपक केसरकरजलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारेमुख्य सचिव दिनेशकुमार जैनमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीण परदेशी व इतर मान्यवर उपस्थित होते.
            ऊर्जा विभागाचे गेल्या चार वर्षात अत्यंत चांगले कार्य सुरु असून शेतकऱ्यांच्या हितासाठीसर्वसामान्यांना उपयुक्त असे निर्णय विभागामार्फत घेतले जात आहेत.आज उद्‌घाटन झालेल्या तीनही योजना या महत्त्वपूर्ण असून पर्यावरणपुरक अशा आहेत. या सर्व योजनांमुळे येत्या काही दिवसात शेतकरी बांधवांना दिवसा वीज देणे शक्य होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. मंत्रीमंडळाच्या बैठकीत 1 लाख सौर पंपांना मान्यता दिली असल्याचे सांगून मुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणालेशेतकरी केंद्रीत अशा या योजना असल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना नक्की होईल.
            विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनमुळे पर्यावरणाचा ऱ्हास निश्चितच वाचेल, तसेच इंधनाचा भार देखील कमी होईल. मोटर वाहन निर्मिती करणाऱ्या कंपन्या इलेट्रिकल वाहन तयार करीत आहेत. त्यामुळे विद्युत वाहन चार्जिंग स्टेशनला चांगली मागणी आहे. राज्यातील विद्युत अभियंतापदविकाधारक तसेच आयटीआयच्या युवकांना ही विद्युत स्टेशन देण्याबाबतचा निर्णय देखील महत्वाचा आहे. रोजगाराची मोठी संधी यातून मिळणार आहे. देशातील कोणत्याही राज्यापेक्षा अधिक विद्युत निर्माण करण्याची क्षमता असलेले आपले राज्य आहे, असे सांगून त्यांनी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व त्यांच्या चमूचे अभिनंदन केले.
मागेल त्याला मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी-चंद्रशेखर बावनकुळे
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या अभिनव अशा योजनेचे उद्‌घाटन संपन्न होताना आनंद व अभिमान वाटत आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे जीवन परिवर्तन झाले पाहिजे हा ध्यास घेऊन ऊर्जा विभाग आपल्या योजना राबवित आहे. निती आयोगाने कौतुक केलेली मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ही योजना असून अशा प्रकारची ही देशातील पहिली योजना आहे. राज्यातील जो शेतकरी बांधव ही योजना मागेल त्याला दिली जाईल असे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या भाषणात सांगितले.
            पुढे बोलताना श्री.बावनकुळे म्हणालेया सौर वाहिनीमुळे महत्त्वाचे असे फायदे होऊ शकतात. यामध्ये विद्युत खर्चविद्युत पुरविणे खर्च यात मोठी बचत होत आहे. विभागाने 5 लाख 18 हजार वीज कनेक्शन दिली असून उर्वरित दोन अडीच लाख लोकांना देखील जून 2019 अखेर कनेक्शन्स दिले जातील. आयटीआय धारक विद्युत पदविकाधारक आयटीआयच्या 23 हजार मुलांना मार्च 2019 पर्यंत विविध गावांमध्ये ग्राम मॅनेजर म्हणून काम मिळेल. प्रती विद्युत कनेक्शन 9 रुपये प्रमाणे त्यांना देखभाल दुरुस्ती खर्च दिला जाईल असेही त्यांनी सांगितले. राज्यातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत या योजनांचा लाभ मिळेल यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी केले.
           ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंह व महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. आपल्या प्रास्ताविकातून संजीव कुमार यांनी या तीनही अभिनव योजनांची सविस्तर माहिती दिली. तद्‌नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या योजनांचा रिमोटद्वारे शुभारंभ करण्यात आला.
            या कार्यक्रमास लोकप्रतीनिधीतसेच महावितरणचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्यंने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

DIO NEWS AMRAVATI 03-12-2025

                                     रब्बी हंगाम पिक स्पर्धेतील सहभागासाठी 31 डिसेंबरपर्यंत मुदत अमरावती, दि. 3 (जिमाका) : जिल्ह्यात पिकांची...